वाघ कशासाठी वाचवायचे ?

चं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि ते त्याची हत्या करण्याच्या तयारीत आहेत. परंतु वनखात्याचे लोक वाघाची हत्या करणाऱ्या लोकांवर गोळ्या झाडून त्यांना ठार करतात आणि वाघाचे प्राण वाचवतात.. लहान मुलांच्या गोष्टीच्या पुस्तकातसुद्धा अशी गोष्ट बाळबोध वाटेल. परंतु अशा बाळबोध व्यवहारावरच सरकारचे गाडे चाललेले असते. वाघाची शिकार करताना कुणी आढळल्यास गोळ्या घालण्याचा आदेश हा त्यातलाच प्रकार आहे. वाघ वाचवण्यासाठी प्रत्यक्षात काही करायचे नाही आणि खूप काही करतो आहोत , असे भासवण्याचे प्रयत्न केले जातात. केवळ महाराष्ट्रापुरते नव्हे , तर संपूर्ण देशभर अशीच परिस्थिती आहे. वाघ वाचवण्याची नुसती आवाहने केली जात आहेत. त्यासाठी मोहिमा राबवल्या जात आहे , तरीही वाघांच्या हत्या होतच आहेत. मध्ये आतार्पयत वाघांच्या हत्या झाल्यात. चं्रपूर जिल्ह्यात गेल्या महिनाभरात तीन वाघांच्या हत्या होणे केवळ धक्कादायकच नव्हे , तर नामुष्कीजनक आहे. याच आठवडय़ात चं्रपूर-लोहारा रस्त्यावर वाघाच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले ह...