आत्महत्या केलेल्या शेतमजुराच्या मुलीचे मुख्यमंत्र्यांना पत्र
पत्रास कारण की गेल्या महिन्यात माझ्या बापानं आत्महत्या केली हे आपणास माहीत असेलच कारण कालच तुम्ही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे पालकत्व सरकारने घेतले आहे त्यांना सरकार विसरणार नाही असे म्हणालात महोदय, आमच्या गावात आत्महत्या केलेल्या दोघांच्या कुटुंबियांना लाखालाखाचे चेक मिळाले त्यांचे फोटो छापून आले चेक घेताना पण आम्हाला मिळाले नाही काहीच माझा बाप आयुष्यभर शेतात राबला तरी तो शेतकरी नव्हता शेतमजूर होता म्हणतात तुमचे लोक मुख्यमंत्री महोदय, माझ्या मोठय़ा बहिणीच्या लग्नासाठी कर्ज काढलं होतं माझ्या बापानं तिला सासरी जाताना खूप रडला माझा बाप तरी खूप आनंदी होता एका लेकीचं आयुष्य मार्गी लागलं म्हणून काही दिवस गेले आणि बाप गप्प गप्प झाला बोलायचंच बंद झाला कुणाशी भिंतीला टेकून बसायचा जमिनीवर रेघोटय़ा मारीत नजर अशी जसं भुईतलं गुप्तधन शोधतोय दिवसभर राबून यायचा गुरासारखं रात्री घासभर खावून झोपी जायचा गपगार सकाळर्पयत अलीकडं अलीकडं दचकून उठायचा झोपेतून भास व्हायचा त्याला सावकार दारात आल्याचा माझा बाप इज्जतीला खूप जपायचा मुख्यमंत्री महोदय स्वत:च्या आणि सरकारच्याही सरकारच्या इज्जतीसाठीच त्य...