पोस्ट्स

2012 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राजकीय सामना

सुमारे ३८ वर्षांपूर्वी आलेल्या ‘सामना’ चित्रपटात एक सत्ताधीश कारखानदार आणि फाटका स्वातंत्र्यसैनिक यांच्यातील संघर्ष पाहायला मिळाला होता. हिंदुराव धोंडे-पाटलांची सगळी कारस्थाने उघड केल्यानंतरही मास्तर त्यांच्याकडे येऊन म्हणतात, ‘तुमचं पोरकं झालेलं राज्य तुम्हाला परत बोलावतंय...’ धोंडे पाटलांना अटक झाल्यावर मास्तर मुक्काम हलवून पुढच्या प्रवासाला लागतात. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून साक्षात काळाकडे.... काळाबरोबर संघर्ष, संघर्षाची जातकुळी आणि उद्देश बदलत गेले. सगळीच क्षेत्रे एवढी राजकारणग्रस्त झाली, की चळवळी त्यापासून अलिप्त राहू शकत नव्हत्या. परिणामी, नेत्याचे राजकारण सुरू झाले की, चळवळीचा ऱ्हास सुरू होतो. या पार्श्वभूमीवर सध्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या चळवळीचा विचार केला, तर अनेक बाबी निदर्शनास येतात. ऊस दरासाठीची पश्चिम महाराष्ट्रातील चळवळ गेल्या दहा-बारा वर्षातील आहे. ( ऊसदर मिळेपर्यंत महिनाभरच ती चालते.)   त्याआधी कारखानदार जो दर देतील तोच शेतकरी घेत होते. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली चळवळ उसाच्या क्षेत्रात ख

जयप्रभा स्टुडिओसाठी वाटाघाटींचा पर्याय

  कोल्हापूरच्या सांस्कृतिक जडणघडणीचा सहभागी साक्षीदार असलेला जयप्रभा स्टुडिओ जपायला पाहिजे, याबाबत कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. परंतु केवळ भावनिक मुद्दा बनवून कोणताही प्रश्न सुटत नाही, हे लक्षात घेतले जात नाही. जयप्रभा स्टुडिओच्या बाबतीत अगदी सुरुवातीपासून दोन्ही बाजूंनी प्रश्न अनावश्यक ताणवत नेला. कोल्हापूरची चित्रपटसृष्टी जिवंत ठेवण्यासाठी जयप्रभा स्टुडिओ वाचला पाहिजे की चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांचे स्मारक म्हणून त्याचे जतन झाले पाहिजे, याबाबत स्पष्ट भूमिका व्यक्त झालेली नाही. जयप्रभा स्टुडिओ वाचवण्याचे आंदोलन हे लता मंगेशकर यांच्या विरोधातले आंदोलन म्हणून उभे राहिले. ते आंदोलन उभे राहायलाही हरकत नव्हती, परंतु आंदोलनादरम्यान लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्याविरोधात ज्या रितीने संताप व्यक्त झाला, त्यामुळे कटुता निर्माण झाली.     जयप्रभा स्टुडिओ वाचवण्याचे आंदोलन सुरू झाले, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्यावतीने. ते स्वाभाविक होते आणि ती महामंडळाची जबाबदारीही होती. परंतु आंदोलनात कोल्हापुरातील सामाजिक संस्था, संघटना सहभागी झाल्या आणि आंदोलनाचे नियंत्रण महामंडळाच

ग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव

इमेज
 पंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे लिहित होतो ती कविता होती किंवा नाही हेही समजत नव्हतं. कोल्हापूरला कॉलेजला होतो. एप्रिल महिना असावा. सूर्य आग ओकत होता. रस्त्यावरचं डांबरही वितळून त्याचे छोटे छोटे बुडबुडे येत होते. पावलांचे ठसे त्यावर ठसठशीतपणे उमटत होते. केशवराव भोसले नाटय़गृहाजवळ देवल क्लबच्या जुन्या इमारतीसमोर रस्त्यावर एक मळकट कागद पडला होता. कुतूहल म्हणून तो उचलला तर त्यावर ‘ गाव ’ नावाची कविता होती - आभाळ जिथे घन गर्जे/ते गांव मनाशी निजले /अंधार भिजे धारांनी/घर एक शिवेवर पडले.. अन् पाणवठय़ाच्या पाशी/खचलेला एकट वाडा/मोकाट कुणाचा तेथे/कधिं हिंडत असतो घोडा.. झाडांतून दाट वडाच्या/कावळा कधीतरि उडतो/पारावर पडला साधू/ हलकेच कुशीवर वळतो.. गावांतिल लोक शहाणे/कौलांवर जीव पसरती/पाऊस परतण्याआधी/क्षितिजेंच धुळीने मळती.. - तसल्या उन्हात रस्त्याच्या मधोमध उभ्याउभ्याच कविता वाचून संपवली , तेव्हा पाय उचलता येईना. पाहिलं तर रस्त्यावरच्या डांबरात पायातलं स्लीपर रुतून बसलं होतं. ते तुटणार

संमेलनाची वाटचाल साहित्याकडून अर्थकारणाकडे

 चिपळूण येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन् होत आहे.   संमेलन चिपळूणमध्ये होणार हे , निश्चित झाल्यापासून अध्यक्षपदासाठीच्या इच्छुक उमेदवारांनी जो वाद सुरू केला आहे , तो मराठी साहित्य जगताला नवा नाही. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने होणारे वैचारिक वाद मागे पडून असल्या फालतू गोष्टींना अलीकडे महत्त्व येऊ लागले आहे आणि ते एकूण आजच्या वाड्.मयीन संस्कृतीशी आणि सारस्वतांच्या वैचारिक वकुबाशी सुसंगत असेच आहे. महामंडळाच्या घटक संस्थेचा सदस्य असलेल्या कुणालाही अध्यक्षपदाची निवडणूक लढवता येत असल्यामुळे हजार-पाचशेच्या पावतीचा सदस्य असलेल्या कुणी अक्षरशत्रूही अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतो. अध्यक्षपदासाठी मोठे साहित्यिक योगदान किंवा समज वगैरेची गरज नसते. प्रचार करून , दोघा-तिघांना चितपट करून अध्यक्षपद मिळवणाऱ्यांनी फार मोठे वैचारिक दिवे लावले आहेत , असेही अलीकडच्या काळात दिसलेले नाही. गतवर्षीच्या वसंत आबाजी डहाके यांच्या भाषणातील काही पानांचा अपवाद वगळता अलीकडच्या अध्यक्षांची भाषणे रद्दीत घालण्याच्या योग्यतेचीच आहेत. त्यात पुन्हा अध्यक्षपद लाभाचे बनल्यामुळे अनेक साहित्यिकांची हृदये त्यासाठी

येडियुरप्पांची मुजोरी

इमेज
 बूकानाकेरे सिद्धलिंगप्पा येडियुरप्पा हे कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदावरून  जुलै  रोजी पायउतार झाले , त्याला अकरा महिने झाले. म्हणजे अजून वर्षसुद्धा पूर्ण झालेले नाही. एकीकडे भारतीय जनता पक्षाने कें्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात रणशिंग फुंकले असताना अवैध खाणकाम प्रकरणी लोकायुक्तांच्या अहवालात येडियुरप्पा यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. त्यामुळे पक्षाने त्यांचा राजीनामा मागितला. परंतु येडियुरप्पा हे एवढे घमेंडखोर की , त्यांनी राजीनामा देण्यास साफ नकार दिला.  आमदारांसह  खासदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचे सांगून त्यांनी पक्षनेतृत्वाविरोधात बंडाचे निशाण फडकावले. साधनशुचिता आणि शिस्तीचा डांगोरा पिटणाऱ्या भारतीय जनता पक्षाने अशा प्रकारचे प्रसंग भूतकाळात पाहिले असले तरी येडियुरप्पांचे प्रकरण जरा जास्तीच हाताबाहेर गेल्यासारखे होते. त्यात नितीन गडकरी यांना जुमानायचे नाही , असाच पवित्रा त्यांनी घेतला होता. परंतु त्यांचे सगळेच वर्तन संघाच्या आणि भाजपच्या शिस्तीच्या परंपरेला सुरुंग लावणारे असल्याने ते कोणत्याच नेत्याला आणि गटाला मानवणारे नव्हते. त्यामुळे मिळून

मंत्रालय जळाले, प्रवृत्तीही जळाव्या

इमेज
  ‘ चंद्रपूर किंवा आणखी कुठल्या तरी लांबच्या जिल्ह्यात झोपडय़ांना आग लागली , पाच-सातशे झोपडय़ा जळून खाक झाल्या , सगळ्या लोकांचे संसार उघडय़ावर आले आणि माणसांच्या जीवन-मरणाचा कितीही निकडीचा प्रश्न असला तरी तो विषय मंत्रालयात आल्यावर ‘ एक फाईल ’ यापलीकडे त्याला फारशी किंमत नसते. तिथं माणसं कितीही टाचा घासत असली तरी मंत्रालय आपल्या गतीनं चाललेलं असतं. इथल्या लोकांना कुणाची काही पडलेली नसते.. ’ मंत्रालयात काम करीत असूनही संवेदनशील असलेले एक अधिकारी मंत्रालयाच्या कामकाजासंदर्भात सांगत होते. सरकारी सेवेतलेच आणखी एक सचोटीने काम करणारे अधिकारी आहेत. अनेक वर्षे मंत्रालयात काम केलेले , परंतु सध्या मंत्रालयाच्या इमारतीत नाहीत , ते म्हणाले , ‘ मंत्रालयात काम करताना मला नेहमी जाणवायचं , की या इमारतीत प्रचंड निगेटिव्हव व्हायब्रेशन्स आहेत. इथं कधीही काहीतरी वाईट घडू शकतं. परवा आग लागल्यावर मला त्याची प्रचिती आली. ’ फेसबुकवर उथळपणे बडबड करणाऱ्या लोकांच्या या प्रतिक्रिया नाहीत किंवा सरकारी यंत्रणेविषयी द्वेषाची पेरणी करणाऱ्या सिव्हिल सोसायटीतल्या कुणा वाचाळवीरांच्याही प्रतिक्रिया नाहीत. मंत्राल

गोविंदराव पानसरे : कष्टकऱ्यांच्या चळवळीचा आधारस्तंभ

इमेज
महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीत कोल्हापूरचे नेतृत्व फारसे ठळकपणे दिसत नाही. रत्नाप्पा कुंभार , बाळासाहेब देसाई एवढीच नावे चटकन लक्षात येतात. सत्तेच्या राजकारणात कोल्हापूर पिछाडीवर असले तरी प्रबोधनाच्या चळवळीसाठी मात्र कोल्हापूरने सातत्याने महाराष्ट्राला नेतृत्व दिले. राजर्षी शाहू महाराज , भाई माधवराव बागल , कॉम्रेड संतराम पाटील , कॉम्रेड यशवंत चव्हाण , प्रा. एन. डी. पाटील , कॉम्रेड गोविंदराव पानसरे , राजू शेट्टी या नावांवर नजर टाकली तरी प्रबोधनाच्या चळवळीसाठी , कष्टकऱ्यांच्या लढाईसाठी कोल्हापूरने महाराष्ट्राला काय दिले आहे , याची कल्पना येते. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टने गोविंदराव पानसरे यांना शाहू पुरस्कार जाहीर करून महाराष्ट्रातील चळवळींचा आधारस्तंभ बनलेल्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला आहे. वयाची अमृतमहोत्सवी वाटचाल केलेल्या गोविंदराव पानसरे यांच्या आयुष्यातील सहा दशके कोल्हापुरात गेली. अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार हे त्यांचे गाव. कोल्हार ते कोल्हापूर असा त्यांचा विलक्षण प्रवास आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेले गोविंदराव पंधराव्या वर्षी पत्की गुरुजींच्