अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट
परिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट’ ही आनंद विंगकर यांची कादंबरी केवळ सुन्न करीत नाही, तर मनात साकळून राहते. गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसंदर्भात कादंबरी, कथा, कविता अशा स्वरूपात मराठीत बरेचसे लेखन झाले आहे. कथा-कादंबऱ्यांमध्ये प्रामुख्याने शेतकऱ्याचे दु:ख, दैन्य; त्याने परिस्थितीशी केलेला झगडा आणि परिस्थितीपुढे हार मानून केलेली आत्महत्या असे चित्रणाचे स्वरूप राहिले. आत्महत्येच्या प्रसंगाने कादंबरीचा शोकात्म शेवट होतो. विंगकर यांची कादंबरी शेतकऱ्याची आत्महत्येच्या प्रश्नावरील असली तरी अनेक अर्थानी वेगळी आहे. इथे कादंबरीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच शेतकरी आणि त्याच्या पत्नीची आत्महत्या घडते आणि पुढे सबंध कादंबरी त्या घटनेभोवती फिरत राहते. अवघ्या चार-पाच दिवसांचा काळच कादंबरीत येतो, त्याअर्थाने पाहिले तर एका दीर्घकथेचा ऐवज आहे, परंतु आनंद विंगकर यांनी या छोटय़ाशा काळात असा काही जीव भरला आहे की, कादंबरी वाचकाला शोकात्म भावनांनी करकचून बांधून टाकते. यशवंता, पत्नी पा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा