पोस्ट्स

नोव्हेंबर, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

निळा कोल्हा, गांधीजी वगैरे…

निळ्या कोल्ह्याची गोष्ट बहुतेकांना माहीत आहे. भूक लागल्यामुळे गावात शिरलेल्या कोल्ह्याच्या मागे कुत्री लागतात , तेव्हा कोल्हा एका धोब्याच्या घरात शिरतो आणि जीव वाचवण्यासाठी पिंपात लपून बसतो. त्या पिंपात नीळ असते. कुत्री निघून गेल्याचा अंदाज घेऊन थोडय़ा वेळाने निळीत भिजलेला कोल्हा बाहेर येतो आणि जंगलात धूम ठोकतो. निळ्या कोल्ह्याला पाहून कोण हा विचित्र प्राणी आला म्हणून वाघ , सिंहासह सारे प्राणी घाबरून जातात. निळ्या रंगामुळे सगळे घाबरल्याचे लक्षात आल्यावर कोल्हा परिस्थितीचा ताबा घेतो आणि म्हणतो , ‘ मला ब्रह्मदेवाने तुमच्या रक्षणासाठी पाठवले आहे. आजपासून मी तुमचा राजा असेन. ’ ब्रह्मदेवाचीच आज्ञा असल्याचे मानून वाघ , सिंहासह सगळे प्राणी त्याचा जयजयकार करतात. कोल्हेराजाची राजवट सुरू होते. एके दिवशी दरबार भरलेला असतानाच राज्याबाहेर कोल्हेकुई सुरू होते. त्याबरोबर निळ्या महाराजांच्या अंगावर रोमांच उभे राहतात आणि भावनातिरेकात तेही आपल्या बांधवांच्या सुरात सूर मिसळून ओरडू लागतात. भर दरबारात सोंग उघडे पडते तेव्हा सारे प्राणी त्याच्यावर हल्ला करतात.. सोंग घेतले की असेच होते. सोंग असो कि

कुणाचे बापजादे काय करीत होते ?

इमेज
मुंबईसह पुणे , ठाणे महापालिकेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून त्याच्या प्रथम चरणात बापजाद्यांच्या नावावर पावत्या फाटू लागल्या आहेत. अर्थात दोन्ही बाजूंनी केली जाणारी वक्तव्ये एवढय़ा हिणकस पातळीवरील आहेत , की त्यांची दखल घेतली तर महत्त्व दिल्यासारखे होईल. स्वत:चे कर्तृत्व थिटे पडायला लागले की , बापजाद्यांच्या पुण्याईचा आधार घेतला जातो , परंतु इथे वंशज एवढे पॉवरफुल आणि स्वयंभू आहेत , की त्यांना कुणाच्या पुण्याईची गरज भासत नाही. त्यांचा उन्माद एवढा जोरात आहे की , विरोधकांच्या बापजाद्यांची मापे काढण्यार्पयत त्यांची मजल गेली आहे. पहिल्या टप्प्यातच ही पातळी गाठली आहे , त्यावरून पुढील काळात काय घडू शकेल याचा अंदाज येऊ शकतो. उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू आणि अजित पवार यांनी जो काही तमाशा मांडला आहे , तो महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला शोभणारा नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवराळपणाची परंपरा उद्धव आणि राज संयुक्तपणे पुढे चालवत आहेत , परंतु त्यांच्या तोंडाला लागून अजित पवार मात्र आपली परंपरा विसरले आहेत , असे वाटते. ज्यावेळी शिवसेनाप्रमुख ‘ बारामतीचा म्हमद्या ,’ ‘ मैद्

श्रमप्रतिष्ठा रुजवणारे शिवाजी विद्यापीठ

इमेज
शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली , तेव्हा मुंबईतल्या एका वृत्तपत्राने ‘ कोल्हापुरात आणखी एक खानावळ सुरू झाली ’ अशा शब्दात त्याची संभावना केली होती. पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे खुली व्हावीत , यासाठी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून हे विद्यापीठ उभे राहात होते. उच्च शिक्षण ही ठराविक वर्गाची मिरासदारी आहे , असे मानणाऱ्या वर्गाकडून प्रारंभीच्या काळात शिवाजी विद्यापीठाची हेटाळणी होत होती , परंतु विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार यांनी सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत शिवाजी विद्यापीठाची भक्कम पायाभरणी केली. एकोणीसशे बासष्ट मध्ये कोल्हापूर , सांगली , सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांतील चौतीस संलग्न महाविद्यालये आणि चौदा हजार विद्यार्थी घेऊन सुरू झालेल्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात आज सव्वादोनशे महाविद्यालये आणि दोन लाखांवर विद्यार्थी आहेत. शिवाय मधल्या काळात सोलापूर विद्यापीठ वेगळे सुरू झाले , ते वेगळेच. अनेक चढउतारांवरून प्रवास करीत शिवाजी विद्यापीठाने सुवर्णमहोत्सवी टप्पा गाठला आहे

गांधीविचारांचा ‘अनुपम’ पाईक

इमेज
  अलीकडच्या काही वर्षात गांधी , गांधीवाद , गांधीगिरी या विषयावर बोलण्याची फॅशन बनली आहे. अण्णा हजारे प्रतिगांधी असल्याच्या थाटात राळेगणसिद्धीपासून दिल्लीर्पयत मिरवू लागले आहेत. ऊस दरासाठी आंदोलन करताना हिंसाचाराला चिथावणी देणारे खासदार राजू शेट्टीसुद्धा आपण अजित पवारांच्या दादागिरीच्या विरोधात गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन करणार असल्याची भाषा करू लागले आहेत. या लोकांनी गांधीजींच्या नावाचा इतक्या सवंगपणे वापर सुरू केला आहे की , नवख्या लोकांचा गांधीजी आणि त्यांच्या मार्गाबद्दल गैरसमज झाल्यावाचून राहणार नाही. यापुढील काळात गांधीजींच्या किंवा गांधीमार्गाच्या अशा भ्रष्ट आवृत्त्याच पाहायला मिळणार का , असाही प्रश्न मनात आल्यावाचून राहात नाही. गांधीवादाचे प्रामाणिकपणे आचरण करणारे , गांधीजींच्या विचारधारेशी अधिकाधिक प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करणारे जीव या भारतभूमीवर आस्तित्वात आहे का , असाही प्रश्न पडल्यावाचून राहात नाही. बरेचसे गांधीवादी खादी भांडार किंवा गांधी विचारांच्या पुस्तकांच्या दुकानांतून दिसतात. अशी दुकाने गांधीवाद्यांची म्युझियमच बनली आहेत. हे बहुतेक थकलेले लोक आहेत. देशात

पत्रकार रागावले त्याची गोष्ट...

  देशातील तमाम पत्रकार रागावले आहेत. संपादक संतापले आहेत. पत्रकार संघटनांचे नेते खवळले आहेत. अण्णा हजारे यांच्या रामलीला मैदानावरील आंदोलनावेळी देशात दुसऱ्या की तिसऱ्या क्रांतीची जी लहर उठली होती तिचे कर्ते-धर्ते आपणच आहोत , असा समज असलेले इलेक्ट्रॉनिक माध्यमातले धुरीणही लालेलाल झाले आहेत. आम्ही कुणाचीही मापे काढू शकतो. कुणाच्याही खासगी बैठकीत कॅमेरा लावू शकतो. कुणालाही काहीही म्हणण्याचा , काहीही दाखवण्याचा आणि त्यावर काहीही भाष्य करण्याचा आमचा अधिकार आहे. परंतु आमच्याबद्दल मात्र काही बोलाल तर खबरदार! ही माध्यमातल्या बहुतांश लोकांची सर्वसाधारण धारणा आहे. म्हणूनच प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष न्यायमूर्ती मरकडेय काटजू यांनी प्रसारमाध्यमांतल्या लोकांसंदर्भात स्पष्ट मत नोंदवल्यानंतर ते अनेकांच्या जिव्हारी लागले. पत्रपंडितांचा संताप अनावर होणे स्वाभाविक आहे. कारण स्वत:बद्दल प्रतिकूल मत ऐकण्याची कधी कुणाला सवय नसते. आपण इतरांविरोधात कशाही मोहिमा चालवल्या तरी त्या संबंधितांनी खपवून घेतल्या पाहिजेत. चारित्र्यहनन केले तरीसुद्धा सहिष्णुता दाखवली पाहिजे. स्वत:बद्दल , स्वत:च्या पत्रकारितेबद्दल