डाव्यांचे नवे रक्तचरित्र
‘ एकाला गोळी घातली , दुसऱ्याला भोसकले आणि तिसऱ्याला मरेर्पयत मारले.. ’ हे कुठल्या सिनेमाच्या कथेतले वर्णन नव्हे किंवा एखाद्या सुपारी किलरने खासगी बैठकीत मारलेली बढाईही नव्हे. केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने जाहीर सभेत ही कबुली दिली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी -मध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या कशा हत्या केल्या , याचे वर्णन माकपचे एक ज्येष्ठ नेते एम. एम. मणी यांनी केरळमधील मुवत्तुपुझा येथील जाहीर सभेत केले. त्यामुळे केरळसह संपूर्ण देशभर खळबळ उडाली असून भारतीय कम्युनिस्ट पक्षानेही याबाबत माकप नेतृत्वाकडे खुलाशाची मागणी केली आहे. जाहीर सभेत मणी म्हणाले की , पक्षाला किंवा मार्क्सवादी विचारधारेला विरोध करणाऱ्यांची यादीच आम्ही बनवली होती , पासून अशा कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यात आल्या. बेबी अँचेरी यांना नोव्हेंबर मध्ये गोळी घालून ठार केले. जानेवारी मध्ये मुल्लनचिरा मथाई यांना बेदम मारहाण करून ठार केले , तर जून मध्ये मुत्तुकड नानप्पन यांना भोसकून मारले. वीस वर्षापूर्वीच्या या घटनांना आ...