‘रयत’ पुढचे Challengeरयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षनिवडीच्या निमित्ताने जो काही धुरळा उडाला, त्यामुळे महाराष्ट्राच्या Education Field मध्ये अल्पकाळ का होईना, चर्चा-उपचर्चांना उधाण आले. शरद पवार यांची अध्यक्षपदी फेरनिवड झाल्यामुळे वादळ शांत झाले आहे. शिक्षण क्षेत्राचे पावित्र्य जपणाऱ्या ‘रयत’सारख्या संस्थेसंदर्भात असा वादाचा धुरळा उडवण्यामागे संस्थेच्या हितापेक्षाही कारभारासंदर्भात संशयाचे पिल्लू सोडून देण्याचा विचार असू शकतो. त्यामुळे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची Responsibility पुढील काळात अधिक वाढली आहे. 
शिक्षण हे समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे, हे ओळखून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९१९मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. शताब्दीकडे वाटचाल करणाऱ्या संस्थेचा आज महाराष्ट्रातील १४ आणि कर्नाटकातील एका अशा १५ जिल्ह्यांमध्ये विस्तार झाला असून विविध प्रकारच्या ६७३ शाखा  कार्यरत आहेत. गेली पंचवीस वर्षे संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी शरद पवार यांच्याकडे आहे. तसे पाहिले तर संस्थेमध्ये Presidentपद हे नामधारी आहे. नियमित कामकाजामध्ये Chairmanपद महत्त्वाचे असते. प्रा. एन. डी. पाटील यांनी अनेक वर्षे चेअरमनपदाची जबाबदारी भूषवली आणि अलीकडे ते जबाबदारीतून मुक्त झाले. अलीकडे अॅड. रावसाहेब शिंदे यांच्याकडे ही जबाबदारी होती. शिक्षणक्षेत्राचे बाजारीकरण आणि धंदेवाईक लोकांनी या क्षेत्रावर कब्जा मिळवला असताना रयत शिक्षण संस्थेने सत्त्व आणि स्वत्व जोपासून या क्षेत्राचे पावित्र्य राखले, याची आवर्जून नोंद घ्यावी लागेल. त्याचे श्रेय खरेतर प्रा. एन. डी. पाटील यांना द्यावे लागेल. 
कर्मवीरांनी घालून दिलेल्या आदर्शांपासून संस्था अजिबात ढळणार नाही, यासाठी एन. डी. पाटील यांनी डोळ्यात तेल घालून जागल्याची भूमिका बजावली. व्यापारीकरणाचा दबाव वाढत असताना आणि अनेक मोह खुणावत असतानाही संस्थेने वाट वाकडी केली नाही. संस्थेचे टीकाकार त्यावर टीका करताना, नव्या आणि बदलत्या प्रवाहांशी जुळवून घेण्यात संस्था कमी पडल्याचा आरोप करतात. त्यात काहीअंशी तथ्य असले तरी संस्थेने चाकोरी न सोडण्यामागे एक निश्चित धोरण होते. professionalअभ्यासक्रमांच्या मागे लागले तर संस्था मूळ उद्देशापासून ढळण्याचा धोका होता. शिक्षणक्षेत्रात घोंघावणाऱ्या अनेक वादळांशी सामना करीत संस्थेचा वटवृक्ष खंबीरपणे उभा आहे. रयत ही केवळ शिक्षणसंस्था नाही, तर शिक्षणक्षेत्रातला ‘विचार’ आहे. तो विचार मारण्याचे प्रयत्न आगामी काळातही वेगवेगळ्या मार्गांनी होत राहतील. त्यामुळे काळाची आव्हाने स्वीकारण्याबरोबरच हा विचार जपण्याचे मोठे आव्हान संस्थेच्या कारभाऱ्यांपुढे आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर

सरोजिनीताईंची चटका लावणारी एक्झिट