पोस्ट्स

मे, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वाघ कशासाठी वाचवायचे ?

इमेज
चं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि ते त्याची हत्या करण्याच्या तयारीत आहेत. परंतु वनखात्याचे लोक वाघाची हत्या करणाऱ्या लोकांवर गोळ्या झाडून त्यांना ठार करतात आणि वाघाचे प्राण वाचवतात.. लहान मुलांच्या गोष्टीच्या पुस्तकातसुद्धा अशी गोष्ट बाळबोध वाटेल. परंतु अशा बाळबोध व्यवहारावरच सरकारचे गाडे चाललेले असते. वाघाची शिकार करताना कुणी आढळल्यास गोळ्या घालण्याचा आदेश हा त्यातलाच प्रकार आहे. वाघ वाचवण्यासाठी प्रत्यक्षात काही करायचे नाही आणि खूप काही करतो आहोत , असे भासवण्याचे प्रयत्न केले जातात. केवळ महाराष्ट्रापुरते नव्हे , तर संपूर्ण देशभर अशीच परिस्थिती आहे. वाघ वाचवण्याची नुसती आवाहने केली जात आहेत. त्यासाठी मोहिमा राबवल्या जात आहे , तरीही वाघांच्या हत्या होतच आहेत. मध्ये आतार्पयत   वाघांच्या हत्या झाल्यात. चं्रपूर जिल्ह्यात गेल्या महिनाभरात तीन वाघांच्या हत्या होणे केवळ धक्कादायकच नव्हे , तर नामुष्कीजनक आहे. याच आठवडय़ात चं्रपूर-लोहारा रस्त्यावर वाघाच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले होते

व्यंगचित्र आणि संसदेचा शाळकरी गोंधळ

इमेज
‘ देशातील जनतेच्या आशाआकांक्षा आणि मूलभूत तत्त्वांना सामावून घेणारी संहिता सादर करणाऱ्या आपल्या घटनाकारांचे शहाणपण आणि त्यांच्या दूरदृष्टीचा हा परिपाक आहे. अनेक देशांच्या घटना केवळ कागदी गठ्ठयांमध्ये बंदिस्त राहिल्या असताना ही अतिशय गुंतागुंतीची संहिता केवळ कागदोपत्री न राहाता आपल्या जगण्यातले वास्तव बनले त्यामागे हेच कारण आहे. भारताची राज्यघटना हा एक आगळा दस्तावेज आहे , जो इतर अनेक देशांच्या घटनांसाठी पथदर्शक ठरला. यात प्रामुख्याने दक्षिण आफ्रिकेचे नाव घ्यावे लागेल. तीन वर्षाच्या प्रदीर्घ आणि अखंड शोधामागील मुख्य उद्देश हा घटनेत योग्य संतुलन साधण्याचा होता , जेणेकरून घटनेनुसार ज्या संस्थांची निर्मिती करावयाची आहे , त्या केवळ तात्पुरत्या , घाईघाईत केलेल्या न ठरता प्रदीर्घ काळासाठी भारतीय जनतेच्या आकांक्षांना सामावून घेण्याचे सामथ्र्य त्यांच्यात निर्माण व्हावे. ’ - एनसीईआरटीच्या अकरावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकातील पहिल्या प्रकरणाचा हा निष्कर्ष आहे. ज्या प्रकरणामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वादग्रस्त व्यंगचित्र आहे , त्या प्रकरणाच्या समारोपामध्ये हा निष्कर्ष दिला आहे.

जादूटोणाविरोधी विधेयकाला मुहूर्त मिळेल का ?

दिवेआगरच्या सुवर्ण गणेशाच्या चोरीनंतर संपूर्ण राज्यभर गदारोळ उठला. कुठेही चोरी होणे आणि चोरटे लवकर न सापडणे या बाबी कायदा-सुव्यवस्थेच्यादृष्टिने भूषणावह नसतात , हे खरेच. परंतु ज्यांचे राजकारणच देव-धर्माच्या आधारावर चालते , त्या शिवसेना भाजपच्या नेत्यांनी या चोरीवरून जो काही गहजब केला , तो फक्त त्यांनाच शोभून दिसणारा होता. मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांनी दिवेआगरला भेट दिली नाही म्हणून शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी टीका केली. मुख्यमंत्री वगैरे मंडळी दिवेआगरला जाऊन काय करणार होती , हा प्रश्न वेगळा. मूर्तीचोरीच्या घटनेनंतर त्याचे राजकारण करण्यासाठी काही तासांत तिथे धडकणाऱ्या उद्धव ठाकरे यांना दुष्काळी भागात जाण्यासाठी मात्र दोन महिने वाट पाहावी लागली , यावरून त्यांचे प्राधान्यक्रम काय आहेत , हे लक्षात येते. त्यांच्या असल्या वृत्तीमुळेच महाराष्ट्रातील जनतेने त्यांना एकदा सत्तेवरून खाली उतरल्यानंतर नंतर सत्तेच्या परिघात फिरकू दिलेले नाही. दिवेआगरच्या घटनेनंतर तरी शहाण्यासुरत्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी , की जागृत देवस्थान वगैरे म्हटले जाते , त