पोस्ट्स

जून, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कुंबळे नावाचा जादूगार !

इमेज
अनिल कुंबळेची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली, ही बातमी भारतीय क्रिकेटच्या कुणाही चाहत्याला आनंद देणारी आहे. कुंबळेसारख्या उमद्या खेळाडूकडं नवी जबाबदारी सोपवण्यात आली. सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या भारतीय संघातील कुंबळेच्या सहकाऱ्यांनीच ही निवड केलीय. संघासाठी प्रशिक्षक किती महत्त्वाचा असतो हे जाणतात, त्याचप्रमाणं कुंबळे किती उत्तम सहकारी, मित्र आणि मार्गदर्शक आहे, हेसुद्धा तिघं उत्तम रितीनं जाणतात. म्हणूनच तर अनेक दिग्गज नावं स्पर्धेत असताना त्यांनी कुंबळेची निवड केली. संघव्यवस्थापनाचा भाग म्हणून प्रशिक्षकाची भूमिका महत्त्वाची असते, हे अनेकदा दिसून आलंय. ग्रेग चॅपेल प्रकरणात तर प्रशिक्षकाचं उपद्रवमूल्य काय असतं, हेही सगळ्यांनी अनुभवलंय. कुंबळेच्या निवडीला महत्त्व येतं ते त्यामुळंच. मार्गदर्शनाचा बडेजाव कुणीही करेल, पण कुंबळे नव्यातल्या नव्या खेळाडूचा मित्र बनू शकतो. त्यांना उभारी देऊ शकतो. क्रिकेट हा सभ्य माणसांचा खेळ आहे, असं म्हटलं जायचं. परंतु तो भूतकाळ झाला. कसोटी, साठ षटकांची वन डे, पन्नास षटकांची वन डे, टी-२० असं क्रिकेटचं विश