पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राज ठाकरे पुढे गेले, मागे फक्त गंमत उरली !

पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, असे अलीकडच्या काही वर्षांत सातत्याने बोलले जाते. कोल्हापूर, सांगली, सातारा, सांगली, सोलापूर आणि पुणे या पाच जिल्हयांत ५८ पैकी केवळ १९ आमदार राष्ट्रवादीचे आहेत. काँग्रेसच्या संख्याबळाएवढेच शिवसेना-भाजपचे संख्याबळ आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घेतली, तर एकेकाळच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला शिवसेना-भाजप युतीने कसे खिंडार पाडले आहे, हे लक्षात येते. याचाच अर्थ या प्रदेशातील मतदार कुठल्या एका पक्षाशी, विचारांशी किंवा नेत्याशी बांधिलकी मानणारा राहिलेला नाही. वारे बदलेल, तशी मतदारांची दिशा बदलत असते. हीच गोष्ट लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्याची सुरुवात इथून केली असावी. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या या कथित बालेकिल्ल्यातच गेल्या काही महिन्यांत सरकारविरोधात तीव्र असंतोष व्यक्त होतोय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी ऊस दरासाठी केलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारविरोधातील उद्रेकाचे दर्शन घडले. सांगली, सातारा आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांतील