पोस्ट्स

मैली गंगा वाहतच राहते..

  गंगा नदीसंदर्भात एक कथा सांगितली जाते. सगरपुत्रांची कथा म्हणून उत्तर भारतात ती परिचित आहे. सगर नावाचा रघुवंशातील एक सम्राट होता. त्याच्या एक हजार पुत्रांनी काही कारणामुळे देशाच्या एका भागात वाईट पद्धतीने खोदकाम केले. त्यामुळे एका ष्टद्ध r( ७०)षिचा कोप झाला आणि त्याने दिलेल्या शापामुळे सगळेच्या सगळे म्हणजे एक हजार सगरपुत्र जळून भस्म झाले. त्यांना मुक्ती देण्यासाठी त्यांचा वंशज भगीरथाने अभूतपूर्व तपस्या केली आणि गंगा आणून त्यांना शापमुक्त केले. अशी ती कथा आहे. आज देशभर गंगा नदी आणि तिचे प्रदुषण हा चर्चेचा विषय आहे. ज्येष्ठ पर्यावरणवादी जी. डी. आगरवाल यांच्या उपोषणामुळे गंगेचा विषय पुन्हा चर्चेत आला असून राष्ट्रीय गंगा नदी खोरे प्राधिकरणाची   एप्रिलला बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तूर्त तरी गंगेसंदर्भात एवढीच नवी घडामोड घडली आहे. बाकी गंगेचे प्रदुषण वर्षानुवर्षे चालत आले आहे , ते तसेच पुढे सुरू आहे. गंगेच्या आजच्या स्थितीसंदर्भात गांधी शांति प्रतिष्ठानचे ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी अनुपम मिश्र सगरपुत्रांच्या कथेचा दाखला देऊन सांगतात , ‘ आज नव्या जमान्यातले सगरपुत्...

नागनाथअण्णा नावाची दंतकथा !

इमेज
  स्वराज्य मिळाल्यानंतर सुराज्याची संकल्पना वास्तवात आणण्यासाठी ज्या मोजक्या लोकांनी प्रयत्न केले , त्यात क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचा समावेश होतो. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत केलेलं कार्य मोठं होतं , परंतु त्याचबरोबर स्वातंत्र्यानंतर त्यांनी केलेलं कार्य खूप मोलाचं आहे. हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी सहकारी चळवळीतलं आदर्श मॉडेल वाळवा येथे उभं केलं. राज्यातील सहकारातल्या नेत्यांनी कारखान्याच्या माध्यमातून स्वत:च्या तुंबडय़ा भरल्या. नागनाथअण्णांनी कारखान्याच्या माध्यमातून परिवर्तनाच्या चळवळींना बळ दिलं. जिवंतपणी दंतकथा बनण्याचं भाग्य फार थोडय़ा लोकांना लाभतं , त्यामध्ये नागनाथअण्णा नायकवडी यांचा समावेश होतो. नागनाथअण्णांचा सामाजिक चेहरा गेल्या पंचवीस वर्षात पुढं आला आहे. त्याआधी त्यांच्याबद्दलच्या दंतकथाच खूप चर्चेत असायच्या. दक्षिण महाराष्ट्रातच नव्हे तर त्यांच्या वाळव्यालगतच्या शिराळा तालुक्यातही या दंतकथांची चर्चा व्हायची. नागनाथ नायकवडी यांनी फासेपारधी पाळले असून त्यांच्या दरोडेखोर...

मूर्तीमंत साधे गणपतराव

इमेज
  पांढरा शर्ट , पांढरी पँट , हातात बॅग असं साधारणपणे जुन्या काळातील गुरुजींशी साधम्र्य असलेलं गणपतराव देशमुख यांचं व्यक्तिमत्त्व पाहिल्यानंतर या माणसाने दहा निवडणुका जिंकल्यात , यावर विश्वास बसत नाही. कारण आमदाराची आजच्या काळातील प्रतिमा खूप वेगळी आहे. राजकारणही खूप झपाटय़ानं बदलतंय. माणसांची मनं आणि मतं बदलताहेत. परंतु या बाजारात बदलले नाहीत , ते गणपतराव देशमुख आणि त्यांचा सांगोला मतदारसंघ. तळागाळातल्या माणसांच्या प्रश्नांप्रती असलेली गणपतरावांचीतळमळ कणभरही कमी झालेली नाही.   च्या दुष्काळाचा काळ होता. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सोलापूरला भेट दिली होती. त्यावेळी वसंतराव नाईक वगैरेंच्यासोबत गणपतरावांनी विमानतळावर इंदिराजींची भेट घेतली. दुष्काळाशी संबंधित अनेक मागण्या त्यांनी इंदिराजींकडे केल्या. त्याचवेळी एक मागणी होती , समान काम समान दाम अशी. त्यावेळी पुरुषांना तीन रुपये आणि महिलांना अडीच रुपये मजुरी होती. गणतपतरावांनी ती समान करण्याची मागणी केली आणि इंदिराजींनी तिथल्या तिथे ती मंजूर केली. तळमळीचा हाच धागा घेऊन त्यांची वाटचाल आजही सुरू आहे. गणपतरावांचे मूळ गाव मोहोळ...

काँग्रेसला हवे आहेत गेहलोत, वायएसआर..

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये मणिपूरसारख्या छोटय़ाशा राज्यामध्ये काँग्रेसला सत्ता टिकवता आली. राहुल गांधी यांनी प्रतिष्ठा पणाला लावूनही उत्तर प्रदेशात काँग्रेसला हवे तसे यश मिळू शकले नाही. सत्ता मिळण्याची अपेक्षा असलेल्या पंजाबमध्येही ती मिळाली नाही. उत्तराखंडमध्ये सत्ता मिळाली असली तरी संख्याबळ भाजपपेक्षा फक्त एकने जास्ती आहे आणि त्याहीपेक्षा मुख्यमंत्रिपदासाठी विजय बहुगुणा यांचे नाव जाहीर झाल्यानंतर कें्रीय मंत्री हरिश रावत यांनी जो तमाशा सुरू केला आहे , तो काँग्रेसची पुरती बेअब्रू करणारा आहे. गोव्यातील सत्ता काँग्रेसवाल्यांनी स्वत:च्या कर्तृत्वाने घालवली. या निकालांच्या पाश्र्वभूमीवर देशातील चित्र पाहिले असता , काँग्रेसची अवस्था अत्यंत केविलवाणी असल्याचे दिसून येते. नजिकच्या काळात अनेक पातळ्यांवर दुरुस्ती केली नाही , तर येत्या लोकसभा निवडणुकीत जे काही होईल , ते केवळ पाहात बसणेच नशिबी येईल. सध्या देशातील बारा राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. त्यात फक्त राजस्थान आणि आंध्र प्रदेश ही दोन महत्त्वाची राज्ये आहेत. महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य असले तरीही तिथे अध...

पुन्हा मराठा आरक्षण

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण व नोकऱ्यांमध्ये सवलत मिळण्यासाठी संबंधितांशी चर्चा करून लवकरच मुद्दा मार्गी लावण्यात येईल , असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवजयंतीला शिवनेरीवर झालेल्या कार्यक्रमात दिले आणि पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आला. आरक्षण हा सामाजिक मुद्दा असला तरीही अलीकडच्या काळात तो राजकीय पटावरील सगळ्यात संवेदनशील मुद्दा बनला आहे. त्याच्याशी खेळ म्हणजे साक्षात आगीशी खेळ असतो. अनेक राज्यांनी स्वतंत्रपणे आणि देशानेही अनेकदा त्याची झळ अनुभवली आहे. निवडणुकीच्या तोंडावर बहुतांश वेळा आरक्षणाचा मुद्दा उकरून काढून त्याच्या बळावर राजकारण केले जाते. महाराष्ट्रात सगळीकडेच या प्रश्नाची तीव्रता सारख्या प्रमाणात नाही. पुण्याच्या काही भागासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ाची तीव्रता अधिक आहे. मराठा सेवा संघ , मराठा महासंघ आणि त्यांच्याशी संलग्न विविध संघटना त्याप्रश्नी आग्रही आणि आक्रमक भूमिका घेतात. महाराष्ट्रात नुकत्याच नगरपरिषदेच्या तसेच जिल्हा परिषद आणि महापालिकेच्याही निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये हा मुद्दा आला नाही. र...

सूर्याच्या जाणाऱ्या रथातून - कृष्ण कुमार रत्तू

काही होत असतं शून्यामध्ये शून्य कधी पूर्ण होत नाही कारण रितेपणात मोक्ष नाही मिळत एक बिंदू असतो , शेवटी जिथून होत असते जगण्याची सुरुवात तुम्ही पराभूत झालात तर जीवन पराभूत होतं तुम्ही चालत राहता , खळाळत वाहतो , अवखळ बनतो जगण्याचा प्रवाह जेव्हा पुष्कळ काही आपलं होत नाही तरीसुद्ध जमीन आणि आकाशाचा असतोच आपला वाटा तुमच्या पायावर आणि माथ्यावर सगळं आकाश कधी तुमचं स्वत:चं असत नाही रोजचीच असते प्रदक्षिणा तुम्ही प्रत्येक क्षणी बदलत असता बघत असता घडणारं - बिघडणारं जग कधी विचार करता सूर्य हातात पकडण्याचा परंतु हे विसरून जाता की आपणही प्रवासी आहोत सूर्याच्या जाणाऱ्या रथातून उतरणारे तुम्ही कधी विचार केलाय का , की कधी असंही होत असतं अलीकडं बदलले आहेत पोशाख राहिले आहेत दूरवर स्वप्नांचे शीलालेख आता वाचायला कुणाकडे आहे सवड पुष्कळ काही सुटून जात असतं प्रत्येकवेळी पुढच्या प्रवासाच्या संदर्भात थकवा आणणारं गुंतागुंतीचं , डोळ्यांमध्ये जेव्हा स्वप्नं नसतात तेव्हा माणूस किती निरीच्छ होत असतो कळत नाही तरीही का लक्षात ठेवतो पुढच्या प्रवासाच्या असंख्य शक्यता आणि ड...

उत्तरेतल्या जनतेला लबाडाघरची आवतणी

 उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक म्हणजे कें्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारची आणि विशेषत: काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्यासाठी सत्त्वपरीक्षा ठरणार असल्यामुळे त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. काँग्रेस , भारतीय जनता पक्ष , बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष या चार पक्षांनी आपली सारी ताकद निवडणुकीत लावली आहे. उत्तर प्रदेशातील सामाजिक पाया गमावल्याने गेल्या बावीस वर्षापासून सत्तेपासून दूर राहिलेल्या काँग्रेससाठी स्वत: राहुल गांधी यांनी प्रतिष्ठा पणाला लावली असून भावाच्या मदतीसाठी प्रियांका गांधीही प्रचारात उतरल्या आहेत. गेल्या दोन दशकांत बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाने जाती-पातींची गणिते जमवून एका अनोख्या सोशल इंजिनिअरिंगचे दर्शन घडवले. भारतीय जनता पक्षानेही अयोध्येच्या राममंदिराचे राजकारण करून सत्ता मिळवली. सत्तेच्या खेळात देशातील या सर्वात मोठय़ा राज्यातून काँग्रेसचा पाया उखडला त्याचे परिणाम थेट कें्रातील राजकारणातही झाले आणि आघाडय़ांचे राजकारण अपरिहार्य बनले. निवडणुकीच्या रिंगणातील चार प्रमुख पक्षांनी उत्तर प्रदेशातील जनतेवर आश्वासनांची खैरात केली अस...