वाघ कशासाठी वाचवायचे ?



चं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि ते त्याची हत्या करण्याच्या तयारीत आहेत. परंतु वनखात्याचे लोक वाघाची हत्या करणाऱ्या लोकांवर गोळ्या झाडून त्यांना ठार करतात आणि वाघाचे प्राण वाचवतात..
लहान मुलांच्या गोष्टीच्या पुस्तकातसुद्धा अशी गोष्ट बाळबोध वाटेल. परंतु अशा बाळबोध व्यवहारावरच सरकारचे गाडे चाललेले असते. वाघाची शिकार करताना कुणी आढळल्यास गोळ्या घालण्याचा आदेश हा त्यातलाच प्रकार आहे. वाघ वाचवण्यासाठी प्रत्यक्षात काही करायचे नाही आणि खूप काही करतो आहोत, असे भासवण्याचे प्रयत्न केले जातात. केवळ महाराष्ट्रापुरते नव्हे, तर संपूर्ण देशभर अशीच परिस्थिती आहे. वाघ वाचवण्याची नुसती आवाहने केली जात आहेत. त्यासाठी मोहिमा राबवल्या जात आहे, तरीही वाघांच्या हत्या होतच आहेत. मध्ये आतार्पयत  वाघांच्या हत्या झाल्यात. चं्रपूर जिल्ह्यात गेल्या महिनाभरात तीन वाघांच्या हत्या होणे केवळ धक्कादायकच नव्हे, तर नामुष्कीजनक आहे. याच आठवडय़ात चं्रपूर-लोहारा रस्त्यावर वाघाच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले होते, त्याचे शीर आणि पाय कापून नेले होते. शंभर वर्षापूर्वी फक्त आशियामध्ये एक लाख वाघ होते, आणि आज जगभरातील वाघांची संख्या केवळ पाच हजारांच्या आसपास आहे. भारतात सुमारे  ते  वाघ आहेत. महाराष्ट्रत त्यांची संख्या शंभरावर शंभरावर आहे आणि त्यातील साठ ते सत्तर चं्रपूर जिल्ह्यात आहेत. चं्रपूरमध्ये जंगल खूप आहे, तसे जंगल गडचिरोलीतही आहे, पण तिथे दखल घेण्याजोगे वाघ नाहीत. कारण चं्रपूरचे जंगल वाघांना राहण्यासाठी सोयीचे आहे.
भारतात जे वाघ आहेत, त्यातील  टक्के वाघ संरक्षित क्षेत्राबाहेर आहेत. जर घर हे संरक्षित क्षेत्र असेल तर अंगण हे संरक्षित क्षेत्राबाहेरचे क्षेत्र येते. तशाच प्रकारे. त्याला बफर क्षेत्र म्हणतात. या बफर क्षेत्रात लोकवस्ती असते. जंगलांवर आधारित रहिवाशांच्या अनेक गरजा असतात, त्या मध, लाकूडफाटा गोळा करण्यापासून अनेक प्रकारच्या असू शकतात. या लोकवस्तीच्या गरजांचा सगळा ताण हे बफर क्षेत्र सहन करीत असते. वाघांच्या हत्येच्या बहुतांश घटना अशा बफर क्षेत्रात घडत असतात. बफर क्षेत्रातील वन्य प्राण्यांची देखभाल, त्यांचे संरक्षण वन्यजीव विभागाकडून नीटपणे होत नाही, हे त्याचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते. वन्यजीव विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही, मनुष्यबळ असले तरी ते प्रशिक्षित नसते, त्यांच्याकडे आवश्यक ती साधनसामुग्री नसते त्यामुळे शिकारीवर नियंत्रण ठेवण्यात ते अपयशी ठरतात.
चं्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबा हा व्याघ्रप्रकल्प आहे, म्हणजे संरक्षित क्षेत्र आहे. परंतु चं्रपूर जिल्ह्यात बफर क्षेत्र मोठय़ा प्रमाणावर आहे. या मोठय़ा क्षेत्रासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळेच शिकारीच्या घटना घडतात, मात्र या शिकारीमध्येही दोन प्रकार आहेत. काही स्थानिक लोक खाण्यासाठी म्हणून सांबर, चितळ किंवा हरणाची शिकार करतात. शिकार करून मांस खाणे एवढाच त्यांचा उद्देश असतो. अशी शिकार जास्त चिंताजनक नाही. चिंताजनक आहे, ती व्यावसायिक शिकार. शिकार करून वन्यप्राण्यांचे कातडे, नखे, शिंगे यांची विक्री केली जाते. वाघाच्या तर अनेक अवयवांना चीन, हाँगकाँगमध्ये मोठी मागणी आहे आणि त्याला किंमतही चांगली मिळते. व्यावसायिक शिकाऱ्यांकडे शिकारीसाठी अत्याधुनिक हत्यारे आणि व्यावसायिक दृष्टिकोन असतो, त्यातून त्यांचे हे उद्योग अव्याहतपणे सुरू असतात. मध्यप्रदेशात काही शिकारी टोळ्या आहेत. त्यापैकी बहेलिया जमातीची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. या टोळीने पंचवीस वाघांची शिकार करण्याची सुपारी घेतल्याच्या बातम्या येत आहेत. चं्रपूर जिल्ह्यात गेल्या महिनाभरात ज्या तीन वाघांच्या हत्या झाल्या, त्यामागे अशा टोळीचा हात असल्याचा संशय आहे.
या सगळ्या परिस्थितीत केवळ व्याघ्रप्रकल्प केला किंवा मोहीम राबवली म्हणजे पुरेसे ठरत नाही. त्यासाठी प्राधान्याने बफर क्षेत्राबाहेरचे जंगल वन्यप्राणी व्यवस्थापनाखाली आणण्याची आवश्यकता आहे. अलीकडे स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स (एसटीपीएफ) नावाची यंत्रणा कार्यरत केली आहे. वाघ वाचवण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची मानसिकता तयार होणे आवश्यक आहे, आणि महत्त्वाचे म्हणजे राजकीय इच्छाशक्ती हाही महत्त्वाचा भाग आहे.
वाघ वाचवा, वाघ वाचवा म्हणून घोषणा देऊन भागणार नाही. वाघ वाचवण्याची गरज का आहे, याबाबतही आवश्यक ती जाणीवजागृती करण्याची आवश्यकता आहे. वाघ हा जंगलाचा कुटुंबप्रमुख आहे, असे मानले, तर कुटुंबप्रमुखाच्या रक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे. वाघ वाचला तर जंगल वाचेल, जंगल वाचले तर जंगलातील वन्यजीव वाचतील. जंगल ही नदीची आई आहे, असे म्हटले जाते आणि ते खरेही आहे. बहुतेक नद्या जंगलातच उगम पावतात. जंगल पाणी देते, म्हणजे जंगले टिकली तर पाणी टिकेल आणि पाणी टिकले तर मनुष्य टिकेल, अशी ही नैसर्गिक साखळी आहे. केवळ वाघ वाचवणे म्हणजे वाघाला वाचवणे नव्हे, तर त्यात माणूस वाचवणे, असाही छुपा संदेश आहे.
याच अनुषंगाने बीएनएचएस, नागपूरचे टायगर सेलचे प्रकल्पप्रमुख संजय करकरे म्हणतात, ‘‘वाघ हा आजच्या काळात जंगलचा राजा आहे, परंतु हा राजा स्वत:चे संरक्षण स्वत: नाही करू शकत. त्यासाठी माणसानेच सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. या सुविधा, त्याच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न, पाणी, जंगल (निवारा) आणि संरक्षण. नैसर्गिक साखळी टिकवणे महत्त्वाचे आहे. या साखळीत प्रत्येक जिवाचे महत्त्व आहे. वाघ नसतील तर हरणे वाढतील आणि त्यांचा जंगलावर ताण येईल. ती शेतीचे नुकसान करतील. साखळीतला प्रत्येक दुवा महत्त्वाचा आहे, एक दुवा जरी निखळला तरी त्याचा परिणाम मनुष्यजातीवर होईल. एका वाघाला जगण्यासाठी वर्षभरात  हरणे लागतात. माणूस हरणे मारून खाऊ लागला आणि वाघासाठी हरणे कमी पडू लागली, तर आपोआप वाघ गाई-गुरांकडे वळेल, कारण वाघ गवत नाही खाऊ शकत. एकूण काय तर माणसाने नैसर्गिक श्रंखलेत ढवळाढवळ केली, तर त्याचे दुष्परिणाम त्यालाच भोगावे लागणार.’’
 एकूण काय तर, माणसाच्या हस्तक्षेपामुळे वाघांसाठी परिस्थिती बिकटच आहे. कारण खाणी वाढताहेत, त्यांचे जंगलांवर अतिक्रमण होते आहे. ऊर्जा प्रकल्पांसाठीही नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताण येतोय. हा ताण वाघांसाठी, पर्यायाने माणसांसाठी हानीकारक आहे. बफर क्षेत्राच्या संरक्षणासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. नाहीतर वाघ फक्त संरक्षित क्षेत्रातच उरतील, वाघांची बेटे शिल्लक राहतील आणि प्रत्यक्षात त्या बेटांवर वाघ उरणार नाहीत. कारण जंगलांची सलगता ही महत्त्वाची बाब आहे. एक जंगल दुसऱ्या जंगलाला जोडणारे हवे. असे कॉरिडॉर नसतील, तर वाघांची संख्या वाढणार नाही. एकूणच वाघ वाचवण्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्ती हवी आहे. देशाच्या भौगोलिक क्षेत्रापैकी फक्त तीन टक्के संरक्षित क्षेत्र आहे, या तीन टक्क्य़ांसाठी आग्रह धरला नाही, तर एकूणच माणसाच्या अस्तित्वापुढे प्रश्नचिन्ह निर्माण होईल.

टिप्पण्या

  1. वाघ जगलेच पाहिजे आणि त्यांच्यासाठी सरकारी पातळीवरून प्रयत्न झाले पाहिजे.
    बाईक च्या पाठी मुलगी हवी कि वाघ अशी बाष्कळ विधान करून भ्रूण हत्या व वाघांची उगाच सरमिसळ कशाला काही लोक करतात हेच मला उमजत नाही.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर