पोस्ट्स

सांस्कृतिक मांडवात उपरे राजकारण

   अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे सूप वाजले आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वेध लागले. तसे पाहिले तर नाटय़ संमेलन आणि साहित्य संमेलनाचा परस्परांशी संबंध नाही , तो असता तर दोन्हीं घटकांसाठी अधिक उपयुक्त ठरले असते. परंतु आपापल्या वकुबानुसार आपापल्या राहुटय़ांवर राज्य करायचे , असे सनातन संगनमत असल्याप्रमाणे दोन्हीकडची मंडळी परस्परांपासून सुरक्षित अंतर ठेवतात. नाटकवाली मंडळी साहित्य संमेलनात आली तर साहित्यिकांभोवतीची गर्दी त्यांच्याभोवती जमेल आणि साहित्यिक , समीक्षक नाटय़संमेलनाकडे गेले तर नाटकवाल्यांच्या मर्यादा उघडय़ा पडतील , असे काहीतरी असावे. त्यामुळे साहित्यिक नाटकापासून आणि नाटकवाले साहित्य संमेलनापासून फटकून राहतात. संमेलनांच्या निमित्ताने राजकीय मंडळींची उपस्थिती हा विषय दरसाल चर्चेत येत असतो. विशेषत: साहित्य संमेलनाच्या निमित्ताने त्याची अधिक चर्चा होत असते. यंदा नाटय़संमेलनाच्या काही आठवडे आधी रत्नाकर मतकरी सांगलीत एका कार्यक्रमासाठी गेले असताना त्यांनी संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेत्यांची लुडबूड असू नये , अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मतकरी हे साहित्य आ...

पवारांचा कबुलीनामा, मुंडेंचा गृहकलह वगैरे..

इमेज
  चार दशकांहून अधिक काळ राजकारणात असलेल्या शरद पवार यांचे राजकीय आयुष्य चढउतारांनी भरले असून त्यात नाटय़मय घटनांची रेलचेल आहे. त्यामुळे पवार यांच्या दरवेळच्या मुलाखतीतून नवी बातमी मिळते. पवारांनी गेल्या दशकभरात अशा अनेक बातम्या दिल्या आहेत. खंजिर प्रकरणापासून बाबरी मशीद पाडण्यार्पयतच्या घटनांसंदर्भातील आपली भूमिका सांगून संबंधित घटनांची वेगळी बाजू समोर आणली आहे. आपल्याशी संबंधित अनेक राजकीय घटनांवरचा धुक्याचा पडदा स्वत:च दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. अलीकडेच ‘ स्टार माझा ’ या वृत्त वाहिनीसाठी ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे आणि वाहिनीचे संपादक राजीव खांडेकर यांनी पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीने वृत्तपत्रांना काही बातम्या दिल्या. महाराष्ट्रातील नवे नेतृत्व , राष्ट्रवादीतील नेतृत्वाची विभागणी यासंदर्भात पवार मनमोकळेपणाने बोलले. याच मुलाखतीतून आणखी एका महत्त्वाच्या घटनेसंदर्भात पवार यांनी भाष्य केले आहे किंवा चुकीची कबुली दिली आहे. एकोणिसशे त्र्याण्णवमध्ये संरक्षणमंत्री पदावरून पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर आल्यानंतरची ही घटना आहे. एक्क्य़ाण्णवमध्ये नरसिंहराव पंतप्...

अण्णांच्या आंदोलनापुढचे अडथळे कोणते ?

इमेज
अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनापुढे सध्या कोणते अडथळे निर्माण झाले आहेत ? प्रकृती अस्वास्थ्यामुळे अण्णांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असून उपचारानंतर अण्णा राळेगणसिद्धी मुक्कामी विश्रांती घेत आहेत. अण्णांच्या प्रकृतीला आराम पडो आणि लवकरात लवकर बरे होऊन त्यांनी पुन्हा समाजकारणात सक्रीय व्हावे , अशी प्रार्थना देशभरातील लोक करीत आहेत. अण्णांनी सक्रीय व्हावे , याचा अर्थ त्यांनी निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होऊन काँग्रेसविरोधात रान उठवावे , असा होत नाही. परंतु टीम अण्णा म्हणून जो कंपू ओळखला जातो , त्यातील बहुतांश लोकांना दोन दिवसापूर्वीर्पयत तसे वाटत होते. त्यासाठीच त्यांनी कोअर कमिटीची बैठकीचा फार्स केला. बैठकीला अण्णा उपस्थित नसल्यामुळे निर्णय झाला नाही , असे सांगण्यात आले. टीमच्या म्होरक्यांनी राळेगणमध्ये येऊन अण्णांची भेट घेतली आणि त्यानंतर निवडणुक प्रचारात उतरणार नसल्याची घोषणा केली. काँग्रेसला मतदान करू नका , असे आम्ही जेव्हा सांगतो तेव्हा कुणाला मतदान करायचे असे लोक विचारतात आणि त्याचे उत्तर सध्या आमच्याकडे नाही , त्यामुळे आम्ही प्रचार करणार न...

विकलांग आंदोलनाला ‘राजकीय’ संजीवनी

  माणसाची उंची माणसाएवढीच राहणे योग्य असते. परंतु राजकारण , समाजकारणात स्वत:च्या प्रतिमेपेक्षा मोठी पोस्टर्स लावून आपण प्रत्यक्षात जेवढे आहोत त्यापेक्षा अधिक मोठे आहोत , अशा भ्रमात वावरणाऱ्या मनोरुग्णांची संख्या वाढली आहे. अण्णा हजारे यांच्या भोवतीच्या कोंडाळ्याने त्यांचे भव्य पोस्टर बनवले , अण्णांना गांधीजींपेक्षा मोठे भासवण्यासाठी त्यांचे होलसेल मार्केटिंग केले. प्रतिमेपेक्षा मोठे पोस्टर बनवले तेव्हाच , त्याला कितीही बाजूंनी टेकू दिले तरी ते कोलमडण्याची हमी होती आणि तसेच घडले. अपेक्षित पाठिंबा आणि प्रकृतीची साथ न मिळाल्यामुळे अण्णांना मुंबईतील तीन दिवसांचे उपोषण दुसऱ्याच दिवशी मागे घ्यावे लागले. त्याबरोबर गेले नऊ महिने भावनिक लाटांवर आरूढ होऊन उन्मादाने उसळणारे एक आंदोलन अकाली विकलांग झाले. अण्णा आणि त्यांची सिव्हील सोसायटी विरुद्ध घटना आणि संसदेचे सार्वभौमत्व मानणारे अशा दोन गटांमध्ये तुंबळ हमरीतुमरी सुरू होती. देशातील तमाम प्रसारमाध्यमे अण्णांच्या बाजूने क्रांतीची मशाल घेऊन मैदानात उतरली होती. अण्णा आणि त्यांच्या चौकडीचा उन्माद एवढा होता , की अण्णांना विरोध करणारा तो...

अण्णांचा अहंकार आणि राहुलचा गांधीमार्ग

 आपली चळवळ भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे , की काँग्रेसच्या विरोधात याबद्दलच अण्णा हजारे यांचा गोंधळ झालेला दिसतो , परंतु त्यात आश्चर्य वाटण्याजोगे काहीही नाही. अण्णांच्या आजवरच्या वाटचालीत असे अनेक गोंधळाचे टप्पे दिसतील . अण्णांनी दिल्लीत झेंडा रोवण्यापूर्वी त्यांच्याबाबतीत एक गोष्ट ठामपणे म्हणता येत होती , ती म्हणजे अण्णांचा वापर कुणीही करून घेऊ शकते , परंतु अण्णांना कुणी मॅनेज करू शकत नाही. महाराष्ट्राच्या पातळीवर वावरत असताना अण्णांनी तेवढे सत्त्व जपले होते , परंतु केजरीवाल-किरण बेदी-मनीष शिसोदिया-प्रशांत भूषण वगैरे चौकडीने त्यांचा ताबा घेतला तेव्हापासून अण्णांच्या बाबतीतले सगळे अंदाज चुकायला लागले असून चौकडीच्या हातातले बाहुले बनून अण्णा वागायला लागले आहेत. अण्णांच्या गांधी प्रतिमेचे भांडवल करून दिल्लीत गर्दी जमते आणि वृत्तवाहिन्यांवर ओसंडून कव्हरेज मिळते , हे लक्षात आल्यामुळे त्याचा लाभ घेऊन काँग्रेसविरोधी वातावरण तापवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. अण्णांच्या आंदोलनामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे , असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस दिग्वीजय सिंग यांनी यांनी केला ...

शरद पवार : खंबीर आणि स्पष्टवक्ते

इमेज
  इंडिया टुडे साप्ताहिकाने अलीकडेच केलेल्या एका सर्वेक्षणात तरुणांच्यादृष्टीने सर्वात तिरस्करणीय राजकीय नेते म्हणून शरद पवार पहिल्या क्रमांकावर असल्याचे आढळून आले. हा सव्‍‌र्हे देशातील पाच महानगरांमध्ये केलेला आहे. महानगरी तरुणांच्या संवेदना , राजकीय समज हा सगळाच मामला गोंधळाचा असल्यामुळे ते देशातील तरुणांच्या भावनांचे प्रातिनिधिक चित्र ठरू शकत नाही. अण्णा हजारे आणि त्यांच्या चांडाळ चौकडीने गेले काही महिने संसदीय व्यवस्था , राजकीय नेते यांच्यासंदर्भात जे द्वेषाचे वातावरण निर्माण केले आहे , त्याचे प्रतिबिंब यातून दिसून येते. म्हणूनच तर मनमोहन सिंग यांच्यासारख्या स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यालाही तिरस्करणीय नेत्यांच्या यादीत तिसरे स्थान मिळते. शरद पवार यांचा एकाहत्तरावा वाढदिवस साजरा होत असताना आदल्याच आठवडय़ात आलेल्या या सव्‍‌र्हेची नोंद घेणे क्रमप्राप्त ठरते. राजकारणातील कुणीही व्यक्ति अजातशत्रू किंवा सर्व थरांत लोकप्रिय असू शकत नाही. शरद पवार यांच्या राजकीय प्रवासात तर एखाद्या उत्कंठावर्धक सिनेमाची सामग्री आहे. अष्टय़ाहत्तरमध्ये त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून पुलोदचा प्रयोग...

निळा कोल्हा, गांधीजी वगैरे…

निळ्या कोल्ह्याची गोष्ट बहुतेकांना माहीत आहे. भूक लागल्यामुळे गावात शिरलेल्या कोल्ह्याच्या मागे कुत्री लागतात , तेव्हा कोल्हा एका धोब्याच्या घरात शिरतो आणि जीव वाचवण्यासाठी पिंपात लपून बसतो. त्या पिंपात नीळ असते. कुत्री निघून गेल्याचा अंदाज घेऊन थोडय़ा वेळाने निळीत भिजलेला कोल्हा बाहेर येतो आणि जंगलात धूम ठोकतो. निळ्या कोल्ह्याला पाहून कोण हा विचित्र प्राणी आला म्हणून वाघ , सिंहासह सारे प्राणी घाबरून जातात. निळ्या रंगामुळे सगळे घाबरल्याचे लक्षात आल्यावर कोल्हा परिस्थितीचा ताबा घेतो आणि म्हणतो , ‘ मला ब्रह्मदेवाने तुमच्या रक्षणासाठी पाठवले आहे. आजपासून मी तुमचा राजा असेन. ’ ब्रह्मदेवाचीच आज्ञा असल्याचे मानून वाघ , सिंहासह सगळे प्राणी त्याचा जयजयकार करतात. कोल्हेराजाची राजवट सुरू होते. एके दिवशी दरबार भरलेला असतानाच राज्याबाहेर कोल्हेकुई सुरू होते. त्याबरोबर निळ्या महाराजांच्या अंगावर रोमांच उभे राहतात आणि भावनातिरेकात तेही आपल्या बांधवांच्या सुरात सूर मिसळून ओरडू लागतात. भर दरबारात सोंग उघडे पडते तेव्हा सारे प्राणी त्याच्यावर हल्ला करतात.. सोंग घेतले की असेच होते. सोंग असो कि...