पोस्ट्स

डिसेंबर, २०१० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दादोजींचे समर्थक आणि जेम्स लेनचे भाईबंद

पुणे महापालिकेने बहुमताने ठराव मंजुर केल्यानंतर पुण्यातील लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलवण्यात आला आणि भारतीय जनता पक्ष-शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन सुरू केले. इथे एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे, ती म्हणजे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊंची बदनामी करणारे जेम्स लेनचे पुस्तक प्रसिद्ध झाले, त्यावेळी त्याच्या निषेधासाठी यापैकी कुणीही रस्त्यावर उतरले नव्हते. उलट त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शेजारी उभे राहून तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे मोल सांगत होते. त्याच सुमारास पुण्यात शिवसेना कार्यकर्त्यांनी हल्ला केलेल्या बहुलकरांची माफी मागायला राज ठाकरे पुण्याला गेले होते. राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेनेपेक्षा वेगळी नाही, हे त्यांनी यानिमित्ताने पुन्हा दाखवून दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा या सगळ्यांच्या रोजी-रोटीचा विषय आहे. केवळ छत्रपतींचे नाव घेत त्यांनी समाजामध्ये विद्वेषाची बीजे पेरली आणि त्या बळावर महाराष्ट्राची सत्ता मिळवली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यहननाचा विषय

पृथ्वीराजांचा आसूड !

साहित्य समेलनाच्या अखेरच्या दिवशी समारोप समारंभात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आसूड कडाडला आणि अवघे मराठी सारस्वत थरारून गेले. यापुढे भाषा आणि साहित्य व्यवहारात सरकारशी जपून व्यवहार करावा, लागेल याचीच जाणीव साहित्य व्यवहारातील कारभाऱ्यांना झाली. नथुराम गोडसेच्या नावाचा वाद उद्भवल्यानंतर मुख्यमंत्री साहित्य संमलनाच्या समारोपाला येणार किंवा नाही याबाबत सर्वानाच उत्सुकता होती. ठाण्यातील काँग्रेसच्या एका गटाने तर त्यांना निवेदन देऊन संमेलनाला येऊ नये, अशी विनंती केली होती. असे असूनही मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेल्या निमंत्रणाचा मान राखून संमेलनाला हजेरी लावली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीचा लाभ घेऊन महामंडळाने भिक्षेकरी वृत्तीचे दर्शन घडवत स्वत:च्या पदाधिकाऱ्यांसाठी सरकारी मंडळांवर प्रतिनिधित्वाची आणि घटकसंस्थांच्या अनुदानवाढीची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी या मागण्यांची दखलही घेतली नाही, आश्वासन तर दूरच राहिले. नथुराम गोडसेच्या वादाचा थेट नामोल्लेख टाळून त्यांनी साहित्य संमेलनाचे संयोजक आणि महामंडळाचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा उपयोग समाजाचा बुद्धी

नकुसा नव्हे लाडकी…

लातूर जिल्ह्यातील चाटा गावातील प्रीतीलता सुरवसेला परवा युनिसेफ आणि सह्या्री वाहिनीच्या वतीनं सन्मानित करण्यात आलं. प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीनं वाटचाल करणाऱ्या नऊ बालिकांचा सत्कार करण्यात आला, त्यात प्रीतीलताचा समावेश होता. ही प्रीतीलता म्हणजे नकुसा. वडिलांना हवा होता मुलगा आणि झाली मुलगी. तिच्या जन्माची किंमत आईला घटस्फोटाच्या रुपानं चुकती करावी लागली. अंगणवाडी कर्मचारी असलेल्या आईनं सत्यशीलाच्या पाठिंब्यानं ती चित्रपटसृष्टीत आली असून इथे करिअर करण्याची जिद्द बाळगून आहे. प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीनं वाटचाल करणाऱ्या नऊ बालिकांचा युनिसेफ आणि सह्या्री वाहिनीच्यावतीनं नुकताच सन्मान करण्यात आला. त्यावेळी प्रीतीलताला ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. भारताची फुलराणी सायना नेहवाल नकोशा मुलींपैकीच एक. तिनंच अलीकडं एका मुलाखतीत हे सांगून टाकलं. पण या नकोशा मुलीनं केवळ कुटुंबालाच नव्हे, तर देशाला अभिमान वाटावा असं कर्तृत्व गाजवलं. प्रातिनिधिक स्वरुपातली कर्तृत्ववान मुलींची अशी अनेक नावं सांगता येतील. मुलींचं घटतं प्रमाण ही भारताचीच नव्हे तर सर्वच दक्षिण आशियाई

मोहिते-पाटलांचे पुनर्वसन

महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदी विजयसिंह मोहिते-पाटील यांची निवड करून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले, परंतु त्यासाठी त्यांना एक वर्षाहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागली. मोहिते-पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला राष्ट्रवादी काँग्रेसने एक वर्षाहून अधिक काळ तिष्ठत ठेवले, हा कृतघ्नपणाच म्हणता येईल. प्रत्येक नेत्याच्या राजकीय जीवनात चढउतार असतात, त्याप्रमाणे मोहिते-पाटलांच्या राजकीय आयुष्यातला हा कठिण काळ होता. नेतृत्वाकडूनच खच्चीकरण होत असताना त्यांच्यापुढे पक्षत्यागाचा पर्याय होता. राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याग करून ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार हवा मधल्या काळात तयार झाली होती, परंतु आपण शरद पवार यांच्या नेतृत्वाखालीच काम करणार असल्याचे स्पष्ट करुन त्यांनी त्यावर पडदा टाकला होता. तरीही त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता होतीच. आणखी तिष्ठत ठेवले असते तर नजिकच्या काळात वेगळे काही घडले नसतेच असे नाही. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर दीर्घकाळ वर्चस्व ठेवले, त्याचवेळी राज्याच्या राजकारणातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल

पवार आणि मुंडे

शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांचे वाढदिवस बारा डिसेंबरला मोठय़ा झोकात साजरे करण्यात आले. समाजातील शेवटच्या घटकाशी बांधिलकी मानून काम करणारे नेते म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात पवार आणि मुंडे यांची ओळख आहे. दोघेही सध्या दिल्लीच्या राजकारणात आहेत. दोघांची तुलना करणे तसे कठिण आहे. तुलना केली तर त्यातून मुंडेंना पवाराच्या जोडीला आणून त्यांचे मोठे डिजिटल पोस्टर बनवल्यासारखे किंवा पवारांना मुंडेंच्या पातळीवर आणणेही योग्य ठरणार नाही. कट्टर राजकीय विरोधक असले तरी दोघांच्याही वाटचालीत काही परस्परपूरक बाबी आहेत. शरद पवार हे काँग्रेस आणि गोपीनाथ मुंडे हे भारतीय जनता पक्षाशी संबंधित राहिले. दोघांचाही प्रवास राष्ट्रीय पक्षांच्या माध्यमातून झाला, परंतु शरद पवार यांनी दोन वेळा राष्ट्रीय पक्षाविरुद्ध बंड पुकारून स्वत:ची वेगळी वाट चोखाळली आणि आज स्वत:च्या वाटेवरून मार्गक्रमण करीत आहेत. मुंडे यांनी मात्र पक्षाच्या छत्रछायेखालीच आपला प्रवास सुरू ठेवला, त्यातही प्रमोद महाजन यांच्यासारखा गॉडफादर पक्षात होता, तोर्पयत महाराष्ट्र भाजपचे नेतृत्व त्यांच्याकडे राहिले. महाजन यांच्या मृत्युनंतर मात्र मुंडे पक्षात

एका ‘सुपारी’ची डायरी

आम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स्पाँटेनिअस ओव्हरफ्लो म्हणतात तशी भस्सकन ओळ आली, ‘आम्हाला वगळा गतप्रभ होतील राजकारणे..’ आजच्या काळात इतकी वास्तवदर्शी ओळ कुणाला सुचायची टाप नाही. काव्यगायनाच्या सुपाऱ्या घेऊन गावोगावी िहडणाऱ्या कवींनी तर नादच करायला नको. सुपारी अंगातच असावी लागते. छपरी मिशा वाढवल्या आणि बटवा बाळगून सुपारी चघळली म्हणून इतकं वास्तववादी सुचणार नाही, मिस्टर नायगावकर. त्यासाठी कवितेतली सुपिरिअ‍ॅरिटी नव्हे तर वागण्या-बोलण्यात आणि जगण्यातही सुपारिअ‍ॅलिटी हवी. कवींचा एवढा राग राग का करतेय, असं वाटत असेल ना तुम्हाला? कशासाठी त्यांच्याबद्दल प्रेम बाळगायचं? बाईच्या जातीला धार्जिण असलेल्या या कवडय़ांना सुपारीची अ‍ॅलर्जी का म्हणते मी? सगळं चालतं त्यांना. ताडीमाडीब्रँडीव्हिस्कीतंबाखूसिगारेट. फक्त सुपारीचं वावडं. ते कोण एक बापट कवी वसंत समाजवादी, जायाचंच की कवातरी पट्दिशी म्हणायचेत कुठल्याही स्टेजवरून. त्यांनी लिहिली होती एक कविता सुपारीवर. काय तर म्हणे कवितेतला नायक लग्न झालेल्या

एका पत्रकाराची डायरी

माणसाच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या अनेक घटना असतात. स्वातंत्र्यसैनिकाची पेन्शन सुरू झाल्यानंतर एकदा आमचे आजोबा म्हणाले होते की, महात्मा गांधीजींच्या हाकेला ओ देऊन घरादारावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्यलढय़ात झोकून दिलं, तो त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग होता. अब्राहम लिंकन, हिटलर, साने गुरुजी, एपीजे अब्दुलकलाम, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, माधव गडकरी, सुधीर गाडगीळ, अशोकराव चव्हाण, बाबासाहेब पुरंदरे, सिंधुताई सपकाळ, कवी चं्रशेखर गोखले, संगीतकार सलील कुलकर्णी, मोहन जोशी, सुधीर भट अशा आपापल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या थोर थोर लोकांनी जो काही नावलौकिक मिळवला तो काही असा तसाच नाही. आयुष्याला कलाटणी देणारा एखादा प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडल्यामुळेच ते शक्य होऊ शकले. आमचे मोठे काका म्हणायचे की, चौथीच्या वर्गात असताना एकदा गृहपाठ केला नाही, म्हणून मास्तरांनी ओल्या फोकेनं फोकळलं, त्यादिवशी दप्तर टाकूनच त्यांनी शाळेला पाठ दाखवली. तो त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग. पुढं त्यांनी राजकारणात करिअर करून झेडपीच्या अध्यक्षपदार्पयत मजल मारली. आपल्या आयुष्याला कलाटणी देणारी अशी

भुजबळ यांच्या पंचसूत्रीची दिशा

सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटनमंत्री तसेच अखिल भारतीय समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी नुकताच पुणे येथे समता मेळावा घेतला. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर आणि भुजबळ यांच्याकडील उपमुख्यमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे गेल्यानंतर थेट पवारांच्या बालेकिल्ल्यात मेळावा होत असल्यामुळे त्याची उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने दुखावल्यानंतर शक्तिप्रदर्शन करण्यासाठी भुजबळ यांनी मेळाव्याचे आयोजन केले असल्याची चर्चा सुरू झाली. खरेतर महाराष्ट्रातील सत्तांतराचे नाटय़ अत्त्युच्च बिंदूवर असतानाच त्याची चर्चा सुरू झाली होती. ज्या दिवशी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या दहा मंत्र्यांचा शपथविधी झाला,(त्यात भुजबळ यांचाही समावेश होता.) त्याच दिवशी सायंकाळी भुजबळ यांनी राज्यपाल के. शंकरनारायणन यांची भेट घेतली होती. या भेटीसंदर्भातील ब्रेकिंग न्यूज झळकल्या होत्या आणि अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. पुण्यातील मेळाव्याप्रसंगी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण राज्यपालांच्या हस्ते झाले. त्यावरून भुजबळ यांच्या त्या बहुचर्चित भेटीमागचे कारणही स्पष्ट होते.