मैली गंगा वाहतच राहते..
गंगा नदीसंदर्भात एक कथा सांगितली जाते. सगरपुत्रांची कथा म्हणून उत्तर भारतात ती परिचित आहे. सगर नावाचा रघुवंशातील एक सम्राट होता. त्याच्या एक हजार पुत्रांनी काही कारणामुळे देशाच्या एका भागात वाईट पद्धतीने खोदकाम केले. त्यामुळे एका ष्टद्ध r( ७०)षिचा कोप झाला आणि त्याने दिलेल्या शापामुळे सगळेच्या सगळे म्हणजे एक हजार सगरपुत्र जळून भस्म झाले. त्यांना मुक्ती देण्यासाठी त्यांचा वंशज भगीरथाने अभूतपूर्व तपस्या केली आणि गंगा आणून त्यांना शापमुक्त केले. अशी ती कथा आहे. आज देशभर गंगा नदी आणि तिचे प्रदुषण हा चर्चेचा विषय आहे. ज्येष्ठ पर्यावरणवादी जी. डी. आगरवाल यांच्या उपोषणामुळे गंगेचा विषय पुन्हा चर्चेत आला असून राष्ट्रीय गंगा नदी खोरे प्राधिकरणाची एप्रिलला बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तूर्त तरी गंगेसंदर्भात एवढीच नवी घडामोड घडली आहे. बाकी गंगेचे प्रदुषण वर्षानुवर्षे चालत आले आहे , ते तसेच पुढे सुरू आहे. गंगेच्या आजच्या स्थितीसंदर्भात गांधी शांति प्रतिष्ठानचे ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी अनुपम मिश्र सगरपुत्रांच्या कथेचा दाखला देऊन सांगतात , ‘ आज नव्या जमान्यातले सगरपुत्...