Post Box
Post Box काढली किंवा Post Box बसवली, ही काही दखल घेण्याजोगी news होऊ शकत नाही. परंतु काही छोट्या गोष्टी उगीच nostalgic करून टाकतात. टपालाच्या माध्यमातून होणारा पत्रव्यवहार कितीही हरवला म्हटलं तरी त्यांचं माणसांच्या संवेदनेशी असलेलं नातं आजही तेवढंच जिव्हाळ्याचं आहे. गेल्या दोन-तीन दशकांमध्ये अस्तित्व उखडून टाकतील, अशी अनेक वादळं आली तरी टपालयंत्रणा खंबीर उभी आहे. आधी कुरियर सेवेची स्पर्धा आली. ई-मेलचा जमाना आला. मोबाइल आणि नंतर स्मार्टफोनने संपर्क-संवाद सुलभ आणि चित्रमय बनवला. त्यामुळं अवघ्या पंधरा पैशात देशाच्या कानाकोपऱ्यात कुठंही असलेल्या माणसां-माणसांमधला संवादाचा पूल टिकवून ठेवणाऱ्या टपालाचं महत्त्व कमी होणं स्वाभाविक होतं. सुविधांमुळे संपर्क वाढला तरी पत्रांमधून होणारा मनमोकळा संवाद थांबल्यामुळं माणसं त्याबाबत नॉस्टाल्जिक बनू लागली. तेवढा जिव्हाळा या यंत्रणेनं निर्माण केला आहे. तर बातमी आहे कोल्हापूरची. इथला रस्तेविकास प्रकल्प राबवताना रस्त्याकडेला असलेल्या लाल रंगाच्या अनेक टपालपेट्या काढून टाकल्या होत्या. अशा सुमारे ४० टपालपेट्या पुन्हा त्या त्या ठिकाणी न...