पोस्ट्स

सरोजिनीताईंची चटका लावणारी एक्झिट

इमेज
  आज दुपारी एक फोन आला, ट्र्यू कॉलरवर दीपक कदम असं नाव दिसत होतं. आपलं नाव सांगून म्हणाले, मी सरोजिनी चव्हाण यांचा भाऊ बोलतोय. का कुणासठाऊक   ते स्वतःची ओळख सांगत असतानाच काळजात चर्रर्र झालं. काहीतरी अशुभ सांगणारा तो फोन असल्याची ती जाणीव होती. ते म्हणाले, सरोजिनी चव्हाण यांचं परवादिवशी निधन झालं. थोरल्या बहिणीसारख्या वाटणा-या सरोजिनीताईंच्या जाण्याच्या बातमीनं सुन्न झालो. गेल्या सव्वा दोन वर्षांतल्या त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणींनी मनात कालवाकालव सुरू झाली. ` कर्तृत्ववान मराठा स्त्रिया ` या पुस्तकाच्या संपादनाची तयारी करत असताना वर्षभर विविध लोकांशी चर्चा करून पुस्तकात समाविष्ट करावयाच्या स्त्रियांची यादी तयार झाली. त्यापुढचा टप्पा अधिक महत्त्वाचा होता, तो म्हणजे कोणत्या व्यक्तिरेखेवर कोण लिहिणार ? शारदाबाई गोविंद पवार यांचा चरित्रग्रंथ सरोजिनी चव्हाण यांनी लिहिला होता, त्यामुळं पुस्तकात शारदाबाईंच्यावरचा लेख त्यांच्याकडूनच लिहून घ्यावा असं ठरवलं. त्यासाठी त्यांचा शोध सुरू केला. वाटलं शारदाबाईंच्यावर पुस्तक लिहिलंय, सकाळ प्रकाशनानं ते प्रसिद्ध केलंय म्हणजे पुण्याच्या सकाळमधून

VTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान

इमेज

मराठा समाजाची खदखद कशामुळे ?

इमेज
राज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणालाच येत नाही. लाखोंच्या संख्येने रस्त्यावर येणाऱ्या मराठा समाजाची ही प्रासंगिक खदखद आहे, काही साचत आलेल्या गोष्टी आहेत की यामध्ये भविष्यकालीन उलथापालथीची बीजं दडली आहेत, याबद्दलही कुणी ठोसपणे सांगू शकत नाही. एखाद्या सामाजिक घटनेसंदर्भात एवढी अनिश्चिततेची किंवा अंदाज बांधता न येण्याजोगी परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली आहे. मराठा समाज मोर्चांच्या संघटनासाठी निमित्त ठरले ते कोपर्डी येथील घटनेचे. या घटनेनंतर दलित-सवर्ण संघर्षाला चिथावणी देण्याचे, सामाजिक वातावरण कलुषित करण्याचे प्रयत्न झाले. परंतु महाराष्ट्रात अपवाद म्हणूनही कुठे हिंसक प्रतिक्रिया उमटली नाही, हे लक्षात घ्यायला हवे. कोपर्डीच्या घटनेनंतर अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी राजकीय पातळीवरून करण्यात आली. राज ठाकरे यांनी ती पहिल्यांदा केली. शरद पवार यांनी त्यासंदर्भात खूप सावध प्रतिक्रिया दिली. एवढ्या मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर येत असतील, तर त्यांच्या भावनांची दखल घ्यायला हवी, असे

मराठी कादंबरीच्या कक्षा विस्तारणारे ‘चोषक फलोद्यान’

इमेज
रंगनाथ पठारे यांनी कथा आणि कादंबरीलेखनामध्ये अनेक प्रयोग केले आहेत. ‘चोषक फलोद्यान’ ही त्यांची श्रीरामपूरच्या  शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलेली  नवी कादंबरी त्यांच्या आतापर्यंतच्या कादंबऱ्याच नव्हे तर एकूण मराठी कादंबरीच्या आशयाच्या कक्षा ओलांडून पुढे जाणारी आहे. मराठी लेखकांनी स्त्री-पुरुष संबंध या विषयापासून स्वतःला अंतरावर ठेवले आहे. या विषयावर मराठीत झालेले बहुतांश लेखन सवंग, उथळ प्रकारांमध्ये मोडणारे आहे. माणसाच्या जगण्याचा बराचसा भाग व्यापणाऱ्या या विषयाला भिडण्याचे धारिष्ट्य मराठी लेखकांनी दाखवले नाही. भाऊ पाध्ये यांच्यासारखा सन्माननीय अपवाद. कनिष्ठ मध्यमवर्गीय मानसिकता, सामाजिक पर्यावरण आणि समाजात वावरतानाचे मानसिक दबाव किंवा   नैतिक-अनैतिकतेच्या संकल्पनेबाबत आकलनाच्या मर्यादा अशी काही कारणे त्यामागे असू शकतील. या पार्श्वभूमीवर रंगनाथ पठारे यांच्यासारखा गंभीर लेखक अशा विषयाला ताकदीने भिडताना मराठी कादंबरीविश्व समृद्ध करण्याबरोबरच वाचकांनाही घडवण्याचे काम करतो. ‘चोषक फलोद्यान’ कादंबरीतील ‘गर्भित’ लेखक मृत्यूच्या उंबरठ्यावर ‘कोमात’ गेलेला आहे. तेथून आपले संपूर्ण जीवन, आ

गुजरातमध्ये दलितांचा आत्मभानाचा लढा

गुजरातमधील उना येथे झालेल्या दलितांवरील अत्याचाराच्या घटनेने गुजरातच्या राजकारणाला नवे वळण लागले आहे. आधीच पाटीदार समाजाचे आंदोलन हाताळण्यात अयशस्वी ठरलेल्या आनंदीबेन पटेल यांच्या कारभाराची लक्तरे उनाच्या घटनेने वेशीवर टांगली. त्यांचे मुख्यमंत्रिपद गेले. त्यामागचे अंतर्गत राजकारण हा वेगळा विषय असला तरी नेतृत्वबदल झाला ही वस्तुस्थिती आहे. मुख्यमंत्री बदल झाल्यानंतरही गुजरातमधील वातावरण बदललेले नाही. उनाच्या घटनेच्या निषेधार्थ दलितांनी अहमदाबाद ते उना दलित अस्मिता मार्च काढून आपल्या भावी वाटचालीची दिशा स्पष्ट केली. जिग्नेश मेवाणी या तरुणाने दलितांचे हे आंदोलन संघटित केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना गलिच्छ कामे करण्यापासून परावृत्त केले होते. त्यांचाच आदर्श मानून जिग्नेश मेवाणीने लोकांना संघटित केले. त्यांचे आत्मभान जागृत करण्याचा प्रयत्न केला. त्याचाच परिणाम म्हणून उनामध्ये दहा हजार दलितांनी एक शपथ घेतली. डोक्यावरून मैला न वाहून नेण्याची आणि मेलेल्या जनावरांची विल्हेवाट न लावण्याची शपथ. गुजरातमधील दलितांनी उनाच्या घटनेनंतर अशी कामे बंद केली आहेत. त्याचा परिणाम म्हणून गुजरात

कुंबळे नावाचा जादूगार !

इमेज
अनिल कुंबळेची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली, ही बातमी भारतीय क्रिकेटच्या कुणाही चाहत्याला आनंद देणारी आहे. कुंबळेसारख्या उमद्या खेळाडूकडं नवी जबाबदारी सोपवण्यात आली. सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या भारतीय संघातील कुंबळेच्या सहकाऱ्यांनीच ही निवड केलीय. संघासाठी प्रशिक्षक किती महत्त्वाचा असतो हे जाणतात, त्याचप्रमाणं कुंबळे किती उत्तम सहकारी, मित्र आणि मार्गदर्शक आहे, हेसुद्धा तिघं उत्तम रितीनं जाणतात. म्हणूनच तर अनेक दिग्गज नावं स्पर्धेत असताना त्यांनी कुंबळेची निवड केली. संघव्यवस्थापनाचा भाग म्हणून प्रशिक्षकाची भूमिका महत्त्वाची असते, हे अनेकदा दिसून आलंय. ग्रेग चॅपेल प्रकरणात तर प्रशिक्षकाचं उपद्रवमूल्य काय असतं, हेही सगळ्यांनी अनुभवलंय. कुंबळेच्या निवडीला महत्त्व येतं ते त्यामुळंच. मार्गदर्शनाचा बडेजाव कुणीही करेल, पण कुंबळे नव्यातल्या नव्या खेळाडूचा मित्र बनू शकतो. त्यांना उभारी देऊ शकतो. क्रिकेट हा सभ्य माणसांचा खेळ आहे, असं म्हटलं जायचं. परंतु तो भूतकाळ झाला. कसोटी, साठ षटकांची वन डे, पन्नास षटकांची वन डे, टी-२० असं क्रिकेटचं विश

राज ठाकरे उरले टीआरपीपुरते !

इमेज
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा प्रवास पाहिला तर त्यांची धाव सतत एका खड्ड्याकडून दुसऱ्या खड्ड्याकडे सुरू असल्याचे दिसते. आपल्याकडे पुढच्यास ठेच मागचा शहाणा अशी म्हण आहे. राज ठाकरे यांना ती लागू होत नाही, कारण ते स्वतःच नेहमी पुढे असतात. त्यामुळे नेहमी ठेचा त्यांनाच लागतात. शहाणा माणूस दुसऱ्याला ठेच लागली तरी शहाणा होतो, परंतु राज ठाकरे स्वतः ठेचा खाऊनही शहाणे होत नाहीत, असे दिसते. एक-दोन-चार वर्षे हे रांगण्याचे, दुडदुडण्याचे, धडपडण्याचे वय म्हणून लोक बाळलीलांकडे दुर्लक्ष करतात. परंतु दहा वर्षांनंतरही धडपणे उभे राहता येत नसेल तर शंका वाटायला लागते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल पर्यायाने राज ठाकरे यांच्याबद्दल तसेच वाटायला लागले आहे. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या ‘नीट’ परीक्षेच्या निमित्ताने राज ठाकरे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले. ‘नीट’ रद्द करण्याच्या मागणीसाठी पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही फोन केला. ‘नीट’ परीक्षेचा प्रश्न गंभीर आहे, हे खरेच. परंतु इथे राज ठाकरे यांच्या भूमिकेला फारसा अर्थ नाही