पोस्ट्स

जानेवारी, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भीमसेनजींचं जाणं, महाराष्ट्र आणि कर्नाटक

कुणाचंही निधन झालं की, आदरांजली वाहताना त्यांच्या जाण्यामुळं पोकळी निर्माण झाली, असं म्हणण्याची आपल्याकडं एक पद्धत आहे. अशी पोकळी निर्माण होणं म्हणजे काय, याचा अर्थ भीमसेनजींसारखा एखादा कलावंत किंवा कुसुमाग्रजांसारखा कवीश्रेष्ठ आपल्यातून निघून जातो तेव्हाच उमगतो. मराठी माणसांच्या नसांनसांतून वाहणाऱ्या संतवाणीला आपल्या पहाडी आवाजाचे कोंदण देणारे पंडित भीमसेन जोशी कृतार्थ जीवन जगले. अवघे गर्जे पंढरपूर..या ओळी पंडितजींच्या आवाजातून येतात तेव्हा पंढरपूरच्या वाळवंटाचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं आणि तिथला विठूनामाचा गजर मस्तकात घुमायला लागतो, एवढी ताकद त्यांच्या आवाजात होती. अशा कलावंताचं जाणं म्हणजे नेमकं काय असतं, याचा विचार करायला लागतो, तेव्हा त्या जाण्यानं निर्माण झालेल्या पोकळीची जाणीव अस्वस्थ करायला लागते. खरंतर भीमसेन जोशी यांचं गाणं ही रोज ऐकण्याची गोष्ट नाही किंवा त्यांच्या मैफिलीला दर महिन्याला हजेरी लावावी असंही काही नसतं कधी. म्हणजे आपल्या रोजच्या ऐकण्यात आणि गुणगुणण्यात नसलेल्या कलावंताचं जाणं अस्वस्थ करतं, कारण त्यांचं गाणं आपलं जगणं समृद्ध करणारं होतं. पंडितजींनी आयुष्यातल्या

जातीवादाच्या भोवऱ्यात मराठा राज्यकर्ते

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पोलिसांवर हात टाकल्यानंतर पोलिसांनी त्यांना अमानुष मारहाण केली. यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या म्हणजे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यादृष्टिने महत्त्वाची ठरलेली आणि पथ्यावर पडलेली गोष्ट म्हणजे हर्षवर्धन जाधव हे मराठा आहेत. महाराष्ट्र सरकार आणि त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस मराठा धार्जिणे राजकारण करीत आहे, अशी कुजबूज आणि चर्चा वाढत असताना तसेच पुण्यात कथित लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचे शिल्प कापून टाकल्याची घटना ताजी असतानाच हर्षवर्धन जाधवांनी आगळिक केली आणि त्यांना पोलिसी प्रसाद मिळाला. चुकून माकून हर्षवर्धन जाधव ओबीसी समाजातील असते, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप झाला असता. मराठय़ांच्या राज्यात ओबीसींवर अत्याचार वाढले असल्याचे सांगून छगन भुजबळ यांनीच बंडाचे निशाण फडकावले असते. म्हणजे प्रत्यक्षात निशाण फडकावले नसते, परंतु आपल्या नाराजीच्या, बंडाच्या पावित्र्यात असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये पेरल्या असत्या. पक्षातील मराठा नेत्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा डाव त

साखर हंगामापुढे जादा उसाचे संकट

महाराष्ट्राच्या साखर हंगामापुढची संकटे कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. शेतकऱ्याच्या आयुष्यात जसे कायमचे दुष्टचक्र असते, तसेच काहीसे साखर हंगामाचे झाले आहे. गेल्या काही वर्षातील हंगामांवर नजर टाकली तर दरवर्षी नव्या संकटाने ग्रासल्याचे दिसेल. हंगाम अडचणीत यायला कोणतेही कारण पुरेसे ठरते. उसाचे उत्पादन जास्त झाले तर त्याच्या गाळपाचा प्रश्न उभा राहतो आणि ऊस कमी पडला तरीही अडचणीचे ठरते. असे दोन्ही बाजूंनी संकट असते. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटर्पयत हंगाम सुरळीत पार पडला, शेतकरी खूश, संघटना खूश, कारखानदार खूश असे कधीच होत नाही. किंबहुना यापैकी कोणत्याही घटकाची अस्वस्थता साखर उद्योगासंदर्भात सातत्याने चर्चा होण्यासाठी आवश्यक असते. यंदा कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील कारखान्यांनी दोन हजार रुपये उचल दिल्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात मर्यादित ताण-तणाव राहिले. मात्र पुणे जिल्ह्यातील कारखान्यांनी कमी उचल दिल्यामुळे बारामती-इंदापूर परिसरात शेतकरी संघटनेने मोठे आंदोलन उभे केले. जाळपोळ, दगडफेक होऊन वातावरणाला हिंसक वळण लागले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्

मंत्रालयातील जळमटे कशी काढणार?

महाराष्ट्र सरकार गेल्या अनेक वर्षापासून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवते, अलीकडे तंटामुक्ती अभियान राबवते. परंतु सरकारची उक्ती आणि कृती यात नेहमीच अंतर राहिले आहे. ग्रामस्वच्छता अभियान राबवून गावे स्वच्छ करायची, त्यानिमित्ताने माणसांच्या मनातली वादाची, मतभेदाची जळमटं काढून टाकण्यासाठी उपक्रम राबवायचे आणि त्याचवेळी राज्याचा कारभार जिथून चालतो त्या मंत्रालयातून मात्र भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहते, असे चित्र पाहायला मिळत होते. मंत्रालयातील कोणतीही फाईल वजन ठेवल्याशिवाय हलत नाही, नोकरशहा राज्यकर्त्यांना जुमानत नाहीत हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पृथ्वीराच चव्हाण आले म्हणून त्यात क्रांतिकारक बदल होऊन सगळा कारभार पारदर्शक होऊन जाईल, अशी अपेक्षा कुणी करीत असेल तर ते भाबडेपणाचे ठरेल. परंतु कारभार गतिमान करणे आणि शक्य तेवढी पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करणे यादृष्टिने त्यांनी काही पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या मुख्य सचिवपदी झालेली रत्नाकर गायकवाड यांची नियुक्ती हे त्याचेच निदर्शक आहे. गेले काही दिवस म्हणजे आदर्श गृहनिर्माण सोसायटीचे प्रकरण चव्हाटय़ावर आल्यापासून राज्याच्या प्रशास