पोस्ट्स

2014 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वाघ, माणूस आणि संशोधक

इमेज
बेळगावजवळच्या खानापूर परिसरात जवळजवळ सव्वा महिना एका नरभक्षक वाघामुळे हलकल्लोळ माजला होता. वाघाला गोळ्या घालून ठार मारल्यानंतर परिसर भीतीच्या छायेतून मुक्त झाला. खरेतर खानापूर परिसराला वाघाचे तसे अप्रूप नाही. बेळगाव वनविभागांतर्गत असलेल्या खानापूर तालुक्यातील जंगलांत सहा ते सात वाघ आहेत. तालुक्यातील नागरगाळी, लोंढा, भीमगड व कणकुंबी या वनक्षेत्रातच वाघांचे अस्तित्व आहे. सन २०११-१२ मध्ये भीमगडला अभयारण्याचा दर्जा मिळाला. त्यामुळे भीमगड वेगळे वनक्षेत्र बनले. अभयारण्याचे कायदे लागू झाल्याने या वनक्षेत्राला संरक्षण लाभले. परिणामी वाघांची संख्या वाढू लागली. बेळगावपासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या भीमगडच्या जंगलात १९ नोव्हेंबरला वनखात्याने एक नरभक्षक वाघ सोडला. या वाघाने चिकमंगळूर येथे एका महिलेचा बळी घेतला होता. त्यानंतर त्याला बेशुद्ध करून पकडण्यात आले होते. तिथून दांडेलीच्या जंगलात सोडण्यासाठी नेले, मात्र स्थानिक लोकांनी तीव्र विरोध केल्यामुळे वनखात्याचे लोक वाघाला घेऊन खानापूरच्या भीमगड जंगलात आले. स्थानिक लोकांना कल्पना न देताच वाघ जंगलात सोडण्यात आला. ही वार्ता कळताच पर

यशवंतराव आणि शरदराव, पृथ्वीराज, देवेंद्र....

इमेज
२५ नोव्हेंबरची पहाट. प्रीतिसंगमाचा रम्य परिसर. हवेत गारवा होता. गारठा जाणवत होता. दरवर्षी या सुमारास गोठवून टाकणारी थंडी असते, तशी यंदा नव्हती. यशवंतरावांना जाग आली. खरंतर रात्रीपासूनच त्यांना काहीशी अस्वस्थता जाणवत होती. बेचैनी नव्हे, पण हुरहूर लागून राहिली होती. दरवर्षी २५ नोव्हेंबर येतो.पण यशवंतरावांची आजची अस्वस्थता थोडी वेगळी होती. महिनाभरापूर्वी राज्यातली परिस्थिती बदलली आहे. नवे राज्यकर्ते आले आहेत. त्यांची राजकीय विचारसरणी वेगळी आहे. त्यांचे राजकारणातले आदर्श वेगळे आहेत. अशा परिस्थितीत आजचा दिवस कसा असेल ? एरव्ही कोण येईल आणि कोण येणार नाही याचा विचार कधी त्यांच्या मनाला शिवला नाही. आजही असा विचार मनात येण्याचे काही कारण नव्हते. पण तसे विचार येत होते ही वस्तुस्थिती होती. यशवंतरावांनी मनोमन ठवरले. फार बोलायला नको. फार लोकांशी बोलायला नको. पण ज्यांच्याशी बोलणे गरजेचे आहे , त्यांच्याशी तेवढेच बोलू. किमान आपला महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलाय, हे तरी विचारू. अभिवादन करायला येणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना पाहून यशवंतरावांना मागच्यावेळची गंमत आठवली. म्हणजे बारा मार्चची. असाच साय

नक्षत्रबनाची धोंडेवाडी

इमेज
साता-याजवळील धोंडेवाडी हे छोटेसे गाव महात्मा गांधीजींच्या कल्पनेतल्या ग्रामस्वराज्याचे आदर्श उदाहरण म्हणून ओळखले जाते. श्रमदानातून ग्रामविकासाबरोबरच बचतगटाच्या माध्यमातून लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असतात. लोकसहभागातून विकसित गावाचे मॉडेल म्हणून धोंडेवाडीने आपली ओळख निर्माण केली आहे. वीस वर्षांपूर्वी धोंडेवाडी अत्यंत मागास म्हणून ओळखली जात होती. खेडोपाडी अशी अनेक मागास गावे असतात , ज्यांना पंचक्रोशीतले लोग अडाणी गावे म्हणून संबोधतात. धोंडेवाडीची तशीच स्थिती होती. ‘ जग सुधारेल पण धोंडेवाडी सुधारणार नाही ’, असे पंचक्रोशीतले लोक बोलायचे. गाव तसे आडवळणीच. त्यामुळे एसटी येत नव्हती. कुठल्याही सर्वसाधारण गावाप्रमाणे इथेही अस्वच्छतेचेच साम्राज्य असायचे. गावात एकही शौचालय नव्हते. त्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य असायचेच पण महिलांची गैरसोयही व्हायची. जवळच असलेल्या आंगापूर गावचे माणिक शेडगे शेतात जायचे , तेव्हा धोंडेवाडीची शाळकरी मुले भेटायची. त्यांच्याशी ते संवाद साधाययचे. गावातल्या मुलांशी संवाद सुरू झाल्यावर तोच संवाद त्यांना धोंडेवाडी गावात घेऊन गेला. गावातली प

जबाबदारी पतंगरावांची !

इमेज
   सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला राज्याच्या इतर भागांमध्ये लक्षणीय यश मिळाले असले तरी सांगली जिल्हा वगळता दक्षिण महाराष्ट्रात फारसा थारा मिळालेला नाही. विधान परिषद सदस्य चंद्रकांत पाटील यांच्याकडे सहकार खाते देऊन दक्षिण महाराष्ट्रात भाजपचा पाया विस्तारण्याची जबाबदारी सोपवलेली दिसते. सत्ता गमावल्यामुळे सैरभैर झालेले काँग्रेस-राष्ट्रवादीचे विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे तिसऱ्या-चौथ्या फळीतील कार्यकर्तेही आता भाजपची वाट धरतील. ज्यांचा राज्याच्या राजकारणावर फारसा परिणाम होणार नसला तरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांच्या राजकारणाच्यादृष्टिने उपयोग होऊ शकतो. पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी या सत्ताच अधिक महत्त्वाच्या ठरतात. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे त्या पक्षाचे राज्यपातळीवरील नेते सत्तेच्या सावलीत राहतील, मात्र त्यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांना कुत्रेही विचारणार नाही. ना धड सत्तेत ना विरोधात अशा अवस्थेत त्यांना राजकीय अस्तित्वासाठी कुठलातरी एक पर्याय निवडावा लागेल. ज्यांना सत्तेचे लाभ किंवा संरक्षण हवे असेल ते भ