पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अजित पवार की सुप्रिया सुळे?

अजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजित पवार यांची निवड ही शरद पवार यांच्या मनाविरुद्ध आहे आणि छगन भुजबळ यांच्याकडेच उपमुख्यमंत्रिपद ठेवण्याची शरद पवार यांची इच्छा होती, अशी चर्चा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शरद पवार अस्वस्थ असून पवार कुटुंबातील कलह त्यामुळे वाढण्याची शक्यता आहे, अशीही चर्चा केली जात आहे. काही वृत्तवाहिन्या आणि मु्िरत माध्यमांनी या कलहाचे सूचन केले आहे. राजकारणापेक्षा रक्ताचे नाते महत्त्वाचे असे वारंवार सांगणाऱ्या ठाकरे कुटुंबीयांचा दाखला समोर असल्यामुळे पवार कुटुंबातही तसेच घडणार असे अनेक राजकीय पंडित छातीठोकपणे सांगत आहेत. शरद पवार भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार किंवा शिवसेनेबरोबर युती करणार असे गेल्या अनेक वर्षापासून खास सूत्रांचा हवाला देत सांगितले जाते. त्यासंदर्भातील गुप्त बैठका कुठे कुठे झाल्या आणि फॉम्र्यूला काय ठरला, यासंदर्भातील एक्स्क्ल्यूजिव्ह बातम्या यापूर्वी अनेक वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केल्या आहेत. परंतु अद्यापर्पयत तसे काहीच घडलेले नाही, ही वस्तुस्थिती

मा. पृथ्वीराजबाबांची डायरी

दिल्ली सोडून मुंबईला जाताना मनात संमिश्र भावना दाटून आल्या. इथलं काय काय सामान बरोबर घ्यायचं आणि काय काय इथंच सोडायचं हे ठरवायला बराच वेळ लागला. पुस्तकं तर सोबत घ्यायलाच पाहिजेत. पण स्वेटर, जाकिटांचं ओझं कशाला घ्यायचं, यावर सगळ्यांचंच एकमत झालं. मुंबईतल्या उकाडय़ात हे सगळं निरुपयोगी ठरणार. राजीवजींनी आग्रह केला म्हणून राजकारणात यावं लागलं. जीव रमवण्यासाठी आपण राजकारणात आलोच नव्हतो. त्यामुळं या दिल्लीत जीव रमत नाही, असं म्हणण्याची वेळ आली नाही. सुरुवातीला थोडं अवघडल्यासारखं वाटलं, पण हळुहळू अंगवळणी पडत गेलं सगळं. जबाबदाऱ्या वाढत गेल्या. कार्यक्षेत्र विस्तारत गेलं. खूप माणसं पाहता आली. अनेकांशी बंध निर्माण झाले. त्या सगळ्यांना सोडून जातानाची हुरहूर आहेच. पण दिल्लीतल्या थंडीला मात्र कायमचं मुकणार आहोत, ती सतत आठवत राहील. दिल्लीशी जोडणारा तेवढाच भावनिक धागा आहे.. .. गेली दोन-तीन वर्षे मुंबई खुणावत होती. आपल्याला दिल्लीतला मुक्काम हलवून मुंबईत जावं लागणार, याचे संकेत मिळत होते. पण आपल्याच मनाची तयारी होत नव्हती. तशी मुंबईची ओढ कधीच नव्हती आणि कधी तिच्याशी भावनिक नातं निर्माण होण्यासारखा संबं

सर्व समाजघटकांना आधार वाटायला हवा

अशोक चव्हाण यांचे मुख्यमंत्रिपद गेल्यामुळे त्यांचे कुटुंबीय, मराठी चित्रपट सृष्टीतील मोजके कलावंत आणि सत्तेचे लाभार्थी वगळता फारसे कुणाला वाईट वाटण्याचे कारण नव्हते. अशोकरावांनी गेल्या वर्षभरात जो काही कारभार केला तो पाहता आघाडी सरकारच्या हितचिंतकांचीही ‘बरे झाले राज्य बुडाले’ अशीच प्रतिक्रिया उमटली. दहा वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने कोणतेही दिवे लावलेले नव्हते, उलट महाराष्ट्रात अंधाराचे साम्राज्य वाढवले होते. अनेक आघाडय़ांवर नामुष्कीजनक स्थिती होती. तरीसुद्धा शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचे जातीयवादी विचारांचे सरकार सत्तेवर येऊ नये, असे वाटणाऱ्या लोकांना पुन्हा आघाडीचे सरकार यावे, असे वाटत होते. नाकर्त्यां सरकारच्या मदतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना धावून आली आणि युती सत्तेपासून दूर राहिली. आघाडी सत्तेवर आल्यानंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपद मिळालेल्या अशोक चव्हाण यांनी ज्या संवेदनशून्य रितीने कारभार सुरू केला, त्यामुळे साऱ्यांचाच भ्रमनिरास झाला होता. तो होणारच होता. परंतु इतक्या लवकर होईल असे वाटत नव्हते. अशोकराव जाऊन पृथ्वीराज चव्हाण आले आणि नेहमीचे झिलकरी गोळा होऊन

बेघर शंकरराव आणि अशोकरावांची आदर्श ‘सासुरवाडी’

महाराष्ट्राच्या जडणघडणीचा मागोवा घेताना आणि मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीचे मूल्यमापन करताना प्रामुख्याने यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील आणि शरद पवार यांच्या नावांचा गौरवाने उल्लेख केला जातो. दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या शंकरराव चव्हाण यांची कारकीर्दही महाराष्ट्राच्या जडणघडणीच्यादृष्टिने महत्त्वाची आहे. महाराष्ट्राच्या जलसंस्कृतीचे जनक असलेल्या शंकररावांचा जाहीर गौरव क्वचितच होतो. खुशमस्कऱ्यांचा गोतावळा सभोवती बाळगणाऱ्यांपैकी ते नव्हते किंवा कार्यकर्ते पाळून त्यांच्या कोणत्याही गैरव्यवहारांना पाठिशी घालणाऱ्यांपैकीही ते नव्हते. त्याचमुळे त्यांच्याविषयी लिहिणारे, त्यांचे पोवाडे म्हणणारे फारसे आढळत नाहीत. 19 जुलै 1920 ही शंकररावांची जन्मतारीख आणि 14 फेब्रूवारी 2004 हा त्यांचा मृत्युदिवस. त्यांची जयंती किंवा स्मृतीदिन नसताना त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचे कारण काय, अशी शंका कुणी उपस्थित करील. पण शंकररावांचे पुत्र अशोकराव चव्हाण यांनी आदर्श गृहनिर्माण सोसायटीमध्ये आपली सारी सासुरवाडी वसवली आणि त्यामुळे त्यांचे मुख्यमंत्रिपद धोक्यात आले. मुख्यमंत्रिपद म

महाराष्ट्राची साहित्य अकादमी

‘स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आणि भाषिक राज्याच्या निर्मितीनंतर, वैचारिक व सांस्कृतिक पुनरुज्जीवन घडवून आणणारा एक शक्तिशाली नवा प्रवाह भारतीय जीवनात निर्माण झाला असून आपण एका समृद्ध अशा कालखंडात प्रवेश करीत आहोत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लोकजीवन समृद्ध करण्याची जी प्रतिज्ञा देशाने केली तिचाच हे पुनरुज्जीवन एक भाग असून भाषिक राज्यांच्या निर्मितीमुळे या पुनरुज्जीवनाच्या कार्यासाठी आम्हाला एक नवे साधन प्राप्त झाले आहे. यापुढे आता एक निश्चित कालखंड सुरू होत असून या क्षेत्रात घेतलेल्या जबाबदाऱ्या आपण पुऱ्या केल्या पाहिजेत. या जबाबदाऱ्या स्पष्ट करून त्या पार पाडण्यासाठी निश्चित अशी यंत्रणा आपण तयार केली पाहिजे, असे मला वाटू लागले आणि त्यातूनच या मंडळाची कल्पना निर्माण झाली. साहित्य अकादमी ही अशाच प्रकारची संस्था असून ती साली अस्तित्वात आली. वेगवेगळ्या भाषेतील दुर्मिळ ग्रंथ प्रसिद्ध करणे, इतिहासाचे, वाड्.मयाचे आणि निरनिराळ्या संस्कृतीचे संशोधन करणे यासारखे विविध स्वरुपाचे कार्य ही संस्था करीत असते. साहित्य अकादमीसारखेच व शक्य झाल्यास त्यापेक्षाही अधिक व्यापक स्वरुपाचे कार्य या मंडळाकडून व्हावे, य