पोस्ट्स

ऑगस्ट, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठी कादंबरीच्या कक्षा विस्तारणारे ‘चोषक फलोद्यान’

इमेज
रंगनाथ पठारे यांनी कथा आणि कादंबरीलेखनामध्ये अनेक प्रयोग केले आहेत. ‘चोषक फलोद्यान’ ही त्यांची श्रीरामपूरच्या  शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलेली  नवी कादंबरी त्यांच्या आतापर्यंतच्या कादंबऱ्याच नव्हे तर एकूण मराठी कादंबरीच्या आशयाच्या कक्षा ओलांडून पुढे जाणारी आहे. मराठी लेखकांनी स्त्री-पुरुष संबंध या विषयापासून स्वतःला अंतरावर ठेवले आहे. या विषयावर मराठीत झालेले बहुतांश लेखन सवंग, उथळ प्रकारांमध्ये मोडणारे आहे. माणसाच्या जगण्याचा बराचसा भाग व्यापणाऱ्या या विषयाला भिडण्याचे धारिष्ट्य मराठी लेखकांनी दाखवले नाही. भाऊ पाध्ये यांच्यासारखा सन्माननीय अपवाद. कनिष्ठ मध्यमवर्गीय मानसिकता, सामाजिक पर्यावरण आणि समाजात वावरतानाचे मानसिक दबाव किंवा   नैतिक-अनैतिकतेच्या संकल्पनेबाबत आकलनाच्या मर्यादा अशी काही कारणे त्यामागे असू शकतील. या पार्श्वभूमीवर रंगनाथ पठारे यांच्यासारखा गंभीर लेखक अशा विषयाला ताकदीने भिडताना मराठी कादंबरीविश्व समृद्ध करण्याबरोबरच वाचकांनाही घडवण्याचे काम करतो. ‘चोषक फलोद्यान’ कादंबरीतील ‘गर्भित’ लेखक मृत्यूच्या उंबरठ्यावर ‘कोमात’ गेलेला आहे. तेथून आपले स...

गुजरातमध्ये दलितांचा आत्मभानाचा लढा

गुजरातमधील उना येथे झालेल्या दलितांवरील अत्याचाराच्या घटनेने गुजरातच्या राजकारणाला नवे वळण लागले आहे. आधीच पाटीदार समाजाचे आंदोलन हाताळण्यात अयशस्वी ठरलेल्या आनंदीबेन पटेल यांच्या कारभाराची लक्तरे उनाच्या घटनेने वेशीवर टांगली. त्यांचे मुख्यमंत्रिपद गेले. त्यामागचे अंतर्गत राजकारण हा वेगळा विषय असला तरी नेतृत्वबदल झाला ही वस्तुस्थिती आहे. मुख्यमंत्री बदल झाल्यानंतरही गुजरातमधील वातावरण बदललेले नाही. उनाच्या घटनेच्या निषेधार्थ दलितांनी अहमदाबाद ते उना दलित अस्मिता मार्च काढून आपल्या भावी वाटचालीची दिशा स्पष्ट केली. जिग्नेश मेवाणी या तरुणाने दलितांचे हे आंदोलन संघटित केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना गलिच्छ कामे करण्यापासून परावृत्त केले होते. त्यांचाच आदर्श मानून जिग्नेश मेवाणीने लोकांना संघटित केले. त्यांचे आत्मभान जागृत करण्याचा प्रयत्न केला. त्याचाच परिणाम म्हणून उनामध्ये दहा हजार दलितांनी एक शपथ घेतली. डोक्यावरून मैला न वाहून नेण्याची आणि मेलेल्या जनावरांची विल्हेवाट न लावण्याची शपथ. गुजरातमधील दलितांनी उनाच्या घटनेनंतर अशी कामे बंद केली आहेत. त्याचा परिणाम म्हणून गुजरात...