पोस्ट्स

मृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’

अखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दावा करणाऱ्याच्याबाबतीतही मृत्यू हेच अंतिम सत्य असल्याचे सिद्ध झाले. मार्चपासून त्यांच्याच ट्रस्टने उभारलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्याआधी अनेक दिवस ते आजारी होते, परंतु त्यांच्याच चेल्यांनी या भगवानाला साक्षात कैदेत ठेवल्यासारखे ठेवले होते. त्यांच्यावर काय उपचार सुरू होते किंवा उपचार सुरू होते की नव्हते याचीही कुणाला कल्पना नव्हती. एका भक्ताने न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यानंतर सत्यसाईबाबांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. लवकरच महाराज आश्रमात परत येणार असून भक्तांना दर्शन देणार आहेत, अशा वावडय़ा त्यांचे चेले उठवत होते, तेव्हा स्वत:ला साक्षात भगवान म्हणवून घेणारे सत्यसाईबाबा मृत्यूशी झुंज देत होते. ही झुंज अपयशी ठरली आणि रविवारी एप्रिलला रुग्णालयाच्या बंद खोलीत त्यांचे देहावसान झाले. चमत्कार होईल आणि बाबा रुग्णालयातून परत येतील, असे त्यांच्या भक्तांना वाटत होते. कारण स्वत: बाबांनीच आपण वर्षे जगणार ...

बाबासाहेबांचे बोट सोडून चाललेले अनुयायी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला अद्याप सार्वजनिक उत्सवाचे स्वरुप आलेले नाही. समाजातील सर्व घटकांनी आंबेडकर जयंती साजरी केली असे सगळीकडे दिसत नाही. अलीकडच्या काळात ग्रामीण भागात ग्रामस्वच्छता अभियानापासून तंटामुक्ती मोहिमेर्पयत अनेक योजना राबवण्यात येऊ लागल्या. सामाजिक सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होऊ लागले. त्यातूनच काही गावांमध्ये सर्व जाती-धर्माचे उत्सव गावाने एकत्रितपणे साजरे करण्यास सुरुवात झाली आहे. परंतु अशी गावे फारच थोडी आहेत. बाकी सगळीकडे आंबेडकर जयंती हा दलितांचा त्यातही पुन्हा नवबौद्धांचा उत्सव एवढय़ापुरताच मर्यादित राहिला आहे. पुरोगामी म्हणून ढोल वाजवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात महापुरुषांना जाती-धर्माच्या चौकटीतून आपल्याला बाहेर काढता आलेले नाही. जयंतीच्या निमित्ताने अनेक प्रश्न उभे राहतात. जयंतीच्या निमित्ताने महापुरुषांच्या कार्याची उजळणी करून त्यांच्या पावलांवरून चालण्याचा खोटा खोटा निर्धार करायचे सोडून अनाठायी प्रश्न उपस्थित करणे औचित्यभंग करणारे आहे, असे कुणी म्हणू शकेल. परंतु कधीतरी या प्रश्नांची चर्चा होण्याची गरज आहे आणि ती ज...

मूर्ख म्हातारा पुन्हा डोंगराला भिडला

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्ताला धडक दिली आहे. पतसंस्थांमधील भ्रष्टाचार, धान्यापासून दारुनिर्मिती किंवा तत्सम विषय घेऊन राळेगणसिद्धी ते मुंबई असे हेलपाटे मारणाऱ्या अण्णा हजारे नावाच्या रिकामटेकडय़ा माणसाच्या संयमाची परीक्षा महाराष्ट्र सरकारने अनेकदा पाहिली. अण्णांच्याबरोबर अनेक वेळा मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी बैठका घेतल्या. त्यांना तोंडभर आश्वासने दिली. अण्णांनी राळेगणसिद्धीला अनेकदा उपोषणाचा निर्णय जाहीर केला. सरकारने आपली खास माणसे पाठवून अण्णांना उपोषण स्थगित करण्याची विनंती केली. हेकेखोर मानल्या जाणाऱ्या या म्हाताऱ्याने प्रत्येकवेळी सरकारवर, सरकारच्या प्रतिनिधींवर विश्वास ठेवून आंदोलने स्थगित केली. तात्पुरत्या संकटातून सरकारची सुटका होत राहिली. परंतु दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी सरकारने कधीच ठोस पावले उचलली नाहीत. राज्यातील पतसंस्थांमध्ये सामान्य माणसांचे कोटय़वधी रुपये अडकून आहेत. आयुष्यभर जमा केलेली पूंजी अडकल्यामुळे अनेक सधन लोक अक्षरश: रस्त्यावर आले. सामान्य ठेवीदारांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. परंतु सहकाराला संरक्षण देणाऱ्या सरक...

गोंधळी नव्हे, गोंधळलेले विरोधक

महाराष्ट्राच्या विधानसभेत अर्थसंकल्प सादर होताना विरोधकांनी घातलेला गोंधळ, त्यावरून आमदारांचे निलंबन, विरोधकांनी कामकाजावर घातलेला बहिष्कार, गोंधळ घालणाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर निलंबन मागे घेण्याचा निर्णय आणि त्यानंतर मागे घेतलेला बहिष्कार असा खेळ सुमारे आठवडाभर रंगला. या काळातील विरोधकांचे वर्तन अत्यंत आक्षेपार्ह असून कोणत्याही पातळीवर त्यांचे समर्थन करता येत नाही. गोंधळ घालण्यामागची त्यांची नेमकी कारणे कोणती होती, त्यांचा विरोध अर्थमंत्री अजित पवार यांना होता की आघाडी सरकारला याबद्दलही स्पष्टता नसल्यामुळे विरोधकांच्या गोंधळापेक्षा त्यांचे गोंधळलेपणच अधिक ठळकपणे दिसून आले. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांची प्रतिमा अभ्यासू लोकप्रतिनिधी अशी आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली अधिक शहाणपणाची कृती आवश्यक होती. गेल्यावर्षीच्या अधिवेशनात सरकार आणि बिल्डर लॉबीचे संबंध चव्हाटय़ावर आणून खडसे यांनी सरकारला पळता भुई थोडी केली होती आणि विरोधी पक्षनेत्याच्या पदाला एका उंचीवर नेऊन ठेवले होते. खडसे यांनी सुरू केलेली ही मोहीम आदर्श सोसायटीच्या गैरव्यवहारार्पयत आली आणि त्यात अशोक चव्हाण यांच्य...

पुनर्वसनासाठी गरज सरकारी संवेदनेची

लोक प्रकल्पाला विरोध का करतात ? प्रकल्पांना विरोध करणारे सारेच विकासाचे विरोधक असतात का ? प्रकल्पासाठी घरादारासकट शेतीवाडीवर पाणी सोडणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्याप्रती सरकार आपली जबाबदारी नीटपणे पार पाडते का ? पुनर्वसनाची जबाबदारी असलेले सरकारी अधिकारी या प्रश्नाकडे कसे पाहतात ? तळागाळातल्या माणसार्पयत विकासाचे लाभ पोहोचवण्याची भाषा करणारे सरकार प्रकल्पग्रस्तांना का वाऱ्यावर सोडून देते ? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. हे प्रश्न आजचे नाहीत. किंवा कुठल्या एका सरकारसंदर्भातील नाहीत. कारण कोयना प्रकल्पग्रस्तांची परवड गेल्या पन्नास वर्षापासून सुरू आहे आणि राज्यातील हजारो प्रकल्पग्रस्तांच्या आयुष्याची आजही होरपळ होते, तरी त्याकडे सरकार संवेदनशीलतेने पाहात नाही. इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते, ती म्हणजे प्रकल्पग्रस्तांचे विस्थापन हे फक्त त्यांचे घरदार सोडून जाणे नसते. वेगवेगळ्या प्रकल्पांमुळे विस्थापित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. जिथे जन्म झाला, निम्मे आयुष्य खर्च झाले, ज्या परिसरात सगळे नातेसंबंध निर्माण झाले तो परिसर सोडून कुठल्या तरी अनोळखी प्रदेशात जाऊन वस...

सावित्रीबाईंना दगड मारणारे माफी कधी मागणार ?

जोतिरावांनी आपल्या पातळीवर प्रश्नांची मांडणी केली. काही प्रश्नांसाठी आंदोलनात्मक पावले उचलली, मात्र त्याच्या पुढची कामगिरी केली, ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी. भारतीय घटनेचे शिल्पकार या नात्याने डॉ. आंबेडकरांच्या समाजक्रांतीच्या विचारांचा प्रभाव भारतीय घटनेवर असणे अपरिहार्य होते. त्यांनी स्त्रियांच्या हक्कांना, तिच्या समतेला आणि मुक्तीला कायद्याचे रूप दिले. ‘एक व्यक्ती - एक मत’ एवढय़ापुरता त्यांनी स्त्री-पुरूष समानतेचा पुरस्कार केला नाही, तर त्याहीपुढे जाऊन ‘एक व्यक्ती - एक मूल्य’ असे नवे क्रांतिसूत्र देशातील स्त्रियांच्या हाती दिले. जगभरातील स्त्रियांना ज्यासाठी दीर्घकाळ लढे द्यावे लागले, त्या गोष्टी भारतातील स्त्रियांना देशाच्या स्वातंत्र्याबरोबर मिळाल्या. याची जाणीव असायलाच हवी आणि देशातील तमाम स्त्रियांनी जोतिराव, सावित्रीबाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती कृतज्ञ असायला हवे. काही वर्षापूर्वीची घटना आहे. ममता कुलकर्णी नावाची एक अभिनेत्री हिंदी चित्रपटसृष्टीत होती. तिचे आक्षेपार्ह छायाचित्र एका नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध झाल्यामुळे बरेच वादंग उठले होते. त्याप्रकरण...

महिलांच्या नेतृत्वाचा विकास कसा होणार ?

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. पवार यांची मागणी म्हणजे जवळजवळ निर्णयच आहे, असे मानता येण्याजोगी स्थिती आहे. त्यामुळे येत्या आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांचे आरक्षण तेहतीसवरून पन्नास टक्क्य़ांवर नेण्याचा निर्णय होईल यात शंका वाटत नाही. अन्य कुणी यासंदर्भातील मागणी करणे आणि शरद पवार यांनी मागणी करणे यात गुणात्मक फरक आहे. कारण शरद पवार हे महाराष्ट्रातील क्रांतिकारक अशा महिला धोरणाचे शिल्पकार आहेतच. शिवाय त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती होण्याच्या वर्षभर आधी त्यांनी महाराष्ट्रात टक्के आरक्षणाची अमलबजावणी केली होती. आता हेच धोरण अधिक व्यापक करण्यासाठी त्यांनी टक्के आरक्षणाच्या धोरणाचा पाठपुरावा सुरू केला आहे. स्थानिक सत्तेत पन्नास टक्के आरक्षणाचा निर्णय कें्रीय मंत्रिमंडळाने पूर्वीच घेतला आहे. राजकीय व्यवस्थेत महिलांचा सहभाग वाढावा आणि महिलांचे नेतृत्व विकसित व...