मृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’
अखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दावा करणाऱ्याच्याबाबतीतही मृत्यू हेच अंतिम सत्य असल्याचे सिद्ध झाले. मार्चपासून त्यांच्याच ट्रस्टने उभारलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्याआधी अनेक दिवस ते आजारी होते, परंतु त्यांच्याच चेल्यांनी या भगवानाला साक्षात कैदेत ठेवल्यासारखे ठेवले होते. त्यांच्यावर काय उपचार सुरू होते किंवा उपचार सुरू होते की नव्हते याचीही कुणाला कल्पना नव्हती. एका भक्ताने न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यानंतर सत्यसाईबाबांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. लवकरच महाराज आश्रमात परत येणार असून भक्तांना दर्शन देणार आहेत, अशा वावडय़ा त्यांचे चेले उठवत होते, तेव्हा स्वत:ला साक्षात भगवान म्हणवून घेणारे सत्यसाईबाबा मृत्यूशी झुंज देत होते. ही झुंज अपयशी ठरली आणि रविवारी एप्रिलला रुग्णालयाच्या बंद खोलीत त्यांचे देहावसान झाले. चमत्कार होईल आणि बाबा रुग्णालयातून परत येतील, असे त्यांच्या भक्तांना वाटत होते. कारण स्वत: बाबांनीच आपण वर्षे जगणार ...