पोस्ट्स

Post Box

इमेज
Post Box काढली किंवा Post Box बसवली, ही काही दखल घेण्याजोगी news होऊ शकत नाही. परंतु काही छोट्या गोष्टी उगीच nostalgic करून टाकतात. टपालाच्या माध्यमातून होणारा पत्रव्यवहार कितीही हरवला म्हटलं तरी त्यांचं माणसांच्या संवेदनेशी असलेलं नातं आजही तेवढंच जिव्हाळ्याचं आहे. गेल्या दोन-तीन दशकांमध्ये अस्तित्व उखडून टाकतील, अशी अनेक वादळं आली तरी टपालयंत्रणा खंबीर उभी आहे. आधी कुरियर सेवेची स्पर्धा आली. ई-मेलचा जमाना आला. मोबाइल आणि नंतर स्मार्टफोनने संपर्क-संवाद सुलभ आणि चित्रमय बनवला. त्यामुळं अवघ्या पंधरा पैशात देशाच्या कानाकोपऱ्यात कुठंही असलेल्या माणसां-माणसांमधला संवादाचा पूल टिकवून ठेवणाऱ्या टपालाचं महत्त्व कमी होणं स्वाभाविक होतं. सुविधांमुळे संपर्क वाढला तरी पत्रांमधून होणारा मनमोकळा संवाद थांबल्यामुळं माणसं त्याबाबत नॉस्टाल्जिक बनू लागली. तेवढा जिव्हाळा या यंत्रणेनं निर्माण केला आहे. तर बातमी आहे कोल्हापूरची. इथला रस्तेविकास प्रकल्प राबवताना रस्त्याकडेला असलेल्या लाल रंगाच्या अनेक टपालपेट्या काढून टाकल्या होत्या. अशा सुमारे ४० टपालपेट्या पुन्हा त्या त्या ठिकाणी न...

गोहत्याबंदीचे अव्यवहार्य राजकारण

इमेज
   कार्तिकी एकादशीला पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सरकारी पूजा केली जाते. यंदा वारकऱ्यांच्या काही संघटनांनी सरकारी पूजा होऊ न देण्याचा निर्धार केला होता, ऊसदरप्रश्नी आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही सरकारी पूजेला विरोध केला, त्यामुळे अजित पवार यांनी कार्तिकीची पूजा टाळली. पंढरपूर हे समतेचे पीठ मानले जाते आणि वारकरी संप्रदायानेच ही ओळख पंढरपूरला मिळवून दिली आहे. विठ्ठलाला बडव्यांनी घेरल्याची चर्चा अनेक वर्षांपासून केली जाते. नुकतेच बडव्यांचे देव उठले. परंतु अलीकडच्या काळात वारकऱ्यांमध्ये घुसलेल्या जातीयवादी प्रवृत्तींमुळे समतेचे हे पीठ बदनाम होत आहे.   वारकऱ्यांमधल्या जातीयवादी प्रवृत्तींनी जादूटोणाविरोधी विधेयकाला सतत विरोध केला. बंडातात्या कराडकर हे वारकरी संप्रदायातले रा.स्व.संघ आणि विश्वहिंदू परिषदेचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्यामार्फत हिंदुत्ववादी शक्ती आपले विषय रेटत असतात. गोहत्याबंदी कायद्याचा विषयही अशाच प्रकारे पुढे आणण्यात आला आहे. राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर असताना तत्कालीन दुग्धविकासमंत्री नारायण राणे या...

U. R. Ananthamurthy आणि मराठी पलायनवाद

इमेज
कन्नड भाषेत लिहिणारे ज्येष्ठ साहित्यिक U. R. Ananthamurthy social networking साइट्सवर फेरफटका मारतात किंवा नाही, हे माहीत नाही. परंतु तिकडे ते थोडेसे डोकावले तरी आपल्याविरोधात जनभावना किती प्रक्षुब्ध आहेत, हे त्यांना दिसून येईल. खरेतर त्यातल्या अनेकांना U. R. Ananthamurthy यांचे नावगावपत्ता ठावठिकाणा माहीत नाही. नाहीतर केव्हाच त्यांची गठडी वळून विमानातून त्यांचे पार्सल सातासमुद्रापार रवाना केले असते. अनंतमूर्ती यांनी जो प्रमाद केला आहे आणि ज्या व्यक्तिविरोधात आवाज उठवला आहे, त्या व्यक्तिच्या समर्थकांच्या भावना म्हणजे नुसत्या ठिणग्या असतात. मोदींना पंतप्रधान करण्याच्या नुसत्या कल्पनेनेच त्यांची मने एवढी प्रज्वलित झाली आहेत, की कधीही भडका उडून त्यात अनंतमूर्तींसारखे अनेकजण भस्मसात होऊन जातील. आजच अनेक मोदी समर्थकांनी भारतातून बाहेर जाणाऱ्या एकतर्फी विमानतिकिटाचे पैसे वर्गणीद्वारे अनंतमूर्तींना मनीऑर्डरद्वारे पाठवले आहेत. चुकून माकून मोदी पंतप्रधान झाले, तर विचारायलाच नको. अनंतमूर्तींसारख्या शंकडो विचारवंतांची गठडी वळून हे समर्थक विमानात कोंबतीलच, पण पुढे वाटेत समुद्रातही फेकून द्य...

विठू, तुझी पंढरी बदनाम...

इमेज
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जाण्यानंतर जादूटोणा प्रतिबंधक विधेयकाच्या अनुषंगाने विविधांगी चर्चा सुरू झाली आहे. विधेयक लटकण्याची अनेक कारणे सांगितली जातात. जातीयवादी शक्तिंचा विरोध, सरकारची निष्क्रियता, कथित शहाण्या लोकप्रतिनिधींची उदासीनता, बाकीच्यांचे मेंढरासारखे पक्ष किंवा नेत्याच्या मागे जाणे इत्यादी इत्यादी. या सगळ्या प्रक्रियेमध्ये घोळ घातला तो वारकरीं मंडळींनी. वारकरी संप्रदाय, पंढरपूरची वारी म्हटलं की उगा अनेकांचा ऊर भरून येतो. अनेकांना गहिवरून येते. कुणाला त्यात सामाजिक समता दिसते, तर कुणाला विमानातून वारकऱ्यांच्यातला विठ्ठल दिसतो. अलीकडच्या काळात प्रसारमाध्यमे वारीचा एवढा गाजावाजा करतात, की त्यामुळे राज्यकर्त्यांवरही वारकऱ्यांचा दबाव राहतो. वारी आणि वारकरी संप्रदायाशी घसट दाखवून पुरोगामी असल्याचे प्रदर्शन केले जाते. ज्ञानोबा-तुकोबांचा वारसा पुरोगामी असला तरी आजचा वारकरी संप्रदाय पुरोगामी आहे, असे म्हणणे म्हणजे फसवणूक करून घेण्यासारखे आहे. महाराष्ट्र सरकार समजून-उमजून गेली काही वर्षे अशी फसवणूक करून घेत आहे. वारकऱ्यांचे कातडे पांघरलेल्या जातीयवादी शक्ती वारकऱ्यांचे प्रत...

मोदींसाठी सरसावले राजू शेट्टी...

 आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप-रिपब्लिकन पक्ष महायुतीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीला रोखण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यावे, यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महायुतीत सहभागी करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महायुतीच्या या प्रयत्नांना राजू शेट्टी यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दोन्ही काँग्रेसना रोखण्यासाठी सारे एक होत असतील तर मी वेगळी चूल मांडणार नाही, अशा स्पष्ट शब्दात शेट्टी यांनी पुढची दिशा स्पष्ट केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना सोबत आली की, पश्चिम महाराष्ट्रात वाट सुकर होईल, असे महायुतीच्या नेत्यांना वाटते आणि अलीकडच्या काळात ‘स्वाभिमानी’ने केलेली हवा पाहता तसे वाटणे स्वाभाविकही आहे. परंतु वाटणे आणि प्रत्यक्षात असणे यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीइतके अंतर असते. आणि हे अंतर नेमके किती असते, हे राजू शेट्टी यांना गेल्या निवडणुकीवेळी समजून आले आहे. महायुतीचे नेते पुण्या-मुंबईत राहून वृत्तपत्रीय आणि वृत्तवाहिन्यांवरच्या प्रसिद्धीवरून बांधत असलेले आडाखे हे केवळ आ...