पोस्ट्स

भीमसेनजींचं जाणं, महाराष्ट्र आणि कर्नाटक

कुणाचंही निधन झालं की, आदरांजली वाहताना त्यांच्या जाण्यामुळं पोकळी निर्माण झाली, असं म्हणण्याची आपल्याकडं एक पद्धत आहे. अशी पोकळी निर्माण होणं म्हणजे काय, याचा अर्थ भीमसेनजींसारखा एखादा कलावंत किंवा कुसुमाग्रजांसारखा कवीश्रेष्ठ आपल्यातून निघून जातो तेव्हाच उमगतो. मराठी माणसांच्या नसांनसांतून वाहणाऱ्या संतवाणीला आपल्या पहाडी आवाजाचे कोंदण देणारे पंडित भीमसेन जोशी कृतार्थ जीवन जगले. अवघे गर्जे पंढरपूर..या ओळी पंडितजींच्या आवाजातून येतात तेव्हा पंढरपूरच्या वाळवंटाचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं आणि तिथला विठूनामाचा गजर मस्तकात घुमायला लागतो, एवढी ताकद त्यांच्या आवाजात होती. अशा कलावंताचं जाणं म्हणजे नेमकं काय असतं, याचा विचार करायला लागतो, तेव्हा त्या जाण्यानं निर्माण झालेल्या पोकळीची जाणीव अस्वस्थ करायला लागते. खरंतर भीमसेन जोशी यांचं गाणं ही रोज ऐकण्याची गोष्ट नाही किंवा त्यांच्या मैफिलीला दर महिन्याला हजेरी लावावी असंही काही नसतं कधी. म्हणजे आपल्या रोजच्या ऐकण्यात आणि गुणगुणण्यात नसलेल्या कलावंताचं जाणं अस्वस्थ करतं, कारण त्यांचं गाणं आपलं जगणं समृद्ध करणारं होतं. पंडितजींनी आयुष्यातल्या...

जातीवादाच्या भोवऱ्यात मराठा राज्यकर्ते

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पोलिसांवर हात टाकल्यानंतर पोलिसांनी त्यांना अमानुष मारहाण केली. यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या म्हणजे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यादृष्टिने महत्त्वाची ठरलेली आणि पथ्यावर पडलेली गोष्ट म्हणजे हर्षवर्धन जाधव हे मराठा आहेत. महाराष्ट्र सरकार आणि त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस मराठा धार्जिणे राजकारण करीत आहे, अशी कुजबूज आणि चर्चा वाढत असताना तसेच पुण्यात कथित लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचे शिल्प कापून टाकल्याची घटना ताजी असतानाच हर्षवर्धन जाधवांनी आगळिक केली आणि त्यांना पोलिसी प्रसाद मिळाला. चुकून माकून हर्षवर्धन जाधव ओबीसी समाजातील असते, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप झाला असता. मराठय़ांच्या राज्यात ओबीसींवर अत्याचार वाढले असल्याचे सांगून छगन भुजबळ यांनीच बंडाचे निशाण फडकावले असते. म्हणजे प्रत्यक्षात निशाण फडकावले नसते, परंतु आपल्या नाराजीच्या, बंडाच्या पावित्र्यात असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये पेरल्या असत्या. पक्षातील मराठा नेत्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा डाव त...

साखर हंगामापुढे जादा उसाचे संकट

महाराष्ट्राच्या साखर हंगामापुढची संकटे कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. शेतकऱ्याच्या आयुष्यात जसे कायमचे दुष्टचक्र असते, तसेच काहीसे साखर हंगामाचे झाले आहे. गेल्या काही वर्षातील हंगामांवर नजर टाकली तर दरवर्षी नव्या संकटाने ग्रासल्याचे दिसेल. हंगाम अडचणीत यायला कोणतेही कारण पुरेसे ठरते. उसाचे उत्पादन जास्त झाले तर त्याच्या गाळपाचा प्रश्न उभा राहतो आणि ऊस कमी पडला तरीही अडचणीचे ठरते. असे दोन्ही बाजूंनी संकट असते. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटर्पयत हंगाम सुरळीत पार पडला, शेतकरी खूश, संघटना खूश, कारखानदार खूश असे कधीच होत नाही. किंबहुना यापैकी कोणत्याही घटकाची अस्वस्थता साखर उद्योगासंदर्भात सातत्याने चर्चा होण्यासाठी आवश्यक असते. यंदा कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील कारखान्यांनी दोन हजार रुपये उचल दिल्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात मर्यादित ताण-तणाव राहिले. मात्र पुणे जिल्ह्यातील कारखान्यांनी कमी उचल दिल्यामुळे बारामती-इंदापूर परिसरात शेतकरी संघटनेने मोठे आंदोलन उभे केले. जाळपोळ, दगडफेक होऊन वातावरणाला हिंसक वळण लागले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्...

मंत्रालयातील जळमटे कशी काढणार?

महाराष्ट्र सरकार गेल्या अनेक वर्षापासून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवते, अलीकडे तंटामुक्ती अभियान राबवते. परंतु सरकारची उक्ती आणि कृती यात नेहमीच अंतर राहिले आहे. ग्रामस्वच्छता अभियान राबवून गावे स्वच्छ करायची, त्यानिमित्ताने माणसांच्या मनातली वादाची, मतभेदाची जळमटं काढून टाकण्यासाठी उपक्रम राबवायचे आणि त्याचवेळी राज्याचा कारभार जिथून चालतो त्या मंत्रालयातून मात्र भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहते, असे चित्र पाहायला मिळत होते. मंत्रालयातील कोणतीही फाईल वजन ठेवल्याशिवाय हलत नाही, नोकरशहा राज्यकर्त्यांना जुमानत नाहीत हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पृथ्वीराच चव्हाण आले म्हणून त्यात क्रांतिकारक बदल होऊन सगळा कारभार पारदर्शक होऊन जाईल, अशी अपेक्षा कुणी करीत असेल तर ते भाबडेपणाचे ठरेल. परंतु कारभार गतिमान करणे आणि शक्य तेवढी पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करणे यादृष्टिने त्यांनी काही पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या मुख्य सचिवपदी झालेली रत्नाकर गायकवाड यांची नियुक्ती हे त्याचेच निदर्शक आहे. गेले काही दिवस म्हणजे आदर्श गृहनिर्माण सोसायटीचे प्रकरण चव्हाटय़ावर आल्यापासून राज्याच्या प्रशास...

दादोजींचे समर्थक आणि जेम्स लेनचे भाईबंद

पुणे महापालिकेने बहुमताने ठराव मंजुर केल्यानंतर पुण्यातील लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलवण्यात आला आणि भारतीय जनता पक्ष-शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन सुरू केले. इथे एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे, ती म्हणजे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊंची बदनामी करणारे जेम्स लेनचे पुस्तक प्रसिद्ध झाले, त्यावेळी त्याच्या निषेधासाठी यापैकी कुणीही रस्त्यावर उतरले नव्हते. उलट त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शेजारी उभे राहून तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे मोल सांगत होते. त्याच सुमारास पुण्यात शिवसेना कार्यकर्त्यांनी हल्ला केलेल्या बहुलकरांची माफी मागायला राज ठाकरे पुण्याला गेले होते. राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेनेपेक्षा वेगळी नाही, हे त्यांनी यानिमित्ताने पुन्हा दाखवून दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा या सगळ्यांच्या रोजी-रोटीचा विषय आहे. केवळ छत्रपतींचे नाव घेत त्यांनी समाजामध्ये विद्वेषाची बीजे पेरली आणि त्या बळावर महाराष्ट्राची सत्ता मिळवली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यहननाचा विषय ...

पृथ्वीराजांचा आसूड !

साहित्य समेलनाच्या अखेरच्या दिवशी समारोप समारंभात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आसूड कडाडला आणि अवघे मराठी सारस्वत थरारून गेले. यापुढे भाषा आणि साहित्य व्यवहारात सरकारशी जपून व्यवहार करावा, लागेल याचीच जाणीव साहित्य व्यवहारातील कारभाऱ्यांना झाली. नथुराम गोडसेच्या नावाचा वाद उद्भवल्यानंतर मुख्यमंत्री साहित्य संमलनाच्या समारोपाला येणार किंवा नाही याबाबत सर्वानाच उत्सुकता होती. ठाण्यातील काँग्रेसच्या एका गटाने तर त्यांना निवेदन देऊन संमेलनाला येऊ नये, अशी विनंती केली होती. असे असूनही मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेल्या निमंत्रणाचा मान राखून संमेलनाला हजेरी लावली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीचा लाभ घेऊन महामंडळाने भिक्षेकरी वृत्तीचे दर्शन घडवत स्वत:च्या पदाधिकाऱ्यांसाठी सरकारी मंडळांवर प्रतिनिधित्वाची आणि घटकसंस्थांच्या अनुदानवाढीची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी या मागण्यांची दखलही घेतली नाही, आश्वासन तर दूरच राहिले. नथुराम गोडसेच्या वादाचा थेट नामोल्लेख टाळून त्यांनी साहित्य संमेलनाचे संयोजक आणि महामंडळाचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा उपयोग समाजाचा बुद्धी...

नकुसा नव्हे लाडकी…

लातूर जिल्ह्यातील चाटा गावातील प्रीतीलता सुरवसेला परवा युनिसेफ आणि सह्या्री वाहिनीच्या वतीनं सन्मानित करण्यात आलं. प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीनं वाटचाल करणाऱ्या नऊ बालिकांचा सत्कार करण्यात आला, त्यात प्रीतीलताचा समावेश होता. ही प्रीतीलता म्हणजे नकुसा. वडिलांना हवा होता मुलगा आणि झाली मुलगी. तिच्या जन्माची किंमत आईला घटस्फोटाच्या रुपानं चुकती करावी लागली. अंगणवाडी कर्मचारी असलेल्या आईनं सत्यशीलाच्या पाठिंब्यानं ती चित्रपटसृष्टीत आली असून इथे करिअर करण्याची जिद्द बाळगून आहे. प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीनं वाटचाल करणाऱ्या नऊ बालिकांचा युनिसेफ आणि सह्या्री वाहिनीच्यावतीनं नुकताच सन्मान करण्यात आला. त्यावेळी प्रीतीलताला ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. भारताची फुलराणी सायना नेहवाल नकोशा मुलींपैकीच एक. तिनंच अलीकडं एका मुलाखतीत हे सांगून टाकलं. पण या नकोशा मुलीनं केवळ कुटुंबालाच नव्हे, तर देशाला अभिमान वाटावा असं कर्तृत्व गाजवलं. प्रातिनिधिक स्वरुपातली कर्तृत्ववान मुलींची अशी अनेक नावं सांगता येतील. मुलींचं घटतं प्रमाण ही भारताचीच नव्हे तर सर्वच दक्षिण आशियाई...