पोस्ट्स

मे, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

‘रयत’ पुढचे Challenge

इमेज
रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षनिवडीच्या निमित्ताने जो काही धुरळा उडाला, त्यामुळे महाराष्ट्राच्या Education Field मध्ये अल्पकाळ का होईना, चर्चा-उपचर्चांना उधाण आले. शरद पवार यांची अध्यक्षपदी फेरनिवड झाल्यामुळे वादळ शांत झाले आहे. शिक्षण क्षेत्राचे पावित्र्य जपणाऱ्या ‘रयत’सारख्या संस्थेसंदर्भात असा वादाचा धुरळा उडवण्यामागे संस्थेच्या हितापेक्षाही कारभारासंदर्भात संशयाचे पिल्लू सोडून देण्याचा विचार असू शकतो. त्यामुळे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची Responsibility पुढील काळात अधिक वाढली आहे.  शिक्षण हे समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे, हे ओळखून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९१९मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. शताब्दीकडे वाटचाल करणाऱ्या संस्थेचा आज महाराष्ट्रातील १४ आणि कर्नाटकातील एका अशा १५ जिल्ह्यांमध्ये विस्तार झाला असून विविध प्रकारच्या ६७३ शाखा   कार्यरत आहेत. गेली पंचवीस वर्षे संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी शरद पवार यांच्याकडे आहे. तसे पाहिले तर संस्थेमध्ये Presidentपद हे नामधारी आहे. नियमित कामकाजामध्ये Chairmanपद महत्त्वाचे असते. प्रा. एन. डी. पाटील यांनी अनेक वर्षे चेअरमनप