पोस्ट्स

ज्ञानपीठ? छे ! साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हवे!

यंदाचं साहित्य संमेलन बडोद्यानं नाकारल्यानंतर स्थळनिश्चितीसाठी वसई , सासवड , चं्रपूर असा दौरा करून चं्रपूरवर शिक्कामोर्तब झाले. यानिमित्तानं साहित्य संमेलन आणि तत्संबंधी व्यवहाराची चर्चा सुरू असतानाच ज्ञानपीठ पुरस्कारांची घोषणा झाली. ज्ञानपीठ पुरस्कार ही भारतीय साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रातील मोठी घटना मानली जाते , परंतु मराठी साहित्यिकाला पुरस्कार मिळत नाही , तोवर आपल्याला त्याची एका मर्यादेपलीकडे जाऊन दखल घ्यावीशी वाटत नाही. आपल्यादृष्टीने अखिल भारतीय संमेलन , त्यानिमित्ताने होणारी अध्यक्षपदासाठीची निवडणूक , संमेलनासाठी गोळा केल्या जाणाऱ्या देणग्या , स्वागताध्यक्षपदासाठीची चढाओढ , महामंडळाच्या पातळीवरील राजकारण या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आणि रंजक असतात , की ज्ञानपीठ ही त्यामानाने फारच नीरस गोष्ट असते. अर्थात हे सारे आपल्या वाड्.मयीन संस्कृतीला आणि मराठी उत्सवप्रियतेला साजेसेच असते. कोणताही व्यवहार करताना गल्लीतले वर्चस्व हाच आपला प्राधान्यक्रम असतो. राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय पातळीवर झटय़ाझोंब्या खेळून अनावश्यक शक्ती वाया घालवण्यात आपण रस घेत नाही. आणि त्या पातळीवर स्पर्धा अ...

संघटित मुजोरीने मुंबईकर हैराण

मुंबईचे शांघाय करण्याची घोषणा मागे पडली. दिवसेंदिवस बिघडत जाणारी इथली परिस्थिती पाहुन शांघाय दूर राहिले , किमान आहे त्या मुंबईचे विद्यमान अस्तित्व किती प्रमाणात जपता येते , अशीच चिंता करण्याजोगी स्थिती आहे. दहशतवादाच्या टांगत्या तलवारीमुळे मुंबईकरांना सदैव जीव मुठीत घेऊन वावरावे लागते. परंतु अलीकडच्या काळातील परिस्थिती पाहता एकवेळ दहशतवादी हल्ले परवडले , असे म्हणण्याची वेळ आली आहे. मुंबईकरांना रोजच्या जगण्यात वेठीला धरणाऱ्यांची घटकांची संख्या वाढायला लागली आहे आणि कोणतीही यंत्रणा त्यांच्यावर नियंत्रण ठेऊ शकत नाही. रिक्षा आणि टॅक्सी हे मुंबईकरांचे सगळ्यात मोठे दुखणे आहे. रिक्षाचालक किंवा टॅक्सीचालक हे कष्टकरी घटक आहेत , परंतु कष्टकरी म्हणून आदर किंवा सहानुभूती बाळगावी अशी परिस्थिती नाही. या कष्टकऱ्यांच्या अंगी असलेला माजोरीपणा मुंबईकरांना रोज अनुभवायला मिळतो. प्रवाशांना जिकडे जायचे आहे , तिकडे जाण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सीवाले कधीच तयार नसतात , तर त्यांना जिकडे जायचे आहे त्या मार्गावर येणाऱ्यांसाठीच त्यांची सेवा असते. टॅक्सीचालकांच्या अनेक संघटना आहेत , परंतु आपल्या संघटनेच्या सदस्या...

मोदी, अडवाणी आणि भ्रष्टाचारविरोधी यात्रा

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना जल्लोष करायला कोणतेही निमित्त पुरेसे असते. पक्षात विद्वान आणि पंडितांचा भरणा असल्यामुळे कोणत्याही गोष्टीचा निकाल आपल्याच बाजूने कसा लागला आहे , हे सांगण्यात त्यांचा हात कुणी धरू शकत नाही. त्याचे प्रत्यंतर वारंवार येत असते. गुजरात दंगलीची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आपला चौकशी अहवाल न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सादर करावा आणि मुख्यमंत्री नरें्र मोदी तसेच वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांसह जणांविरोधात पुढे कारवाई करण्याबाबतचा निर्णय न्यायदंडाधिकाऱ्यांनी घ्यावा , असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय पीठाने दिला आणि भाजपच्या गोटात एकदा जल्लोष सुरू झाला. खरेतर इथे सर्वोच्च न्यायालयाने निकाल काहीच दिलेला नाही , न्यायालयीन प्रक्रिया स्वाभाविकपणे पुढे सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत . परंतु हाही भाजपला आपला विजय वाटतो. गोध्राच्या घटनेनंतर अठ्ठावीस फेब्रूवारी दोन हजार दोन रोजी हिंसक झालेल्या जमावाने अहमदाबादमधील गुलबर्ग सोसायटीवर हल्ला करून सोसायटीतील रहिवाशांसह काँग्रेसचे खासदार एहसान जाफरी यांना पेटवून दिले होते. या घटनेत एकोणसत्तर लोकांचा मृत्यू...

मुली मारण्याचा अडीचशे कोटींचा धंदा

स्त्री भ्रूणहत्या ही राज्यापुढची सध्याची गंभीर समस्या आहे , म्हणूनच अनेक घटकांनी त्याप्रश्नी लक्ष घालून विविध पातळ्यांवर जाणीव जागृतीचे प्रयत्न सुरू केले आहेत. मुलींचे घटते प्रमाण आणि सोनोग्राफी सेंटर्स यांचा थेट संबंध एव्हाना चव्हाटय़ावर आला आहे. गर्भलिंग निदानाचा धंदा करणारे डॉक्टर्स ‘ गंदा है पर धंदा है.. ’ या धोरणानुसार भ्रूणहत्येची दुकानेच चालवीत आहेत. राज्यभरात साडेपाच हजारांहून अधिक सोनोग्राफी सेंटर्स असून मुंबई-ठाण्यातील त्यांची संख्या अडीच हजारांच्या घरात आहे. महाराष्ट्रातला संपन्न प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्राच्या संपन्नतेच्या भाळावर स्त्री भ्रूणहत्येचा कलंक ठळकपणे गोंदला गेला आहे. गरीबांना मुलीचे ओझे वाटते म्हणून मुलगी नको असते तर श्रीमंतांन इस्टेटीला वारस म्हणून मुलगा हवा असतो. इस्टेटीच्या वारसासाठी हपापलेल्या संपन्न प्रदेशात मुलगी नकोशी वाटते. या साऱ्या मानसिकतेचा लाभ उठवत सोनोग्राफी सेटर्स चालवणारे डॉक्टर आणि काही स्त्रीरोग तज्ज्ञांनी उखळ पांढरे करून घेतले. कोणतेही तंत्रज्ञान हे माणसाला उपयुक्त असते , परंतु सोनोग्राफीसारख्या तंत्रज्ञानाचा वापर विकृत म...

अण्णांची काठी आणि सरकारचा विंचू

राजधानी दिल्लीच्या स्टेजवर भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या चौसष्टाव्या वर्धापनदिनाच्या दुसऱ्या दिवसापासून अण्णा हजारे आणि कंपनीचा ग्रँड रिअ‍ॅलिटी शो सुरू झाला आहे. भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात एवढा टीआरपी अन्य कुठल्या कार्यक्रमाला क्वचितच लाभला असेल. अर्थात एखाद्या तासाभराच्या कार्यक्रमाला, एखाद्या रंगतदार क्रिकेट मालिकेतील अंतिम सामन्यातील अखेरच्या काही षटकांचा टीआरपी सर्वाधिक असतो. परंतु एका कार्यक्रमाला सलग इतके दिवस असा टीआरपी मिळवणारा शो म्हणून अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची नोंद करावी लागेल. राळेगणसिद्धीच्या छोटय़ाशा रंगमंचावर आतार्पयतची आंदोलने केलेल्या अण्णांनी मुंबईत आझाद मैदानावरही उपोषण केले होते, तेव्हा सुरेश जैन यांच्या इव्हेंटबाजीमुळे त्याची मोठी चर्चा झाली होती. लोकपालसाठी अण्णा पहिल्यांदा दिल्लीत गेले तेव्हा त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता, परंतु त्याचे स्वरुप आताच्या तुलनेत खूुपच किरकोळ होते. कदाचित अण्णांच्या सोबत जी मंडळी होती, त्यांनाही तेव्हा इव्हेंटच्या भव्यतेची कल्पना आली नसावी किंवा तो एवढा मोठा होऊ शकतो, याचा अंदाज आला नसावा. सरकारनेही फारशी ताणाताणी न करता सम...

ये दीवार गिरती ही नही..

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बाजारीकरण नुकतेच सुरू होऊन कसोटी क्रिकेटची जादू कमी होण्याचा आणि एकदिवसीय सामन्यांचे पर्यायाने झटपट क्रिकेटचे प्रस्थ वाढण्याचा काळ होता. अशा काळात राहुल ्रविडचे भारतीय संघात पदार्पण झाले. इंग्लंडविरुद्ध परवा लॉर्डसवरील कसोटीत शतक झळकावून ्रविडने भारतीय संघातील आपली उपयुक्तता सिद्ध केली आणि लॉर्डसवर शतक झळकावण्याचे आपले स्वप्न साकार केले. त्याच लॉर्डसवर पंधरा वर्षापूर्वी कसोटी पदार्पण करणाऱ्या ्रविडला अवघ्या पाच धावांनी शतकाने हुलकावणी दिली होती. ्रविडच्या बाबतीत एक गोष्ट सातत्याने जाणवते, ती म्हणजे क्रिकेटमध्ये हिमालयाएवढी कामगिरी करूनही राहुल ्रविड नावाच्या खेळाडूचे कर्तृत्व तेंडुलकरच्या सावलीत झाकोळले गेले. त्याच्या वाटय़ाला फारसे कौतुक कधीच आले नाही. परीकथेत नावडत्या राणीचा राजपुत्र जसा उपेक्षित असतो आणि आपल्या चांगुलपणाने सगळ्यांची मने जिंकण्याचा प्रयत्न करतो, तसाच राहुल ्रविड पंधरा वर्षे भारतीय संघासाठी जीव तोडून खेळत राहिला. एकेकाळी सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळातील सभ्यतेचा ऱ्हास झाल्याच्या काळात स्वत:च्या वर्तनाने नव्या पिढीपुढे एक...

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

परिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट’ ही आनंद विंगकर यांची कादंबरी केवळ सुन्न करीत नाही, तर मनात साकळून राहते. गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसंदर्भात कादंबरी, कथा, कविता अशा स्वरूपात मराठीत बरेचसे लेखन झाले आहे. कथा-कादंबऱ्यांमध्ये प्रामुख्याने शेतकऱ्याचे दु:ख, दैन्य; त्याने परिस्थितीशी केलेला झगडा आणि परिस्थितीपुढे हार मानून केलेली आत्महत्या असे चित्रणाचे स्वरूप राहिले. आत्महत्येच्या प्रसंगाने कादंबरीचा शोकात्म शेवट होतो. विंगकर यांची कादंबरी शेतकऱ्याची आत्महत्येच्या प्रश्नावरील असली तरी अनेक अर्थानी वेगळी आहे. इथे कादंबरीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच शेतकरी आणि त्याच्या पत्नीची आत्महत्या घडते आणि पुढे सबंध कादंबरी त्या घटनेभोवती फिरत राहते. अवघ्या चार-पाच दिवसांचा काळच कादंबरीत येतो, त्याअर्थाने पाहिले तर एका दीर्घकथेचा ऐवज आहे, परंतु आनंद विंगकर यांनी या छोटय़ाशा काळात असा काही जीव भरला आहे की, कादंबरी वाचकाला शोकात्म भावनांनी करकचून बांधून टाकते. यशवंता, पत्नी पा...