अजित पवार की सुप्रिया सुळे?
अजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजित पवार यांची निवड ही शरद पवार यांच्या मनाविरुद्ध आहे आणि छगन भुजबळ यांच्याकडेच उपमुख्यमंत्रिपद ठेवण्याची शरद पवार यांची इच्छा होती, अशी चर्चा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शरद पवार अस्वस्थ असून पवार कुटुंबातील कलह त्यामुळे वाढण्याची शक्यता आहे, अशीही चर्चा केली जात आहे. काही वृत्तवाहिन्या आणि मु्िरत माध्यमांनी या कलहाचे सूचन केले आहे. राजकारणापेक्षा रक्ताचे नाते महत्त्वाचे असे वारंवार सांगणाऱ्या ठाकरे कुटुंबीयांचा दाखला समोर असल्यामुळे पवार कुटुंबातही तसेच घडणार असे अनेक राजकीय पंडित छातीठोकपणे सांगत आहेत. शरद पवार भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार किंवा शिवसेनेबरोबर युती करणार असे गेल्या अनेक वर्षापासून खास सूत्रांचा हवाला देत सांगितले जाते. त्यासंदर्भातील गुप्त बैठका कुठे कुठे झाल्या आणि फॉम्र्यूला काय ठरला, यासंदर्भातील एक्स्क्ल्यूजिव्ह बातम्या यापूर्वी अनेक वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केल्या आहेत. परंतु अद्यापर्पयत तसे काहीच घडलेले नाही, ही वस्तुस्थिती ...