पोस्ट्स

सुप्रिया आणि पंकजा

इमेज
      महाराष्ट्राला राजकारणातील स्त्रियांची सशक्त परंपरा असली तरी गेल्या चोपन्न वर्षांत स्त्री मुख्यमंत्री लाभली नाही, हे पुरोगामी महाराष्ट्राचे शल्य आहे. अलीकडच्या काही वर्षांत त्याचा वारंवार उच्चार होतोय आणि त्यासाठी काही नावेही घेतली जात आहेत. त्यातले पहिले नाव आहे Supriya Sule यांचे. शरद पवार यांच्या कन्या असलेल्या सुप्रिया यांचे नाव गेल्या सहा-सात वर्षांपासून महाराष्ट्राच्या संभाव्य मुख्यमंत्री म्हणून घेतले जात आहे. परंतु ते घेताना घेणाऱ्यांचे त्यामागचे छुपे हेतूही लक्षात आल्यावाचून राहात नाहीत. मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा बाळगून असलेले अजित पवार यांच्या मार्गात विघ्न आणण्याच्या उद्देशाने सुप्रिया यांचे नाव पुढे केले जाते. त्याआधारे टीव्हीच्या पडद्यावर पवार कुटुंबातला राजकीय संघर्ष काल्पनिकरित्या रंगवता येतो. राजकारणात नवख्या असताना केवळ शरद पवार यांच्या कन्या म्हणून त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी घेतले जात होते, हेही लक्षात घेतले पाहिजे. सुप्रिया सुळे यांच्याबरोबरच दुसरे एक नाव अलीकडेच पुढे येत आहे, ते Pankaja Palve यांचे. गोपीनाथ मुंडे यांच्या क...

Brand (?) महाडिक !

इमेज
  कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात गेली तीनेक दशके महाडिक ब्रँड चर्चेत आहे. ब्रँड चांगला असतो किंवा खराब असतो. महाडिक Brand च्याबाबतीत सुरुवातीपासून अनेक दंतकथा, वदंता जिल्ह्याच्या राजकारणात प्रचलित आहेत. खासदार सदाशिवराव मंडलिक आणि त्यांच्या गटाचे लोक आजसुद्धा महाडिक म्हणजे दोन नंबरवाले असाच उल्लेख करतात. महादेवराव महाडिक हे महाडिक कुटुंबातले राजकारणात प्रवेशकर्ते झालेले आद्यपुरुष ! नदीचे मूळ आणि ऋषिचे कूळ शोधू नये असे म्हणतात, त्यात भर घालून Political leader च्याही कूळ आणि मुळाचा शोध घेण्याचा प्रयत्न करू नये, अशी भर घालायला पाहिजे. कोल्हापूरलगतच्या कसबा बावडास्थित छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ ( ?) संचालक म्हणून महादेवराव महाडिक यांचा कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश झाला. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर municipal corporation /s     मध्ये शिरकाव केला. म्हणजे महापालिका निवडणूक लढवली नाही किंवा आपले पॅनलही उभे केले नाही. निवडून आलेल्या वेगवेगळ्या गटाच्या-पक्षाच्या-बिनगटाच्या-बिनाशेंड्याबुडख्याच्या नगरसेवकांना एकत्रित करू...

मुंडे आणि पवार

इमेज
शरद पवार यांना विरोध या सूत्राच्या आधारे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकांनी करिअर केले. ग्रामपंचायतीवर निवडून येण्याची क्षमता नसलेल्या नेत्यांना काँग्रेसने केवळ पवारांचा विरोधक या एकमेव निकषावर राष्ट्रीय पातळीवरची पदे दिली. विरोधी पक्षातही अनेकांनी पवार यांना टार्गेट करून आपले राजकीय बस्तान बसवले. गोपीनाथ मुंडे यांनीही महाराष्ट्र भाजपचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर शरद पवार हेच आपले टार्गेट ठेवले आणि राजकीय पातळीवर त्यांच्याशी कधीच तडजोडीची भूमिका घेतली नाही. अनेकदा मुंडे यांचा पवारविरोध हा शत्रुत्वाच्या पातळीवर गेल्यासारखा वाटत होता, परंतु दोन्ही नेत्यांची समज एवढी पक्की होती, की   जेव्हा जेव्हा ऊसतोडणी कामगारांचा किंवा साखर कारखानदारीसंबंधी कोणताही प्रश्न निर्माण झाला, तेव्हा दोघांनीही जाहीरपणे एकत्र येऊन चर्चा केली. मार्ग काढला. पवारांवर टीका करणारे, त्यांचा द्वेष करणारे अनेक आहेत. त्यांच्याविरोधात कारस्थाने करणारे अनेकजण आहेत. अशा अनेकांनी राजकीय पातळीवर अनेकदा पवारांशी तडजोडी केल्या. गोपीनाथ मुंडे हे राजकीय पातळीवर पवारांशी कधीही तडजोड न करणारे एकमेव नेते होते. सुरुवातीला त...

‘रयत’ पुढचे Challenge

इमेज
रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षनिवडीच्या निमित्ताने जो काही धुरळा उडाला, त्यामुळे महाराष्ट्राच्या Education Field मध्ये अल्पकाळ का होईना, चर्चा-उपचर्चांना उधाण आले. शरद पवार यांची अध्यक्षपदी फेरनिवड झाल्यामुळे वादळ शांत झाले आहे. शिक्षण क्षेत्राचे पावित्र्य जपणाऱ्या ‘रयत’सारख्या संस्थेसंदर्भात असा वादाचा धुरळा उडवण्यामागे संस्थेच्या हितापेक्षाही कारभारासंदर्भात संशयाचे पिल्लू सोडून देण्याचा विचार असू शकतो. त्यामुळे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची Responsibility पुढील काळात अधिक वाढली आहे.  शिक्षण हे समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे, हे ओळखून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९१९मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. शताब्दीकडे वाटचाल करणाऱ्या संस्थेचा आज महाराष्ट्रातील १४ आणि कर्नाटकातील एका अशा १५ जिल्ह्यांमध्ये विस्तार झाला असून विविध प्रकारच्या ६७३ शाखा   कार्यरत आहेत. गेली पंचवीस वर्षे संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी शरद पवार यांच्याकडे आहे. तसे पाहिले तर संस्थेमध्ये Presidentपद हे नामधारी आहे. नियमित कामकाजामध्ये Chairmanपद महत्त्वाचे असते. प्रा. एन. डी. पाटील यांनी अनेक वर्ष...

Post Box

इमेज
Post Box काढली किंवा Post Box बसवली, ही काही दखल घेण्याजोगी news होऊ शकत नाही. परंतु काही छोट्या गोष्टी उगीच nostalgic करून टाकतात. टपालाच्या माध्यमातून होणारा पत्रव्यवहार कितीही हरवला म्हटलं तरी त्यांचं माणसांच्या संवेदनेशी असलेलं नातं आजही तेवढंच जिव्हाळ्याचं आहे. गेल्या दोन-तीन दशकांमध्ये अस्तित्व उखडून टाकतील, अशी अनेक वादळं आली तरी टपालयंत्रणा खंबीर उभी आहे. आधी कुरियर सेवेची स्पर्धा आली. ई-मेलचा जमाना आला. मोबाइल आणि नंतर स्मार्टफोनने संपर्क-संवाद सुलभ आणि चित्रमय बनवला. त्यामुळं अवघ्या पंधरा पैशात देशाच्या कानाकोपऱ्यात कुठंही असलेल्या माणसां-माणसांमधला संवादाचा पूल टिकवून ठेवणाऱ्या टपालाचं महत्त्व कमी होणं स्वाभाविक होतं. सुविधांमुळे संपर्क वाढला तरी पत्रांमधून होणारा मनमोकळा संवाद थांबल्यामुळं माणसं त्याबाबत नॉस्टाल्जिक बनू लागली. तेवढा जिव्हाळा या यंत्रणेनं निर्माण केला आहे. तर बातमी आहे कोल्हापूरची. इथला रस्तेविकास प्रकल्प राबवताना रस्त्याकडेला असलेल्या लाल रंगाच्या अनेक टपालपेट्या काढून टाकल्या होत्या. अशा सुमारे ४० टपालपेट्या पुन्हा त्या त्या ठिकाणी न...

गोहत्याबंदीचे अव्यवहार्य राजकारण

इमेज
   कार्तिकी एकादशीला पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सरकारी पूजा केली जाते. यंदा वारकऱ्यांच्या काही संघटनांनी सरकारी पूजा होऊ न देण्याचा निर्धार केला होता, ऊसदरप्रश्नी आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही सरकारी पूजेला विरोध केला, त्यामुळे अजित पवार यांनी कार्तिकीची पूजा टाळली. पंढरपूर हे समतेचे पीठ मानले जाते आणि वारकरी संप्रदायानेच ही ओळख पंढरपूरला मिळवून दिली आहे. विठ्ठलाला बडव्यांनी घेरल्याची चर्चा अनेक वर्षांपासून केली जाते. नुकतेच बडव्यांचे देव उठले. परंतु अलीकडच्या काळात वारकऱ्यांमध्ये घुसलेल्या जातीयवादी प्रवृत्तींमुळे समतेचे हे पीठ बदनाम होत आहे.   वारकऱ्यांमधल्या जातीयवादी प्रवृत्तींनी जादूटोणाविरोधी विधेयकाला सतत विरोध केला. बंडातात्या कराडकर हे वारकरी संप्रदायातले रा.स्व.संघ आणि विश्वहिंदू परिषदेचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्यामार्फत हिंदुत्ववादी शक्ती आपले विषय रेटत असतात. गोहत्याबंदी कायद्याचा विषयही अशाच प्रकारे पुढे आणण्यात आला आहे. राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर असताना तत्कालीन दुग्धविकासमंत्री नारायण राणे या...