पोस्ट्स

नक्षत्रबनाची धोंडेवाडी

इमेज
साता-याजवळील धोंडेवाडी हे छोटेसे गाव महात्मा गांधीजींच्या कल्पनेतल्या ग्रामस्वराज्याचे आदर्श उदाहरण म्हणून ओळखले जाते. श्रमदानातून ग्रामविकासाबरोबरच बचतगटाच्या माध्यमातून लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असतात. लोकसहभागातून विकसित गावाचे मॉडेल म्हणून धोंडेवाडीने आपली ओळख निर्माण केली आहे. वीस वर्षांपूर्वी धोंडेवाडी अत्यंत मागास म्हणून ओळखली जात होती. खेडोपाडी अशी अनेक मागास गावे असतात , ज्यांना पंचक्रोशीतले लोग अडाणी गावे म्हणून संबोधतात. धोंडेवाडीची तशीच स्थिती होती. ‘ जग सुधारेल पण धोंडेवाडी सुधारणार नाही ’, असे पंचक्रोशीतले लोक बोलायचे. गाव तसे आडवळणीच. त्यामुळे एसटी येत नव्हती. कुठल्याही सर्वसाधारण गावाप्रमाणे इथेही अस्वच्छतेचेच साम्राज्य असायचे. गावात एकही शौचालय नव्हते. त्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य असायचेच पण महिलांची गैरसोयही व्हायची. जवळच असलेल्या आंगापूर गावचे माणिक शेडगे शेतात जायचे , तेव्हा धोंडेवाडीची शाळकरी मुले भेटायची. त्यांच्याशी ते संवाद साधाययचे. गावातल्या मुलांशी संवाद सुरू झाल्यावर तोच संवाद त्यांना धोंडेवाडी गावात घेऊन गेला. गावातली प...

जबाबदारी पतंगरावांची !

इमेज
   सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला राज्याच्या इतर भागांमध्ये लक्षणीय यश मिळाले असले तरी सांगली जिल्हा वगळता दक्षिण महाराष्ट्रात फारसा थारा मिळालेला नाही. विधान परिषद सदस्य चंद्रकांत पाटील यांच्याकडे सहकार खाते देऊन दक्षिण महाराष्ट्रात भाजपचा पाया विस्तारण्याची जबाबदारी सोपवलेली दिसते. सत्ता गमावल्यामुळे सैरभैर झालेले काँग्रेस-राष्ट्रवादीचे विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे तिसऱ्या-चौथ्या फळीतील कार्यकर्तेही आता भाजपची वाट धरतील. ज्यांचा राज्याच्या राजकारणावर फारसा परिणाम होणार नसला तरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांच्या राजकारणाच्यादृष्टिने उपयोग होऊ शकतो. पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी या सत्ताच अधिक महत्त्वाच्या ठरतात. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे त्या पक्षाचे राज्यपातळीवरील नेते सत्तेच्या सावलीत राहतील, मात्र त्यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांना कुत्रेही विचारणार नाही. ना धड सत्तेत ना विरोधात अशा अवस्थेत त्यांना राजकीय अस्तित्वासाठी कुठलातरी एक पर्याय निवडावा लागेल. ज्यांना सत्तेचे लाभ किंवा संरक्षण हवे ...

सुप्रिया आणि पंकजा

इमेज
      महाराष्ट्राला राजकारणातील स्त्रियांची सशक्त परंपरा असली तरी गेल्या चोपन्न वर्षांत स्त्री मुख्यमंत्री लाभली नाही, हे पुरोगामी महाराष्ट्राचे शल्य आहे. अलीकडच्या काही वर्षांत त्याचा वारंवार उच्चार होतोय आणि त्यासाठी काही नावेही घेतली जात आहेत. त्यातले पहिले नाव आहे Supriya Sule यांचे. शरद पवार यांच्या कन्या असलेल्या सुप्रिया यांचे नाव गेल्या सहा-सात वर्षांपासून महाराष्ट्राच्या संभाव्य मुख्यमंत्री म्हणून घेतले जात आहे. परंतु ते घेताना घेणाऱ्यांचे त्यामागचे छुपे हेतूही लक्षात आल्यावाचून राहात नाहीत. मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा बाळगून असलेले अजित पवार यांच्या मार्गात विघ्न आणण्याच्या उद्देशाने सुप्रिया यांचे नाव पुढे केले जाते. त्याआधारे टीव्हीच्या पडद्यावर पवार कुटुंबातला राजकीय संघर्ष काल्पनिकरित्या रंगवता येतो. राजकारणात नवख्या असताना केवळ शरद पवार यांच्या कन्या म्हणून त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी घेतले जात होते, हेही लक्षात घेतले पाहिजे. सुप्रिया सुळे यांच्याबरोबरच दुसरे एक नाव अलीकडेच पुढे येत आहे, ते Pankaja Palve यांचे. गोपीनाथ मुंडे यांच्या क...

Brand (?) महाडिक !

इमेज
  कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात गेली तीनेक दशके महाडिक ब्रँड चर्चेत आहे. ब्रँड चांगला असतो किंवा खराब असतो. महाडिक Brand च्याबाबतीत सुरुवातीपासून अनेक दंतकथा, वदंता जिल्ह्याच्या राजकारणात प्रचलित आहेत. खासदार सदाशिवराव मंडलिक आणि त्यांच्या गटाचे लोक आजसुद्धा महाडिक म्हणजे दोन नंबरवाले असाच उल्लेख करतात. महादेवराव महाडिक हे महाडिक कुटुंबातले राजकारणात प्रवेशकर्ते झालेले आद्यपुरुष ! नदीचे मूळ आणि ऋषिचे कूळ शोधू नये असे म्हणतात, त्यात भर घालून Political leader च्याही कूळ आणि मुळाचा शोध घेण्याचा प्रयत्न करू नये, अशी भर घालायला पाहिजे. कोल्हापूरलगतच्या कसबा बावडास्थित छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ ( ?) संचालक म्हणून महादेवराव महाडिक यांचा कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश झाला. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर municipal corporation /s     मध्ये शिरकाव केला. म्हणजे महापालिका निवडणूक लढवली नाही किंवा आपले पॅनलही उभे केले नाही. निवडून आलेल्या वेगवेगळ्या गटाच्या-पक्षाच्या-बिनगटाच्या-बिनाशेंड्याबुडख्याच्या नगरसेवकांना एकत्रित करू...