पोस्ट्स

जानेवारी, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संमेलनाच्या व्यासपीठावरून पवारांचे राजकारण

चिपळूणच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले. पवार यांच्या हस्ते तिसऱ्यांदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले आहे. पवार हे महाराष्ट्राचे ‘संस्कृतिपुरूष’ आहेत, असे त्यांच्या समर्थकांना वाटते. समर्थकांना काय वाटावे हा समर्थकांचा प्रश्न. परंतु अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनवाले पु्न्हा पुन्हा त्यांना का बोलावतात कुणास ठाऊक ? स्थानिक संयोजक बोलावतात आणि महामंडळवाले माना डोलावतात. पवार म्हणाले होते की, ‘मला आवडत नाही संमेलनाला जायला, परंतु स्थानिक लोक बोलावतात म्हणून मी जातो.’ उद्घाटक म्हणून निमंत्रण नसताना पवार आपणहोऊन संमेलनाला किती वेळा गेले आहेत, याचा शोध घेतला तर तसे काही दिसत नाही. पवार यांना उद्घाटक म्हणून बोलावण्यामागे एक व्यवस्थित नियोजन असते. यावेळीही तसेच नियोजन करण्यात आले. पवारांचे संमेलनातील भाषण तर त्यावर शिक्कामोर्तब करणारे होते. एकेकाळी सामाजिक प्रश्नांबद्दल ठाम भूमिका घेणारे शरद पवार काळाच्या प्रवाहात किती बदललेत, हे त्यांच्या भाषणावरून लक्षात येते. त्यांच्या भाषणांतील चार मुद्देच उदाहरणादाख