पोस्ट्स

जून, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मुंडे आणि पवार

इमेज
शरद पवार यांना विरोध या सूत्राच्या आधारे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकांनी करिअर केले. ग्रामपंचायतीवर निवडून येण्याची क्षमता नसलेल्या नेत्यांना काँग्रेसने केवळ पवारांचा विरोधक या एकमेव निकषावर राष्ट्रीय पातळीवरची पदे दिली. विरोधी पक्षातही अनेकांनी पवार यांना टार्गेट करून आपले राजकीय बस्तान बसवले. गोपीनाथ मुंडे यांनीही महाराष्ट्र भाजपचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर शरद पवार हेच आपले टार्गेट ठेवले आणि राजकीय पातळीवर त्यांच्याशी कधीच तडजोडीची भूमिका घेतली नाही. अनेकदा मुंडे यांचा पवारविरोध हा शत्रुत्वाच्या पातळीवर गेल्यासारखा वाटत होता, परंतु दोन्ही नेत्यांची समज एवढी पक्की होती, की   जेव्हा जेव्हा ऊसतोडणी कामगारांचा किंवा साखर कारखानदारीसंबंधी कोणताही प्रश्न निर्माण झाला, तेव्हा दोघांनीही जाहीरपणे एकत्र येऊन चर्चा केली. मार्ग काढला. पवारांवर टीका करणारे, त्यांचा द्वेष करणारे अनेक आहेत. त्यांच्याविरोधात कारस्थाने करणारे अनेकजण आहेत. अशा अनेकांनी राजकीय पातळीवर अनेकदा पवारांशी तडजोडी केल्या. गोपीनाथ मुंडे हे राजकीय पातळीवर पवारांशी कधीही तडजोड न करणारे एकमेव नेते होते. सुरुवातीला त्यां