पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गोहत्याबंदीचे अव्यवहार्य राजकारण

इमेज
   कार्तिकी एकादशीला पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सरकारी पूजा केली जाते. यंदा वारकऱ्यांच्या काही संघटनांनी सरकारी पूजा होऊ न देण्याचा निर्धार केला होता, ऊसदरप्रश्नी आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही सरकारी पूजेला विरोध केला, त्यामुळे अजित पवार यांनी कार्तिकीची पूजा टाळली. पंढरपूर हे समतेचे पीठ मानले जाते आणि वारकरी संप्रदायानेच ही ओळख पंढरपूरला मिळवून दिली आहे. विठ्ठलाला बडव्यांनी घेरल्याची चर्चा अनेक वर्षांपासून केली जाते. नुकतेच बडव्यांचे देव उठले. परंतु अलीकडच्या काळात वारकऱ्यांमध्ये घुसलेल्या जातीयवादी प्रवृत्तींमुळे समतेचे हे पीठ बदनाम होत आहे.   वारकऱ्यांमधल्या जातीयवादी प्रवृत्तींनी जादूटोणाविरोधी विधेयकाला सतत विरोध केला. बंडातात्या कराडकर हे वारकरी संप्रदायातले रा.स्व.संघ आणि विश्वहिंदू परिषदेचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्यामार्फत हिंदुत्ववादी शक्ती आपले विषय रेटत असतात. गोहत्याबंदी कायद्याचा विषयही अशाच प्रकारे पुढे आणण्यात आला आहे. राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर असताना तत्कालीन दुग्धविकासमंत्री नारायण राणे यांनी गोवंश हत्य