पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सरोजिनीताईंची चटका लावणारी एक्झिट

इमेज
  आज दुपारी एक फोन आला, ट्र्यू कॉलरवर दीपक कदम असं नाव दिसत होतं. आपलं नाव सांगून म्हणाले, मी सरोजिनी चव्हाण यांचा भाऊ बोलतोय. का कुणासठाऊक   ते स्वतःची ओळख सांगत असतानाच काळजात चर्रर्र झालं. काहीतरी अशुभ सांगणारा तो फोन असल्याची ती जाणीव होती. ते म्हणाले, सरोजिनी चव्हाण यांचं परवादिवशी निधन झालं. थोरल्या बहिणीसारख्या वाटणा-या सरोजिनीताईंच्या जाण्याच्या बातमीनं सुन्न झालो. गेल्या सव्वा दोन वर्षांतल्या त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणींनी मनात कालवाकालव सुरू झाली. ` कर्तृत्ववान मराठा स्त्रिया ` या पुस्तकाच्या संपादनाची तयारी करत असताना वर्षभर विविध लोकांशी चर्चा करून पुस्तकात समाविष्ट करावयाच्या स्त्रियांची यादी तयार झाली. त्यापुढचा टप्पा अधिक महत्त्वाचा होता, तो म्हणजे कोणत्या व्यक्तिरेखेवर कोण लिहिणार ? शारदाबाई गोविंद पवार यांचा चरित्रग्रंथ सरोजिनी चव्हाण यांनी लिहिला होता, त्यामुळं पुस्तकात शारदाबाईंच्यावरचा लेख त्यांच्याकडूनच लिहून घ्यावा असं ठरवलं. त्यासाठी त्यांचा शोध सुरू केला. वाटलं शारदाबाईंच्यावर पुस्तक लिहिलंय, सकाळ प्रकाशनानं ते प्रसिद्ध केलंय म्हणजे पुण्याच्या सकाळमधून