पोस्ट्स

फेब्रुवारी, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आत्महत्या केलेल्या शेतमजुराच्या मुलीचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पत्रास कारण की गेल्या महिन्यात माझ्या बापानं आत्महत्या केली हे आपणास माहीत असेलच कारण कालच तुम्ही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे पालकत्व सरकारने घेतले आहे त्यांना सरकार विसरणार नाही असे म्हणालात महोदय, आमच्या गावात आत्महत्या केलेल्या दोघांच्या कुटुंबियांना लाखालाखाचे चेक मिळाले त्यांचे फोटो छापून आले चेक घेताना पण आम्हाला मिळाले नाही काहीच माझा बाप आयुष्यभर शेतात राबला तरी तो शेतकरी नव्हता शेतमजूर होता म्हणतात तुमचे लोक मुख्यमंत्री महोदय, माझ्या मोठय़ा बहिणीच्या लग्नासाठी कर्ज काढलं होतं माझ्या बापानं तिला सासरी जाताना खूप रडला माझा बाप तरी खूप आनंदी होता एका लेकीचं आयुष्य मार्गी लागलं म्हणून काही दिवस गेले आणि बाप गप्प गप्प झाला बोलायचंच बंद झाला कुणाशी भिंतीला टेकून बसायचा जमिनीवर रेघोटय़ा मारीत नजर अशी जसं भुईतलं गुप्तधन शोधतोय दिवसभर राबून यायचा गुरासारखं रात्री घासभर खावून झोपी जायचा गपगार सकाळर्पयत अलीकडं अलीकडं दचकून उठायचा झोपेतून भास व्हायचा त्याला सावकार दारात आल्याचा माझा बाप इज्जतीला खूप जपायचा मुख्यमंत्री महोदय स्वत:च्या आणि सरकारच्याही सरकारच्या इज्जतीसाठीच त्य

संथ वाहते कृष्णामाई...

पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली तेव्हा अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. अनेक राजकीय अंदाज व्यक्त केले जात होते. ज्या परिस्थितीत त्यांनी सूत्रे स्वीकारली होती, ती परिस्थिती वेगळी होती आणि त्यांच्यापुढची आव्हानेही वेगळी होती. थेट दिल्लीच्या राजकारणातून आलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्राची नीट माहिती नाही, ती आधी करून घ्यावी लागेल, असे सल्ले काही पंडित देत होते. अजित पवार यांचा आक्रमकपणा आणि कामाच्या धडाक्यापुढे ते निष्प्रभ ठरतील, असेही बोलले जात होते. परंतु सरकारने शंभर दिवस पूर्ण केल्यानंतर जाणवलेले वास्तव वेगळे आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या तालमीत तयार झालेले हे नेतृत्व कच्चे नाही. कृष्णामाई संथ वाहात असली तरी उथळ नाही, पाणी खूप खोल आहे आणि त्याचा अंदाज भल्याभल्यांना येऊ शकत नाही, हेच दिसून आले. एकीकडे अजित पवार यांची गाडी सुसाट सुटली असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र वेगामुळे अपघाताला निमंत्रण मिळते, याची जाणीव असल्यामुळे कोणत्याही टप्प्यावर अनावश्यक वेग वाढवून त्यांच्याशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला नाही. झालेही तसेच. राज्यभर फ

गृहखात्याच्या गोंधळावर खोपडेंचे शरसंधान

वरिष्ठ पोलिस अधिकारी सुरेश खोपडे यांनी गृहखात्यावर शरसंधान केले आहे. सेवेत असलेल्या अधिकाऱ्याने इतक्या थेटपणे खात्यासंदर्भात मतप्रदर्शन करण्याचे धाडस करावे, हे मोठे धाडसाचे काम आहे. खोपडे यांचा त्यामागील हेतू काहीही असला तरी त्यांच्या धाडसाचे कौतुक करावे लागेल. आर. आर. पाटील गृहखात्यालाही चांगले वळण लावतील, अशी अनेकांची अपेक्षा होती. परंतु गृहखात्याला नेतृत्व देण्यामध्ये ते फारसे यशस्वी झाले नसल्याचेच अनेक उदाहरणांवरून दिसून येते. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर गमावलेले गृहखाते त्यांनी इर्षेने वर्षभराच्या आत पुन्हा मिळवले, परंतु त्यांना पोलिस दलाची किंवा व्यक्तिगत स्वत:ची गमावलेली प्रतिष्ठा मात्र पुन्हा मिळवता आली नाही. अनामी रॉय यांच्यासारख्या अधिकाऱ्याच्या कच्छपी लागून पोलिस दलातील अनेक चांगल्या अधिकाऱ्यांचे खच्चीकरण करताना त्यांनी कधी सदसद्विवेकबुद्धी वापरली नाही. सरकारी अधिकारी किंवा पोलिस अधिकारी जेव्हा व्यवस्थेच्या विरोधात बोलायला लागतात, तेव्हा त्यांनी सेवेचा निरोप घेण्याची मानसिक तयारी केलेली असते, असे समजले जाते. सेवेत राहून बंडखोरी करणारे आणि संघर्ष सुरू ठेवणारे गो. रा. खैरना

पोपट मेला असे म्हणायचे नाही !

पोपट काही खात नाही, पोपट पाणी पीत नाही, पोपटाने मान टाकली आहे, पोपट हालचाल करीत नाही..तरीही पोपट मेला असे म्हणायचे नाही. पोपट खूप नाजूक आहे आणि परीकथेतल्याप्रमाणे त्यांचे प्राणच पोपटात अडकले आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना जाळून मारणाऱ्या आणि त्याच आगीच्या लपेटीत आल्यामुळे काहीशा वेळाने कुडीतून प्राण निघून गेलेल्या आणि ज्याच्या कुडीत अनेकांचे प्राण अडकले होते, त्या पोपट शिंदेविषयी हा मजकूर नाही. त्या पोपटची गोष्टच निराळी होती. त्याच्या प्राणात अनेकांचे प्राण अडकले होते आणि तो अखेर्पयत तोंड उघडू न शकल्यामुळे पोलिस ज्याचा जबाबही घेऊ शकले नाहीत. त्याच्या कुडीतून प्राण निघून गेले आणि अनेकांचा जीव भांडय़ात पडला. पण वेळ अशी आलीय की, त्या पोपटबद्दलही बोलायचं नाही. त्याच्याविषयी कुणी काही बोललं, त्याच्या भेसळखोरीला राजकीय संरक्षण होतं, असं कुणी म्हणालं की छगन भुजबळांना वाटतं आपल्यालाच लक्ष्य करून बोललं जातंय. ते स्वाभाविकही आहे. काही वर्षापूर्वी अंतिम तोतला हा तेलमाफिया चर्चेत आला तेव्हा भुजबळांशीच त्याचे संबंध असल्याचे आरोप झाले होते. पुढे त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. यशवं

आलोक : उद्ध्वस्ततेचा भयाण अनुभव

आसाराम लोमटे यांचा ‘आलोक’ हा कथासंग्रह मुळापासून हादरवून आणि स्वास्थ्य बिघडून टाकणारा आहे. मराठी साहित्यात खेडय़ातील वास्तवाचं भेदक चित्रण आतार्पयत मुबलक प्रमाणात आलं आहे, परंतु आसाराम लोमटे ज्या ताकदीनं ते मांडतात ते सारं पार आतून उदसून टाकणारं आहे. सदानंद देशमुख यांच्या ‘बारोमास’ कादंबरीनं तसा काहीसा अनुभव दिला होता, परंतु आसाराम लोमटे यांची कथा इतकी आत घुसते की सहजासहजी सावरून लगेच पुढच्या कथेकडं वळता येत नाही. ‘इडा पीडा टळो’ या बहुचर्चित कथासंग्रहानंतर ‘आलोक’ हा आसाराम लोमटे यांचा दुसरा कथासंग्रह. कथा या वाड.मयप्रकाराची बलस्थाने त्यांनी नेमकेपणाने पकडली आहेत. भालचं्र नेमाडे यांना कथेसंदर्भातील आपली विधाने बदलावी लागतील, एवढी ताकद त्यांच्या कथांमध्ये आहे. मराठीला कथाकारांची सशक्त परंपरा आहे आणि अनेक कथाकारांनी लक्षवेधी प्रयोगही केले आहेत. आसाराम लोमटे मात्र कथा सांगताना माणसांच्या जगण्याचे पाप्रुे उलगडून दाखवण्याला प्राधान्य देतात. प्रयोगशीलतेच्या फंदात न पडता पारंपारिक कथनपरंपरेच्याच मार्गाने मराठी कथा पुढे नेतात. आलोक या कथासंग्रहात आणि या दोन वर्षात लिहिलेल्या सहा कथा आहेत. प्रत

रामदास आठवले दुरावणे परवडणारे नाही !

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष सत्तेच्या मस्तीत असतात तेव्हा आपल्या आजुबाजूला काय सुरू आहे, याचे थोडेही भान त्यांना नसते. राजकीय स्वार्थासाठी ते निवडणुकीच्या काळात छोटय़ा-मोठय़ा गटांचे लांगूलचालन करतात. निवडणुकीची गणिते जमवण्यासाठी जातीय किंवा प्रादेशिक तडजोडी करीत असतात. मात्र अडचणीच्या काळात आपल्याला सहकार्य केलेल्या छोटय़ा पक्षांचा योग्य सन्मान राखण्याची वृत्ती दोन्हींच्याठायी नाही. दोन्ही पक्षांची नावे वेगळी असली तरी संस्कृती एकच असल्यामुळ्े वृत्तीत फरक असण्याचे कारण नाही. त्यांची ही वृत्तीच त्यांच्या मुळावर आली तर आश्चर्य वाटायला नको. गेले वर्षभर केलेल्या उपेक्षेमुळेच रामदास आठवले यांच्यासारखा धर्मनिरपेक्षतेच्या चळवळीतला त्यांचा मित्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीला गेला, याची योग्य दखल घेतली नाही,तर मात्र नजिकच्या काळात दोन्ही काँग्रेसना त्याची किंमत चुकवावी लागेल. महाराष्ट्रातील दलितांच्या नेतृत्वासंदर्भात काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी सूचक विधान केले असले तरी काँग्रेसमधून दलितांसाठी नेतृत्व उभे राहणे नजिकच्या काळात तरी शक्य नाही. किंबहुना काँ