पोस्ट्स

ऑगस्ट, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मुली मारण्याचा अडीचशे कोटींचा धंदा

स्त्री भ्रूणहत्या ही राज्यापुढची सध्याची गंभीर समस्या आहे , म्हणूनच अनेक घटकांनी त्याप्रश्नी लक्ष घालून विविध पातळ्यांवर जाणीव जागृतीचे प्रयत्न सुरू केले आहेत. मुलींचे घटते प्रमाण आणि सोनोग्राफी सेंटर्स यांचा थेट संबंध एव्हाना चव्हाटय़ावर आला आहे. गर्भलिंग निदानाचा धंदा करणारे डॉक्टर्स ‘ गंदा है पर धंदा है.. ’ या धोरणानुसार भ्रूणहत्येची दुकानेच चालवीत आहेत. राज्यभरात साडेपाच हजारांहून अधिक सोनोग्राफी सेंटर्स असून मुंबई-ठाण्यातील त्यांची संख्या अडीच हजारांच्या घरात आहे. महाराष्ट्रातला संपन्न प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्राच्या संपन्नतेच्या भाळावर स्त्री भ्रूणहत्येचा कलंक ठळकपणे गोंदला गेला आहे. गरीबांना मुलीचे ओझे वाटते म्हणून मुलगी नको असते तर श्रीमंतांन इस्टेटीला वारस म्हणून मुलगा हवा असतो. इस्टेटीच्या वारसासाठी हपापलेल्या संपन्न प्रदेशात मुलगी नकोशी वाटते. या साऱ्या मानसिकतेचा लाभ उठवत सोनोग्राफी सेटर्स चालवणारे डॉक्टर आणि काही स्त्रीरोग तज्ज्ञांनी उखळ पांढरे करून घेतले. कोणतेही तंत्रज्ञान हे माणसाला उपयुक्त असते , परंतु सोनोग्राफीसारख्या तंत्रज्ञानाचा वापर विकृत म

अण्णांची काठी आणि सरकारचा विंचू

राजधानी दिल्लीच्या स्टेजवर भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या चौसष्टाव्या वर्धापनदिनाच्या दुसऱ्या दिवसापासून अण्णा हजारे आणि कंपनीचा ग्रँड रिअ‍ॅलिटी शो सुरू झाला आहे. भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात एवढा टीआरपी अन्य कुठल्या कार्यक्रमाला क्वचितच लाभला असेल. अर्थात एखाद्या तासाभराच्या कार्यक्रमाला, एखाद्या रंगतदार क्रिकेट मालिकेतील अंतिम सामन्यातील अखेरच्या काही षटकांचा टीआरपी सर्वाधिक असतो. परंतु एका कार्यक्रमाला सलग इतके दिवस असा टीआरपी मिळवणारा शो म्हणून अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची नोंद करावी लागेल. राळेगणसिद्धीच्या छोटय़ाशा रंगमंचावर आतार्पयतची आंदोलने केलेल्या अण्णांनी मुंबईत आझाद मैदानावरही उपोषण केले होते, तेव्हा सुरेश जैन यांच्या इव्हेंटबाजीमुळे त्याची मोठी चर्चा झाली होती. लोकपालसाठी अण्णा पहिल्यांदा दिल्लीत गेले तेव्हा त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता, परंतु त्याचे स्वरुप आताच्या तुलनेत खूुपच किरकोळ होते. कदाचित अण्णांच्या सोबत जी मंडळी होती, त्यांनाही तेव्हा इव्हेंटच्या भव्यतेची कल्पना आली नसावी किंवा तो एवढा मोठा होऊ शकतो, याचा अंदाज आला नसावा. सरकारनेही फारशी ताणाताणी न करता सम

ये दीवार गिरती ही नही..

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बाजारीकरण नुकतेच सुरू होऊन कसोटी क्रिकेटची जादू कमी होण्याचा आणि एकदिवसीय सामन्यांचे पर्यायाने झटपट क्रिकेटचे प्रस्थ वाढण्याचा काळ होता. अशा काळात राहुल ्रविडचे भारतीय संघात पदार्पण झाले. इंग्लंडविरुद्ध परवा लॉर्डसवरील कसोटीत शतक झळकावून ्रविडने भारतीय संघातील आपली उपयुक्तता सिद्ध केली आणि लॉर्डसवर शतक झळकावण्याचे आपले स्वप्न साकार केले. त्याच लॉर्डसवर पंधरा वर्षापूर्वी कसोटी पदार्पण करणाऱ्या ्रविडला अवघ्या पाच धावांनी शतकाने हुलकावणी दिली होती. ्रविडच्या बाबतीत एक गोष्ट सातत्याने जाणवते, ती म्हणजे क्रिकेटमध्ये हिमालयाएवढी कामगिरी करूनही राहुल ्रविड नावाच्या खेळाडूचे कर्तृत्व तेंडुलकरच्या सावलीत झाकोळले गेले. त्याच्या वाटय़ाला फारसे कौतुक कधीच आले नाही. परीकथेत नावडत्या राणीचा राजपुत्र जसा उपेक्षित असतो आणि आपल्या चांगुलपणाने सगळ्यांची मने जिंकण्याचा प्रयत्न करतो, तसाच राहुल ्रविड पंधरा वर्षे भारतीय संघासाठी जीव तोडून खेळत राहिला. एकेकाळी सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळातील सभ्यतेचा ऱ्हास झाल्याच्या काळात स्वत:च्या वर्तनाने नव्या पिढीपुढे एक

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

परिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट’ ही आनंद विंगकर यांची कादंबरी केवळ सुन्न करीत नाही, तर मनात साकळून राहते. गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसंदर्भात कादंबरी, कथा, कविता अशा स्वरूपात मराठीत बरेचसे लेखन झाले आहे. कथा-कादंबऱ्यांमध्ये प्रामुख्याने शेतकऱ्याचे दु:ख, दैन्य; त्याने परिस्थितीशी केलेला झगडा आणि परिस्थितीपुढे हार मानून केलेली आत्महत्या असे चित्रणाचे स्वरूप राहिले. आत्महत्येच्या प्रसंगाने कादंबरीचा शोकात्म शेवट होतो. विंगकर यांची कादंबरी शेतकऱ्याची आत्महत्येच्या प्रश्नावरील असली तरी अनेक अर्थानी वेगळी आहे. इथे कादंबरीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच शेतकरी आणि त्याच्या पत्नीची आत्महत्या घडते आणि पुढे सबंध कादंबरी त्या घटनेभोवती फिरत राहते. अवघ्या चार-पाच दिवसांचा काळच कादंबरीत येतो, त्याअर्थाने पाहिले तर एका दीर्घकथेचा ऐवज आहे, परंतु आनंद विंगकर यांनी या छोटय़ाशा काळात असा काही जीव भरला आहे की, कादंबरी वाचकाला शोकात्म भावनांनी करकचून बांधून टाकते. यशवंता, पत्नी पा