पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुन्हा मराठा आरक्षण

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण व नोकऱ्यांमध्ये सवलत मिळण्यासाठी संबंधितांशी चर्चा करून लवकरच मुद्दा मार्गी लावण्यात येईल , असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवजयंतीला शिवनेरीवर झालेल्या कार्यक्रमात दिले आणि पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आला. आरक्षण हा सामाजिक मुद्दा असला तरीही अलीकडच्या काळात तो राजकीय पटावरील सगळ्यात संवेदनशील मुद्दा बनला आहे. त्याच्याशी खेळ म्हणजे साक्षात आगीशी खेळ असतो. अनेक राज्यांनी स्वतंत्रपणे आणि देशानेही अनेकदा त्याची झळ अनुभवली आहे. निवडणुकीच्या तोंडावर बहुतांश वेळा आरक्षणाचा मुद्दा उकरून काढून त्याच्या बळावर राजकारण केले जाते. महाराष्ट्रात सगळीकडेच या प्रश्नाची तीव्रता सारख्या प्रमाणात नाही. पुण्याच्या काही भागासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ाची तीव्रता अधिक आहे. मराठा सेवा संघ , मराठा महासंघ आणि त्यांच्याशी संलग्न विविध संघटना त्याप्रश्नी आग्रही आणि आक्रमक भूमिका घेतात. महाराष्ट्रात नुकत्याच नगरपरिषदेच्या तसेच जिल्हा परिषद आणि महापालिकेच्याही निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये हा मुद्दा आला नाही. र

सूर्याच्या जाणाऱ्या रथातून - कृष्ण कुमार रत्तू

काही होत असतं शून्यामध्ये शून्य कधी पूर्ण होत नाही कारण रितेपणात मोक्ष नाही मिळत एक बिंदू असतो , शेवटी जिथून होत असते जगण्याची सुरुवात तुम्ही पराभूत झालात तर जीवन पराभूत होतं तुम्ही चालत राहता , खळाळत वाहतो , अवखळ बनतो जगण्याचा प्रवाह जेव्हा पुष्कळ काही आपलं होत नाही तरीसुद्ध जमीन आणि आकाशाचा असतोच आपला वाटा तुमच्या पायावर आणि माथ्यावर सगळं आकाश कधी तुमचं स्वत:चं असत नाही रोजचीच असते प्रदक्षिणा तुम्ही प्रत्येक क्षणी बदलत असता बघत असता घडणारं - बिघडणारं जग कधी विचार करता सूर्य हातात पकडण्याचा परंतु हे विसरून जाता की आपणही प्रवासी आहोत सूर्याच्या जाणाऱ्या रथातून उतरणारे तुम्ही कधी विचार केलाय का , की कधी असंही होत असतं अलीकडं बदलले आहेत पोशाख राहिले आहेत दूरवर स्वप्नांचे शीलालेख आता वाचायला कुणाकडे आहे सवड पुष्कळ काही सुटून जात असतं प्रत्येकवेळी पुढच्या प्रवासाच्या संदर्भात थकवा आणणारं गुंतागुंतीचं , डोळ्यांमध्ये जेव्हा स्वप्नं नसतात तेव्हा माणूस किती निरीच्छ होत असतो कळत नाही तरीही का लक्षात ठेवतो पुढच्या प्रवासाच्या असंख्य शक्यता आणि ड

उत्तरेतल्या जनतेला लबाडाघरची आवतणी

 उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक म्हणजे कें्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारची आणि विशेषत: काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्यासाठी सत्त्वपरीक्षा ठरणार असल्यामुळे त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. काँग्रेस , भारतीय जनता पक्ष , बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष या चार पक्षांनी आपली सारी ताकद निवडणुकीत लावली आहे. उत्तर प्रदेशातील सामाजिक पाया गमावल्याने गेल्या बावीस वर्षापासून सत्तेपासून दूर राहिलेल्या काँग्रेससाठी स्वत: राहुल गांधी यांनी प्रतिष्ठा पणाला लावली असून भावाच्या मदतीसाठी प्रियांका गांधीही प्रचारात उतरल्या आहेत. गेल्या दोन दशकांत बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाने जाती-पातींची गणिते जमवून एका अनोख्या सोशल इंजिनिअरिंगचे दर्शन घडवले. भारतीय जनता पक्षानेही अयोध्येच्या राममंदिराचे राजकारण करून सत्ता मिळवली. सत्तेच्या खेळात देशातील या सर्वात मोठय़ा राज्यातून काँग्रेसचा पाया उखडला त्याचे परिणाम थेट कें्रातील राजकारणातही झाले आणि आघाडय़ांचे राजकारण अपरिहार्य बनले. निवडणुकीच्या रिंगणातील चार प्रमुख पक्षांनी उत्तर प्रदेशातील जनतेवर आश्वासनांची खैरात केली असून क