पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

U. R. Ananthamurthy आणि मराठी पलायनवाद

इमेज
कन्नड भाषेत लिहिणारे ज्येष्ठ साहित्यिक U. R. Ananthamurthy social networking साइट्सवर फेरफटका मारतात किंवा नाही, हे माहीत नाही. परंतु तिकडे ते थोडेसे डोकावले तरी आपल्याविरोधात जनभावना किती प्रक्षुब्ध आहेत, हे त्यांना दिसून येईल. खरेतर त्यातल्या अनेकांना U. R. Ananthamurthy यांचे नावगावपत्ता ठावठिकाणा माहीत नाही. नाहीतर केव्हाच त्यांची गठडी वळून विमानातून त्यांचे पार्सल सातासमुद्रापार रवाना केले असते. अनंतमूर्ती यांनी जो प्रमाद केला आहे आणि ज्या व्यक्तिविरोधात आवाज उठवला आहे, त्या व्यक्तिच्या समर्थकांच्या भावना म्हणजे नुसत्या ठिणग्या असतात. मोदींना पंतप्रधान करण्याच्या नुसत्या कल्पनेनेच त्यांची मने एवढी प्रज्वलित झाली आहेत, की कधीही भडका उडून त्यात अनंतमूर्तींसारखे अनेकजण भस्मसात होऊन जातील. आजच अनेक मोदी समर्थकांनी भारतातून बाहेर जाणाऱ्या एकतर्फी विमानतिकिटाचे पैसे वर्गणीद्वारे अनंतमूर्तींना मनीऑर्डरद्वारे पाठवले आहेत. चुकून माकून मोदी पंतप्रधान झाले, तर विचारायलाच नको. अनंतमूर्तींसारख्या शंकडो विचारवंतांची गठडी वळून हे समर्थक विमानात कोंबतीलच, पण पुढे वाटेत समुद्रातही फेकून द्य