पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सुप्रिया आणि पंकजा

इमेज
      महाराष्ट्राला राजकारणातील स्त्रियांची सशक्त परंपरा असली तरी गेल्या चोपन्न वर्षांत स्त्री मुख्यमंत्री लाभली नाही, हे पुरोगामी महाराष्ट्राचे शल्य आहे. अलीकडच्या काही वर्षांत त्याचा वारंवार उच्चार होतोय आणि त्यासाठी काही नावेही घेतली जात आहेत. त्यातले पहिले नाव आहे Supriya Sule यांचे. शरद पवार यांच्या कन्या असलेल्या सुप्रिया यांचे नाव गेल्या सहा-सात वर्षांपासून महाराष्ट्राच्या संभाव्य मुख्यमंत्री म्हणून घेतले जात आहे. परंतु ते घेताना घेणाऱ्यांचे त्यामागचे छुपे हेतूही लक्षात आल्यावाचून राहात नाहीत. मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा बाळगून असलेले अजित पवार यांच्या मार्गात विघ्न आणण्याच्या उद्देशाने सुप्रिया यांचे नाव पुढे केले जाते. त्याआधारे टीव्हीच्या पडद्यावर पवार कुटुंबातला राजकीय संघर्ष काल्पनिकरित्या रंगवता येतो. राजकारणात नवख्या असताना केवळ शरद पवार यांच्या कन्या म्हणून त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी घेतले जात होते, हेही लक्षात घेतले पाहिजे. सुप्रिया सुळे यांच्याबरोबरच दुसरे एक नाव अलीकडेच पुढे येत आहे, ते Pankaja Palve यांचे. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या असलेल्या पंकजा